पंजाबमधील किसान आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम; पश्चिम रेल्वेची माहिती; 21 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

दुसऱ्या बाजूला देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. अशा या कडाक्याच्या थंडीतही राजधानी दिल्ली येथे देशभरातील शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी काद्याविरोधात हे शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पाडल्या. मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही.

22 Dec, 04:58 (IST)

पंजाबमधील किसान आंदोलनामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच काही गाड्या वळविण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. ट्विट-

 

22 Dec, 04:50 (IST)

पुण्यातील रेल्वे पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 1.2 कोटी रुपयांचे 34 किलो चरस जप्त केले. ट्विट-

 

 

22 Dec, 04:26 (IST)

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांच्या निधनाबद्दल छत्तीसगडमध्ये 21 ते 23 डिसेंबर दरम्यान तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने ही माहिती दिली.

22 Dec, 04:24 (IST)

मध्य प्रदेश: सिओनी जिल्ह्यातील बंडोल भागात आज सकाळी कारशी झालेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

22 Dec, 03:51 (IST)

आज अभिनेता अर्जुन रामपाल यांची एनसीबीद्वारे चौकशी पार पडली. मात्र त्याच्या विधानात विसंगती होती व त्यामुळे पुन्हा एकदा त्याला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मुंबई चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली.

22 Dec, 03:02 (IST)

आसाम: मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत 8 अतिरेकी गटांच्या 63 कार्यकर्त्यांनी आज गुवाहाटी येथे झालेल्या कार्यक्रमात आत्मसमर्पण केले.

22 Dec, 02:28 (IST)

पश्चिम बंगालमध्ये आज 1,515 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय 2,342 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

22 Dec, 02:13 (IST)

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने सुरुवातीला 7 जानेवारी 2021 पर्यंत लसीकरणासाठी आपल्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 8 बीएमसी रुग्णालयांनी तयारी सुरू केली आहे.

22 Dec, 01:56 (IST)

कर्नाटकमध्ये आज 772 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. याशिवाय आज 1,261 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. परंतु, दुर्दैवाने 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

22 Dec, 01:39 (IST)

गुजरातमध्ये आज 960 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,36,259 इतकी झाली आहे.

22 Dec, 01:16 (IST)

मणिपूरमध्ये आज 38 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याशिलाय 133 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

22 Dec, 01:06 (IST)

व्हाइस अॅडमिरल संदीप नैथानी यांनी आज Controller Warship Production and Acquisition म्हणून पदभार स्वीकारला आहे.

 

22 Dec, 24:34 (IST)

उत्तराखंडमध्ये आज 448 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

 

22 Dec, 24:00 (IST)

महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान Night Curfew जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय युरोप आणि मध्यपूर्वेकडून परत आलेल्या नागरिकांना 14 दिवस सक्तीचे क्वारटाईन करण्यात येणार आहे.

 

21 Dec, 23:31 (IST)

केरळमध्ये आज 3423 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून राज्यात सध्या 60,504 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यातील 6,45,779 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

21 Dec, 23:21 (IST)

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने एकत्र येण्यास परवानगी देणारी हॉटेल्स, पार्टी हॉल आणि आयोजकांवर कडक कारवाई केली जाईल. आम्ही लोकांना मास्क परिधान करण्याची विनंती करतो, असं कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी म्हटलं आहे.

21 Dec, 23:00 (IST)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत निधी हस्तांतरित करण्याची विनंती केली.

21 Dec, 22:45 (IST)

इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी हे आमचे ध्येय असल्याचं  व्हिएतनामीचे पंतप्रधान Nguyen Xuan Phuc यांच्यासमवेत आभासी शिखर परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

21 Dec, 22:34 (IST)

केंद्राच्या कृषी कायदा आणि कृषी धोरणाविरोधात सुरु असलेल्या आंदोलानात सहभागी होण्यासाठी नाशिकमधील शेतकरी संघटना, शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले. ते शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.

21 Dec, 22:11 (IST)

पश्चिम बंगालः भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेन्दु अधिकारी यांनी आज कोलकात्यातील राजभवनात राज्यपाल जगदीप धनखार यांची भेट घेतली.

Read more


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी रविवारी संवाद साधला. या संवादानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असून, पुन्हा एकदा सरकार विरुद्ध विरोधक असा सामना पाहायाला मिळत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवादादरम्यान, मुंबई येथील कांजूरमार्ग मेट्रो कारशेड जागेबाबतचा मुद्दा जनहीत डोळ्यासमोर ठेऊन सोडवायला हवा. त्यासाठी विरोधकांसोबतही आमची चर्चेची तयारी आहे. वेळ पडली तर त्याचे श्रेय आम्ही विरोधकांना द्यायला तयार आहोत, असे म्हटले. त्यावरुन रपाज्यातील भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे.

राज्यासह देशातील कोरोना व्हायरस नियंत्रणात येत असल्याचे चित्र असतानाच जगासमोर नवे आव्हान उभे ठाकताना पाहायला मिळत आहे. कारण इंग्लंड आणि इतर काही देशांमध्ये पुन्हा एकदा नव्याच प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे जगाच्या चिंते पुन्हा एकदा नव्याने भर पडली आहे. अशात जगभरातील विविध देशांनी नववर्ष आणि नाताळ सणाला जमणारी गर्दी विचारात घेता पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता भारतात काय होणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नाही. मात्र, किमान पुढचे 6 महिने मास्क वापरणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, सरत्या वर्षात आलेली मरगळ, कोरोनाने वाया घालवलेले दिवस या सर्व गोष्टी झटकून राज्यातील नागरीक नव्या उत्साहाने 2021 या वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी रिसॉर्ट, कृषी पर्यटन आणि सहलिांना प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळते. अनेक रिसॉर्ट मालक, व्यवस्थापक सांगतात की नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट बूक करण्यास प्राधान्य देत आहेत. सामूहिक बुकींगही मोठ्या प्रमाणावर होत आहे. नागरिक 20 ते 25 जणांच्या समूह करुन बुकींग करण्यास प्राधान्य देत आहेत.

दुसऱ्या बाजूला देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. अशा या कडाक्याच्या थंडीतही राजधानी दिल्ली येथे देशभरातील शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी काद्याविरोधात हे शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पाडल्या. मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात संवाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाचे संकट अद्यापही कायम आहे. त्यामुळे अद्यापही धोका टळला नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी असे अवाहन केंद्र आणि राज्य सरकारने केले आहे. जगभरातील विविध क्षेत्रातील बातम्या, घडामोडी यांबाबतचे ताजे तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now