आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने विजयी सुरुवात केली. पहिलाच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला. बंगळुरु संघाने हा विजय 10 धावांनी मिळवला.
छत्तीसगड राज्यात विजापूर येथील एका नदीवरुन जाताना एक बस पूलावरुन पाण्यात कोसळली. नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करुन परतनारे सरकारी कर्मचारी या बसमधून प्रवास करत होते.
मुंबईतील इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरुन आज एका 8 फूट लांबीच्या अजगाराची सुटका करण्यात आली. अजगराची सुटका करताना काही काळ वाहतूक कोंडीही झाली. मात्र, अजगराला जीवदान मिळाले. एका कारमधून या अजगराची सुटका करण्यात आली.
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray यांना मुंबई-मांडवा रो-रो बोट (Raj Thackeray In Mumbai-Mandwa RoRo) प्रवासात बेकायदेशीररित्या धुम्रपाण (Raj Thackeray Smoking) केल्याबद्दल दंड आकारण्यात आल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र, हे वृत्त केवळ दिशाभूलच करणारे नव्हे तर पूर्णपणे चुकीचे असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हटले आहे.
शेती बिलास विरोध करणाऱ्या 8 खासदारांचे निलंबन म्हणजे हा लोकशाहीवरील हल्ला आहे, अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
पंजाबमध्ये आज 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 2,247 नव्या कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली आहे. सध्या राज्यात 21,661 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे की, विविध पिकांच्या किमान आधारभूत किंमती वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकर्यांच्या सुधारणांच्या विधेयकाबाबत 'दिशाभूल' करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यांनी शेतकऱ्यांची 'माफी मागितली पाहिजे', असेही नड्डा म्हणाले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या पाच पैकी चार सदस्यांनी जागतिक संघटनेच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला द्विपक्षीय पाठिंबा दर्शविला आहे: केंद्र सरकार
आयपीएल 2020 च्या तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स हैदराबादसमोर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने 164 धावांचे आव्हान ठेवले आहे. 20 षटकांच्या सामन्यात आरसीबीने 5 गडी बाद 163 धावा काढल्या. देवदत्त पडीक्कल याने सर्वाधीक 56 धावा काढल्या.
राज्यसभेत काल मतदान न घेताच विधेयकं मंजूर करण्यात आली. पीठासीन अधिकाऱ्याची ही चुक आहे. परंतू, त्याची शिक्षा राज्यसभा सद्यांना दिली जात आहे, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद यांनी दिली आहे. कृषी विधेयकावरील चर्चेवेळी विरोधकांनी राज्यसभेत काल गदारोळ केला. या वेळी उपसभापतींच्या आसनासमोरील ध्वनीक्षेपक खेचण्यात आला होता.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेली आणि सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया यांनी तयार केलेली COVID19 वरील तिसऱ्या टप्प्यातील लसीची मानवशास्त्रीय चाचणी पुण्यात सुरु झाली आहे.
आज पहाटे भिवंंडी (Bhiwandi Building Collapsed) मधील एक इमारत कोसळली आहे ज्यामध्ये 10 जणांंचा दुर्दैवी मृत्यु झाल्याचे समजतेय. याठिकाणी सध्या NDRF चं पथक मदत कार्य करत असुन आणखीन काही जण ढिगार्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे.
(Monsoon Update) हवामान खात्याच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आज मुंंबई, ठाणे, कोकण, गोवा येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्या सुद्धा पावसाचा जोर कायम राहणार आहे अशी माहिती आयएमडी कडुन देण्यात आली आहे.
दुसरीकडे, मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी स्थगिती दिल्याच्या कारणाने आज सोलापूर मध्ये जिल्हा बंद पुकारलेला आहे. यावेळी आमदार व खासदारांच्या घरासमोर जाउन निदर्शन केली जातील अशी माहिती मिळतेय तर काही वेळापुर्वी आंदोलकांनी पंढरपूर पुणे महामार्ग अडवुन धरला आहे. याठिकाणी एक मराठा लाख मराठा च्या जोरदार घोषणा देत दोन्ही बाजूची वाहतूक आंदोलकांनी अडवली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना व्हायरस रिकव्हरी च्या बाबत एक चांंगली माहिती समोर येतेय. केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार जगभरात कोरोनाच्या रिकव्हरीमध्ये भारत सध्या टॉप ला आहे, भारतात आजवर 43 लाखाहुन अधिक रिकव्हरी झाल्या असुन ही संख्या जागतिक रिकव्हर रुग्णांंच्या संख्येचा 19% भाग आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)