BJP MLC सुनील कुमार सिंह यांचा एम्स पटना येथे कोरोना व्हायरसमुळे मृत्यू; 21 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

कोरोना व्हायरस सारख्या आजाराचे जगभरावर आलेले संकट आणि निर्माण झालेली अभूतपूर्व स्थिती. या सर्वांमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये एक कोंडी निर्माण झाली आहे. सर्वांचीच स्थिती चुका आणि शिका अशी झाली आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत.

22 Jul, 05:14 (IST)

बिहार येथील BJP MLC सुनील कुमार सिंह यांचा एम्स पटना येथे कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

22 Jul, 05:02 (IST)

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत आढळून आले होते. आता मुंबई पाठोपाठ ठाण्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ठाण्यात आज 1 हजार 323 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 40 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-

 

22 Jul, 04:16 (IST)

मुंबईच्या कूपर हॉस्पिटलमध्ये कोरोना विषाणू रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला होता व रुग्णालय आणि मनपा अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचे आरोप केले होते. त्यावर बीएमसीने उत्तर दिले आहे.  बीएमसीने सांगितले आहे, 'हॉस्पिटल मॅनेजमेंटने आयसीएमआर मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरविलेल्या गोष्टी केल्या आणि रूग्णाला त्वरित भर्ती करून घेऊन आवश्यक उपचार देण्यात आले. त्यामुळे रुग्णालय निष्काळजी होते हे खरे नाही.

या मुलाच्या तोंडातून रक्तस्त्राव होत होता आणि त्याला तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. या मुलामध्ये निमोनियाची लक्षणे दिसली होती. न्यूमोनिया आणि कोविडची लक्षणे समान आहेत. मृत्यूचे कारण निमोनिया आणि संशयित कोविड म्हणून नोंदवले गेले. आयसीएमआर प्रोटोकॉलनुसार त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला परंतु कुटुंबीय संतप्त झाले, असे बीएमसीने सांगितले आहे.

 

22 Jul, 03:41 (IST)

शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. स्वतः सत्तार यांनी ट्वीट द्वारे ही माहिती दिली आहे. घाबरण्याची आवश्यक्ता नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

22 Jul, 03:32 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 1,512 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे. यासह पुणे शहरातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 40,715 इतकी झाली आहे.

22 Jul, 03:23 (IST)

बिहारमधील पूर परिस्थिती लक्षात घेता राज्यात NDRF ची 19 पथके तैनात आहेत.  सत्य प्रधान, एनडीआरएफचे महासंचालक यांनी याबाबत माहिती दिली.

22 Jul, 02:52 (IST)

17 जुलै रोजी विशेष विमानाने मुंबई विमानतळामार्गे दुबईला पळ काढल्याबद्दल पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील 30 वर्षीय महिलेविरूद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. या महिलेची कोरोना विषाणू चाचणी सकारात्मक आली होती.

22 Jul, 02:29 (IST)

दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी भारतात 1 ऑगस्ट, शनिवार रोजी बकरी ईद साजरी केली जाण्याची घोषणा केली. 

22 Jul, 02:20 (IST)

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी स्टेटमेंट नोंदवण्यासाठी आलेले चित्रपट समीक्षक राजीव मसंद वांद्रे पोलीस ठाण्यातून निघाले.

22 Jul, 01:53 (IST)

आज मुंबईत 995 नवीन कोविड-19 पॉझिटिव्ह, 905 रुग्णांना डिस्चार्ज आणि 62 मृत्यूची नोंद झाली आहे. एकूण प्रकरणांची संख्या वाढून 1,03,262 वर गेली आहे, ज्यात 23,893 सक्रिय प्रकरणांचा समावेश आहे, तर 73,555 बरे झाले आहेत, तर एकूण 5,814 लोकांचा मृत्यू झाला आहे.

22 Jul, 01:45 (IST)

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) विद्यार्थी आणि दिल्ली हिंसाचाराच्या कट रचल्याचा आरोपीशार्जील इमाम कोरून पॉसिटीव्ह असल्याचे वृत्त समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुवाहाटी मध्यवर्ती कारागृहात बंद असल्याने शार्जीलला दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल शार्जिलला घेण्यासाठी आसामला गेले होते.

22 Jul, 01:35 (IST)

महाराष्ट्रात आज 8,369 नवीन कोविड-19 रुग्ण समोर आले आणि 246 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सकारात्मक घटनांची संख्या 3,27,031 आहे, त्यापैकी 1,82,217 रुग्ण बरे झाले आहे तर 1,32,236 सक्रिय प्रकरणं आहेत.

