Bengaluru Shocker: रील शूट करताना 20 वर्षीय महिलेचा 13 व्या मजल्यावरून पडून मृत्यू

पोलिसांनी सांगितले की, ही मुलगी सोशल मीडियासाठी 'रील' शूट करताना ही दुर्घटना घडली. या मुलीचे नाव नंदिनी होते आणि ती बेंगळुरूमधील एका शॉपिंग मार्टमध्ये काम करत होती.

Bengaluru Shocker: रील शूट करताना 20 वर्षीय महिलेचा 13 व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Death प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Bengaluru Shocker: बेंगळुरूमधून (Bengaluru) अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. येथे मित्रांसोबत पार्टी करायला गेलेली एक मुलगी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 13 व्या मजल्यावरून पडली. तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, ही मुलगी सोशल मीडियासाठी 'रील' शूट करताना ही दुर्घटना घडली. या मुलीचे नाव नंदिनी होते आणि ती बेंगळुरूमधील एका शॉपिंग मार्टमध्ये काम करत होती.

प्राप्त माहितीनुसार, रात्री उशिरा ती तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करत असताना ही घटना घडली. बेंगळुरूच्या रायसंद्रा येथे असलेल्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 13 व्या मजल्यावर मुलगी तिच्या दोन पुरुष आणि एका महिला मैत्रिणीसोबत पार्टी करत होती. मालकीच्या वादामुळे ही इमारत रिकामी असून तिच्या लिफ्ट शाफ्टवर कोणतेही सुरक्षा कव्हर नाही. (हेही वाचा - Himachal Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे पाच जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता (Video))

रील बनवताना घसरला पाय -

प्रियकराशी वाद झाल्यानंतर मुलगी दुःखी रील बनवण्यासाठी छतावर गेली. रील शूट करताना, तिचा पाय घसरला आणि ती चुकून एका शाफ्टमध्ये पडली, जिथे भविष्यात लिफ्ट बसवायची होती. घटनेनंतर, तिचे पुरुष मित्र तेथून पळून गेले. परंतु, महिला मैत्रिणी मागेच राहिली. तिने 112 वर फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचा अहवाल दाखल केला आहे. तथापी, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 27, 2025 02:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).