भारतात कोरोना व्हायरस ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा 315 वर जाऊन पोहोचला आहे. भारतीय वैद्यकिय संशोधन केंद्राने (ICMR) हा रिपोर्ट दिला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या (22 मार्च)ला आयोजित केलेल्या जनता कर्फ्यू ला राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देत लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन शरद पवारांनी केले आहे.
मुंबईची लाईफलाईन मानली जाणा-या मुंबई लोकल प्रवासाचे नवीन नियम लागू करण्यात आले आहे. कोविड-19 वाढत चाललले जाळे लक्षात घेता उद्यापासून केवळ अत्यावश्यक म्हणजेच वैद्यकीय सेवेसाठी आणि महत्त्वाच्या कामांकरिताच लोकांना प्रवास करता येणार आहे. विनाकारण प्रवास करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वे विभागाकडून सांगण्यात येत आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज दुपारी मध्य रेल्वे पोलिसांनी Quarantine चा स्टॅम्प असलेल्या 15 लोकांना ताब्यात घेतले. हे लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी निघाले होते. त्यावेळी मध्य रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखवत ही कारवाई केली. या पाचही लोकांना वरळी येथील आयसोलेशन केंद्रात पाठविण्यात आले आहे.
सध्या कोरोना व्हायरसमुळे राज्यातील अनेक शहरे लॉकडाऊन केली आहेत. या संकटकाळात उपाययोजना म्हणून प्रशासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. अशात नागपूरमध्ये पहिल्याच दिवशी हे नियम मोडल्याने 348 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. नागपूरचे शहर पोलीस आयुक्त बीके उपाध्याय यांनी ही माहिती दिली.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्या शहरांतील अनेक लोक आपापल्या गावाकडे परत जात आहेत. मात्र गर्दीत प्रवास केल्याने या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 1208 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या 64 आहे.
सध्या कोरोना व्हायरस काळात उपाययोजना म्हणून अनेक सुविधा काही काळाकरिता बंद करण्यात आल्या आहेत. अशात रेल्वेने सर्व रेल्वे संग्रहालये, हेरिटेज गॅलरी आणि हेरिटेज पार्क 15 एप्रिलपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
सध्याच्या कोरोना व्हायरसच्या संकटकाळात सरकार अनेक उपाय योजना राबवत आहे. अशा परिस्थितीमध्ये केमिस्ट आणि फार्मा कंपन्यांनी गोष्टींचा 24X7 पुरवठा करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
पीएमसी बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेवर अनेक निर्बंध घातले होते. आता आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेवरील नियामक निर्बंध 22 जूनपर्यंत, 3 महिन्यांसाठी वाढविण्यात आले आहेत.
भारतातील कोरोना व्हायरसची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात एकूण 283 लोक कोरोना विषाणूमुळे संक्रमित झाले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. बालाजी संभाजी डाखोरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. बालाजी डाखोरे यांनी स्वतःच्याच शेतामध्ये पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 294 वर पोहचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63 वर पोहचली आहे.
SSC Board Exam 2020 मधील 23 मार्चचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. 31 मार्च नंतर नवी तारिख जाहीर केली जाईल. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. अशातचं भारतातील रुग्णांमध्येदेखील वारंवार वाढ होत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 223 वर पोहचली आहे. राज्यात पिंपरी चिंचवड, पुणे येथे प्रत्येकी एक तर मुंबई येथे दोन, असे चार नवे रुग्ण आढळल्याने कोरोना रुग्णांची संख्या 52 झाली आहे. यातील 41 जणांची प्रकृती उत्तम आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मुंबईसह नागपूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या चार शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे या सारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच कोरोनाच्या भीतीमुळे मूळ गावी परतण्यासाठी नागरिकांची रेल्वे स्थानकांवर गर्दी केली आहे. तसेच उद्या म्हणजेच 'जनता कर्फ्यू'च्या दिवशी अनेक एक्स्प्रेस रेल्वे गाड्या आणि लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटाझरच्या वाढत्या किंमती निश्चित केल्या आहेत. केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी शुक्रवारी ट्विट करत ही माहिती दिली. 200 मिली सॅनिटायझरची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त राहणार नाही. तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत 2 आणि 3 प्लाय मास्कमध्ये वापरल्या जाणाऱ्या कपड्याची किंमत 12 फेब्रुवारी 2020 रोजी जशी होती तशीच राहणार आहे. तसंच 2 प्लाय मास्कची किरकोळ किंमत 8 रुपये आणि 3 प्लाय मास्कची किंमत 10 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही, असेही राम विलास पासवान यांनी सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांना स्वस्त दरात मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध असणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)