Fatehabad Dog Attack: पाळीव कुत्र्याने दीड वर्षाच्या मुलीला ओरबाडले, मालकावर गुन्हा दाखल

या कुत्र्यांना आता 15 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

Dog (Representational Image; Photo Credit: Pixabay)

हरियाणातील फतेहाबाद येथील एका गावात दीड वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत असताना दोन पाळीव कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला, असे पोलिसांनी रविवारी सांगितले. शेजाऱ्याच्या कुत्र्याने तिला ओढून नेल्याने आणि चावल्याने चिमुकलीला गंभीर दुखापत झाली. प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी (22 नोव्हेंबर) ही घटना घडली जेव्हा ती मुलगी तिच्या भावासोबत खेळत होती. कुत्र्यांनी तिला शेडमध्ये नेऊन तीला ओरबडले.  (हेही वाचा - ST Bus Accident: सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरुन जाणार्‍या धावत्या एसटी बसचं चाक निखळल्याने अपघात)

मुलांचा आरडाओरडा ऐकून त्यांच्या काकांनी घटनास्थळी धाव घेत मुलाची सुटका केली. कुटुंबीयांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. कुत्र्याच्या हल्ल्यानंतर, कुत्र्यांचा मालक, सुरेंद्र याच्या विरोधात निष्काळजीपणाशी संबंधित भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 289 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. या कुत्र्यांना आता 15 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की फतेहाबादमध्ये कुत्रा चावल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेली ही पहिलीच घटना आहे. सदर पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी रविंदर कुमार यांनी या प्रकरणाच्या तपशीलाला दुजोरा दिला आणि सांगितले की, "मुलावर सध्या उपचार सुरू आहेत आणि तिच्या शरीरावर आठ ठिकाणी चावल्याचे आढळले आहे." या घटनेचा पुढील तपास हा सुरु आहे.