राजस्थान मध्ये काही जिल्ह्यात उद्या पासुन पुन्हा कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागु ; 20 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

21 Sept, 05:04 (IST)

राजस्थानचे मुख्यमंंत्री अशोक गेहलोत यांंनी सांंगितल्यानुसार उद्या जयपूर, जोधपूर, कोटा, अजमेर, अलवर, भिलवाडा, बीकानेर, उदयपूर, सीकर, पाली आणि नागौर या जिल्ह्यात कलम 144 अंतर्गत संचारबंंदी लागु करण्यात येणार आहे.

21 Sept, 04:48 (IST)

एखाद्या राजकीय पक्षाने मुंबई ला पाकिस्तान आणि पोलिसांना माफिया असे संबोधणार्‍या व्यक्तीला (मी त्या अभिनेत्रीचे नाव घेऊ इच्छित नाही ती तितकी पात्र नाही) पाठिंंबा दिला तर याचा विचार नागरिकांंनी केला पाहिजे असे आज महाराष्ट्राचे गृहमंंत्री अनिल देशमुख यांंनी एका कार्यक्रमात म्हंंटले आहे.

21 Sept, 04:33 (IST)

आज राज्यसभेत उपसभापती हरिवंश यांच्याशी गैरवर्तन करणार्‍या खासदारांना निलंबित करण्यासाठी राज्यसभेच्या कार्यपद्धती आणि व्यवहाराच्या नियमावली 256 अन्वये उद्या संसदीय कामकाज मंंत्री ठराव मांंडणार आहेत, या नुसार उद्या निलंबनाचा निर्णय सभापती घेण्याची शक्यता असल्याचे सुत्रांंकडुन कळत आहे.

21 Sept, 04:19 (IST)

पिंंपरी चिंंचवड मध्ये कोरोनाबाधितांंची एकुण संंख्या 70, 172 वर पोहचली आहे. आजच्या दिवसात महापालिका क्षेत्रात 749 नवे  रुग्ण आढळुन आले आहेत. एकुण बाधितांंपैकी केवळ 8,894 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

21 Sept, 04:10 (IST)

आसाम मध्ये आजच्या दिवसात कोरोनाचे 1227 रुग्ण आढळुन आले आहेत यानुसार कोरोनाबाधितांंची एकुण संख्या 1,56,680 इतकी झाली आहे. मागील 24 तासात 1795 रुग्णांंना डिस्चार्ज देण्यात आला असुन आतापर्यंत 1,25,540 जण रिकव्हर झाले आहेत. आसाम मध्ये आजवर 562 मृत्यु झाले आहेत आणि सध्या 30,575 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

21 Sept, 03:48 (IST)

लोकसभेत मंत्र्यांंचे वेतन आणि भत्ते (दुरुस्ती) विधेयक 2020 मंजुर करण्यात आले आहे.

21 Sept, 03:37 (IST)

जम्मू-काश्मीर च्या सोपोर पोलिसांनी 22 आरआर आणि सीआरपीएफसह अल बद्र दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी जाहिद फारूक आणि शरीफ-उद-दिन अहंजर यांना अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रे व दारूगोळा जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

21 Sept, 03:21 (IST)

लोकसभेत नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी विधेयक 2020 मंजुर झाले आहे.

21 Sept, 03:14 (IST)

जगभरात कोरोनावरील 145 लसींंच्या चाचण्या सुरु आहेत. यापैकी 35 लसी या क्लिनिकल चाचण्यांंच्या टप्प्यात आहे. भारतात सुद्धा 30 लसींंची चाचणी सुरु आहे यातील 3 या अ‍ॅड्व्हान्स टप्प्यात आहेत आणि 4 या प्री क्लिनिकलच्या अ‍ॅडव्हान्स टप्प्यात आहेत. केंद्रीय आरोग्यमंंत्री डॉ.हर्षवर्धन यांंनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

21 Sept, 02:56 (IST)

पुर्व लडाख क्षेत्रातील चुशुल / मोल्दो येथे उद्या भारत आणि चीन यांच्यात 6th Corps  कमांडर स्तरावर चर्चा होणार आहे.

21 Sept, 02:25 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 20,598 रुग्ण आढळले असून 455 जणांचा गेल्या 24 तासात बळी गेला आहे.

21 Sept, 02:13 (IST)

गोव्यात कोरोनाचे आणखी 407 रुग्ण आढळले असून 9 जणांचा गेल्या 24 तासात बळी गेला आहे.

21 Sept, 01:49 (IST)

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी NCB ने  जया शहा आणि श्रुती मोदी यांना समन्स पाठवले आहेत.

21 Sept, 01:36 (IST)

दिल्लीत कोरोनाचे आखणी 3812 रुग्ण आढळले तर 37 जणांचा बळी गेला आहे.

21 Sept, 01:22 (IST)

MSP आणि APMC यंत्रणा संपुष्टात येणार नसल्याचे राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे.

21 Sept, 01:19 (IST)

आजचा दिवस हा इतिहासातील 'काळा दिवस' असे राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

21 Sept, 01:11 (IST)

राज्यसभेत आज जे काही झाले ते अत्यंत दु:खद आणि निंदनिय असल्याचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

21 Sept, 01:08 (IST)

दिल्लीत सुरक्षामंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे.

21 Sept, 24:57 (IST)

कर्नाटक येथे कोरोनाचे आणखी 8191 रुग्ण आढळले असून 101 जणांचा बळी गेला आहे.

21 Sept, 24:42 (IST)

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची  संध्याकाळी 7.30 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर, प्रल्हाद जोशी, पियुष गोयस, थेवरचंद गहलोत आणि मुख्यतर अब्बास नकवी सुद्धा उपस्थिती असणार आहे. 

Read more


भारताभोवती कोरोना व्हायरसचा (Coronavirus)  विळखा अधिकाधिक घट्ट होत चालला असून हा विषाणून गेले कित्येक महिने भारतात ठाण मांडून बसला आहे. यामुळे देशात (India) दिवसागणिक कोरोना संक्रमितांची वाढ देखील झपाट्याने होत आहे. याच धर्तीवर भारतात मागील 24 तासांत 12 लाखांहून अधिक कोविड चाचण्या (COVID-19 Tests) घेण्यात आल्या आहेत. हा आतापर्यंतचा सर्वाधिक रेकॉर्ड आहे. तसेच देशात आतापर्यंत एकूण 6.37 कोटीहून अधिक कोरोना चाचण्या झाल्याची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढत असून राज्यात काल (19 सप्टेंबर) 21,907 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 11,88,015 वर पोहोचली आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 23,501 एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 8,57,933 वर पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तर मुंबई (Mumbai) शहरामध्ये काल कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 2,211 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह शहरामधील एकूण संक्रमितांची संख्या 1,82,077 वर पोहोचली आहे. आय सी एम आर पोर्टलवरील रिकंसीलेशन नुसार 676 बाधित रुग्ण दुहेरी नोंद असल्यामुळे प्रगतीपर अहवालातून कमी करण्यात आले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now