22 Jul, 01:35 (IST)

महाराष्ट्रात आज 8,369 नवीन कोविड-19 रुग्ण समोर आले आणि 246 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सकारात्मक घटनांची संख्या 3,27,031 आहे, त्यापैकी 1,82,217 रुग्ण बरे झाले आहे तर 1,32,236 सक्रिय प्रकरणं आहेत.

22 Jul, 01:27 (IST)

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप कंपन्यांना पत्र लिहिले आणि म्हणाले की बंदी घातलेल्या अ‍ॅप्सची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उपलब्धता अवैध आहे. भारत सरकारने मागील महिन्यात 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. यात TikTok समवेत प्रसिद्धअ‍ॅप्सचा समावेश आहे.

22 Jul, 01:03 (IST)

कोरोना व्हरायसच्या पार्श्वभूमीवर यंदा होणारी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. याबाबत अमरनाथ श्राईन बोर्डाने घोषणा केली आहे.

22 Jul, 01:01 (IST)

कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल 2020 आता युएईमध्ये होणार आहे. आम्ही सरकारच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. आम्ही आयपीएलच्या जनरल कौन्सिलच्या पुढील कारवाई विषयी चर्चा करू:आयपीएलचे अध्यक्षब्रिजेश पटेल यांनी दिली माहिती

22 Jul, 24:57 (IST)

नेपाळ सरकारने 24 मार्च पासून कोरोना व्हायरसअभावी लादलेला लॉकडाऊन संपवण्याची घोषणा केली आहे.

22 Jul, 24:49 (IST)

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारला सवाल केला. फडणवीस म्हणाले,"कोरोना टेस्ट सातत्याने कमी करण्यामुळे आपण काय कमाविले आणि काय गमाविले? महाराष्ट्रातील संसर्गाचा दर अगदी प्रारंभी जो 6 ते 7 % होता, तो 8 जूनपर्यंत 17-18 टक्क्यांवर आला आणि आता 23 ते 24 %."

22 Jul, 24:20 (IST)

स्पेशल पीएमएलए (प्रतिबंधित मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट) प्रकरणात Yes Bank चे संस्थापक राणा कपूर यांनी दाखल केलेली जामीन याचिका कोर्टाने फेटाळली.

21 Jul, 23:51 (IST)

मुंबईच्या धारावी क्षेत्रात आज 10 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली असून एकूण 2,502 प्रकारणांपैकी 151 प्रकरणे सक्रिय आहेतः बृहन्मुंबई महानगरपालिकेची माहिती

Read more


कोरोना व्हायरस (Coranavirus), लॉकडाऊन, शासन, प्रशासन आणि जनता एकूणच संभ्रमाचे वातावरण आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश आणि जगभरातही. कोरोना व्हायरस सारख्या आजाराचे जगभरावर आलेले संकट आणि निर्माण झालेली अभूतपूर्व स्थिती. या सर्वांमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये एक कोंडी निर्माण झाली आहे. सर्वांचीच स्थिती चुका आणि शिका अशी झाली आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत.

भारतही कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन यांमधून बाहेर पडायचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्र सरकारचाही असाच प्रयत्न सुरु आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप तरी कोणतेही औषध, लस अथवा उपचार निघाला नाही. त्यामुळे कोरोना व्हायरस भीतीची छाया किती काळ राहू शकेल याबाबत साशंकता आहे. अशा स्थिती मिशन बिगिनिंग अगेन म्हणत महाराष्ट्र सरकारने हळूहळू सुरुवात केली आहे खरे. परंतू, नागरिकांच्या मनात अद्यापही भीती कायम असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. त्याचा परिणाम राज्यातील उद्योग, व्यवसाय आदींवर मोठ्या प्रमाणात होताना दिसू लागला आहे. उद्योगांना कामगार नाहीत, दुकानदारांना ग्राहक नाहीत, उपहारगृहं रिकामी आहेत अशी स्थिती आहे.

दरम्यान, भारत कोरोना व्हायरस संकटाशी तोंड देत असतानाच शेजारी राष्ट्र चीनने पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. त्यामुळे या देशासोबत पुन्हा एकदा नव्याने संघर्ष सुरु झाला आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग या क्षेत्रात काम करण्याचे भारतासमोर आव्हान आहेच. त्यातच चीनच्या संघर्षामुळे तणाव वाढला आहे. स्थानिक, प्रादेशिक, देश-विदेशातील घटना घडोमोडी यांचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडेलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now