भारतामध्ये 2021 ची जणगणना 'मोबाईल अॅप' च्या मदतीने होणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी जनगणना ही मोबाईल अॅपच्या मदतीने होणार आहे. त्यासाठी सुमारे 12000 कोटी रूपयांचा खर्च येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
2021 Census of India: जनगणना 2021 आणि राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर (एनपीआर) साठी सरकार कामाला लागले आहे. दर 10 वर्षांनी भारतामध्ये जनगणना केली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी जनगणना ही मोबाईल अॅपच्या मदतीने होणार आहे. त्यासाठी सुमारे 12000 कोटी रूपयांचा खर्च येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आज अमित शहा यांनी जनगणना भवनाची पायाभरणी केली. दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.
1865 नंतर आता 2021 मध्ये देशात 16वी जनगणना होणार आहे. सरकारी योजनांमध्ये जनगणना महत्त्वाची आहे. त्याअनुसार काही योजना ठरवल्या जातात. यंदा पहिल्यांदा जनगणनेसाठी कागदाऐवजी डिजिटल पर्याय वापरला जाणार आहे. 2021 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर (एनपीआर) सुरू केले जाणार आहे. ही सुरूवात देशात गेम चेंजर ठरेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे. डिजिटल जनगणनेचे अधिक फायदे आहेत असे त्यांचे मत आहे. एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याची माहिती आपोआपच मिळणार आहे.
ANI Tweet
2011 साली करण्यात आलेल्या जनगणनेनुसार, भारताची लोकसंख्या सुमारे 121 कोटी इतकी होती. आता मोबाईल अॅपचा वापर करून 2021 साली जनगणना केली जाणार आहे. मार्च महिन्यात सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दोन टप्प्यात जनगणना होईल. 1 मार्च 2021 पासून त्याला सुरूवात होईल. जम्मू कश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यासारख्या बर्फाळ भागामध्ये ऑक्टॉबर 2020 पासून जनगणनेच्या कामाला सुरूवात होणार आहे.