60 किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील एकूण 8 हजार 523 नागरिकांना कोरोनाची लस टोचली; 2 मार्चच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

03 Mar, 05:21 (IST)

60 किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील एकूण 8 हजार 523 नागरिकांना कोरोनाची लस टोचली आहे. तसेच गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या 45-59 वयोगटातील नागरिकांचाही यात समावेश आहे. ट्वीट-

 

03 Mar, 04:11 (IST)

आता मुंबईमध्ये बीएमसी केंद्रांव्यतिरिक्त 29 खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना व्हायरस लसीकरण मोहीम राबविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

03 Mar, 04:00 (IST)

नोएडामध्ये घरे फोडून मौल्यवान वस्तू चोरी केल्याच्या आरोपाखाली 2 स्विगी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनाअटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. या दोघांनाही निलंबित केले आहे.

03 Mar, 03:13 (IST)

पुणे शहर पोलीस आणि मिलिटरी इंटेलिजन्स संयुक्त कारवाईत सैन्य भरती परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणात 2 सेवेतील संरक्षण कर्मचारी, एक संरक्षण नागरीक आणि 2 माजी सैन्य दलाच्या जवानांसह सात जणांना अटक केली. दोन वेगवेगळ्या एफआयआर नोंदविण्यात आल्या असून त्यामध्ये दहा जणांची नावे आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

03 Mar, 02:41 (IST)

गायक Jubin Nautiyal यांनी आपत्ती निवारण उपाययोजनांसाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांना 13.91 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

03 Mar, 02:31 (IST)

पत्रकार दिनेश कानजी याने घेतलेल्या मुलाखतीत आशिष शेलार यांनी अनेक विषयांवर सविस्तर भूमिका मांडली आहे. ट्विट-

 

03 Mar, 02:00 (IST)

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले आहे. ट्वीट-

 

03 Mar, 01:46 (IST)

महाराष्ट्र राज्यात आज 7863 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6332 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2036790 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 79093 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.89% झाले आहे.

03 Mar, 01:29 (IST)

केरळमध्ये आज आणखी 2 हजार 938 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 16 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-

 

03 Mar, 01:00 (IST)

मुंबईत आज आणखी नवीन 849 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-

 

03 Mar, 24:14 (IST)

तिसर्‍या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला पुणे महानगरपालिका हद्दीतही सुरवात झाली आहे. कोरोना लसीकरण मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यात ज्येष्ठांना आणि व्याधींनी ग्रस्त असलेल्या (45 वर्षांपुढील) नागरिकांना लसीकरणाची संधी मिळत आहे. ट्वीट-

 

02 Mar, 23:43 (IST)

जागतिक शेअर बाजारातील तेजीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 447 अंकांची वाढ झाली आणि तो 50 हजार 297 अंकांवर बंद झाला आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 158 अंकांची वाढ नोंदवत 14 हजार 919 अंकांवर बंद झाला आहे. ट्वीट-

 

02 Mar, 23:06 (IST)

भारतात दररोज दशलक्ष लोकांच्या तुलनेत 113 जणांचा मृत्यू होत आहे, तर, 1 लाख 57 हजार 684 जणांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहे. ट्वीट-

 

 

02 Mar, 22:18 (IST)

येत्या 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या वीजबंदी संदर्भातील मी सर्व अहवाल उद्या विधानसभेत देईन, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

 

02 Mar, 22:14 (IST)

मुंबई येथील वीज बंद प्रकरण हा तांत्रिक विषय आहे. हा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना समजू शकणार नाही, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

 

 

02 Mar, 21:56 (IST)

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना नवी दिल्लीतील आरआर हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.

 

02 Mar, 21:30 (IST)

सायबर-हल्लाचा मुद्दा फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही तर तो देशभर पसरला जाऊ शकतो. आपण या विषयावर राजकारण करू नये. याबाबत मी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्याशी बोललो आहे. त्यांनी याबाबत सविस्तर माहिती मागविली असून ते म्हणाले की आपण सतर्क राहिले पाहिजे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

 

02 Mar, 21:02 (IST)

गोवंश तस्करी आणि लव्ह जिहाद रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

 

02 Mar, 20:33 (IST)

लॉटरी घोटाळ्याप्रकरणी गुन्हे शाखा काश्मीरने दिल्लीच्या किशनगड येथून 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

02 Mar, 20:32 (IST)

लॉटरी घोटाळ्याप्रकरणी गुन्हे शाखा काश्मीरने दिल्लीच्या किशनगड येथून 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

Read more


देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू आणि गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहे. या राज्यात 87.25 टक्के कोरोना रुग्ण आढळून आल्याचं दिसून आलं आहे. एकट्या महाराष्ट्रातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 46.39 टक्के इतकी आहे. महाराष्ट्रात दररोज सुमारे 8 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस घेतली. त्यानंतर त्यांनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहन केलं.

शिवसेनेने सामना अग्रलेखातून देशातील महागाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर कधी कमी होतील याचा काहीच अंदाज देता येणार नाही, असेही सरकारचं म्हणते. मग मार्च-एप्रिलमध्ये दर कमी होतील असे फुगे हवेत का सोडत आहात? असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून मोदी सरकारला विचारला आहे.

दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील राखीव जंगल आसलेल्या ठाणे पाडा जंगलात रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे मोठ्या प्रमाणात वन संपत्तीचे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now