JEE, NEET Exam 2020- जेईई, नीट परीक्षा रद्द करा, दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांचे केंद्राला अवाहन; 22 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रादुर्भाव विचारात घेताल जेईई, नीट परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांचे केंद्राकडे केली आहे.
तेंलंगणा राज्यातील मेदचल मलकाजगिरी जिल्ह्यातील दुंडीगल भागात एका रसायन कारखान्याला भीषण आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप पुढे आले नाही. ही आग लागलेल्या परिसरापसून Air Force Academy अगदी नजीक आहे.
बिहार येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना एक महिन्यापूर्वी घडली होती. त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेतील सात जणांना आज अटक करण्यात आली आहे. एएनआयचे ट्वीट-
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे की, भारतात कोरोना व्हायरस लस निर्मिीतीचे काम वेगाने सुरु आहे. या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. आम्हाला यात पूर्ण यश येईल याबाबत खात्री आहे.
पंजाबचे सहकारमंत्री सुखविदरसिंह रंधावा यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आहे. रंधावा यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. तसेच, आपण उपचार घेऊन लवकर बरे होऊ आणि पुन्हा एकदा आपल्या सेवेत हजर होऊ असे म्हटले आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअर इंडियाच्या मदतीने अडकलेल्या साडेतीन लाखाहून अधिक भारतीयांना घरी परतविण्यात आले आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली आहे.
उत्तर प्रदेश मध्ये मागील 24 तासात 5,375 नवे कोरोना रुग्ण आढळले असुन, 70 जणांंचा मृत्यु झाला आहे. कालच्या दिवसात 4,638 जणांंना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या राज्यात 48,294 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर आजवर 2,867 जणांंचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे की, व्यक्ती व वस्तूंच्या राज्य अंतर्गत हालचालींवर कोणतेही बंधन घालू नये. स्थानिक पातळीवरील निर्बंधामुळे पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे परिणामी आर्थिक कामात आणि रोजगारात अडथळा निर्माण होत आहे. असेही या पत्रात म्हंंटले आहे.
आज, 22 ऑगस्ट रोजी देश विदेशात गणरायांंचे आगमन झाले आहे. यंंदा मुंंबईत गणेशोत्सवाच्या निमित्त सार्वजनिक स्तरावर केलंं जाणारंं आयोजन परंपरेपुरतं केलं जाईल. कोरोनाच्या संकटामुळे सणाचे स्वरुप साधे असले तरी सर्वत्र उत्साह मात्र कायम आहे. पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी सुद्धा काही वेळापुर्वी आपल्या ट्विटर अकाउंट वरुन समस्त देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दुसरीकडे, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली 86 वर्षांची परंपरा मोडुन यंदा आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. या आरोग्यउत्सवाची 3 ऑगस्ट रोजी शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात झाली होती. आज सकाळी या आरोग्यउत्सवात दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराला सुरुवात झाली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना व्हायरस संंदर्भातील अपडेट पाहायला गेल्यास कालच्या दिवसभरात देशात 1 मिलियन म्हणजेच 10 लाख कोरोना चाचण्या पार पडल्या. आता पर्यंतची ही विक्रमी नोंंद आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 28,36,926 इतका आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)