पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडियाला रामराम करण्याच्या विचाराने ट्वीटरवर #NoSir हॅशटॅग ट्रेन्ड ; 2 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
कोरोनामुळे इराणमध्ये अडकून पडलेल्या 34 कोल्हापूरकरांना मदत करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील असलेल्या सोनगड शहराजवळ बस-टॅकर आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
पुण्यातील लोणीकंद-केसनंद परिसरातील रस्त्याच्या कडेला कचऱ्यामध्ये अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह कचऱ्यात आणून टाकला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसाममधील गोहपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 28 फेब्रुवारी रोजी एका 12 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी विविध 12 प्रकारचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षीपासून मराठी नाट्यकला क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतास 'नटसम्राट डॉ. श्रीराम लागू' यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
आज सकाळी लासलगावमध्ये कांदा निर्यातबंदी हटविण्याबाबत शेतक-यांनी सुरु केलेलं आंदोलन हळूहळू पेट घेत अनेक जिल्ह्यांत पोहोचले. त्यावर तोडगा काढत सरकारने आता कांदा विदेशात पाठविण्याचा मार्ग मोकळा केला आहे. येत्या 15 मार्चपासून कांदा निर्यात होणे सुरु होणार आहे. याबाबत आज संध्याकाळ पर्यंत अधिसूचना जारी केली जाईल अशी माहिती खासदार भारती पवार यांनी दिली आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपी पवन कुमार याची राष्ट्रपतींकडे पाठवलेली दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहे. त्यामुळे उद्याच म्हणजेच 3 मार्च ला पवन कुमार, विनय कुमार, अक्षय सिंह आणि मुकेश सिंह या चौघांना सकाळी 6:00 वाजता फाशी होणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. यात त्यांनी मध्य प्रदेशात भाजप पक्षाकडून काँग्रेसचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे त्यांनी सांगितले आहे.
निर्भया प्रकरणातील आरोपी पवन गुप्ता याने दिल्ली पटियाला हाऊस कोर्टोत दया याचिका दाखल केली आहे. मात्र, दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने दोषी पवन गुप्ता याच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. ट्वीट-
भारतात कोरोना व्हायरसचे 2 रूग्ण आढळले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक दिल्लीत तर, दुसरा रुग्ण तेलंगणा येथे आढळल्याचे समजत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण न्याय मिळावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदानात मराठा समाज लढा देत आहे. यातच खासदार संभाजीराजे भोसले यांनी आंदोलकर्त्यांची भेट घेतल्यानंतर आक्रमक भुमिका साकारली आहे. मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे असे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले. तसेच जर काही बरे वाईट झाले तर, त्याला केवळ सरकार जबाबदार असेल, असा इशारही त्यांनी त्यावेळी दिला आहे.
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपी पवन कुमार याची क्युरेटिव प्ली सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकीलांनी पुन्हा राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. पवन कुमार चे वकील ए.पी.सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दिल्ली हिंसाचाराबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी झालेल्या प्रकाराबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच दिल्लीत घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे. हा पूर्वनियोजित कट असल्याचे ही ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.
आजपासून लोकसभेमध्ये अर्थसंकल्पी अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. या अधिवेशनात दिल्लीतील हिंसाचाराचा मुद्दा विरोधक उचलून धरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली जाणार आहे असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस दिल्लीतील जातीय हिंसाचाराच्या प्रकरणी तहकुबी सूचना दोन्ही सभागृहात आज मांडण्यात येईल. त्यात दिल्लीतील हिंसाचारावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करण्यात येईल. त्यामुळे एकूणच दिल्ली हिंसाचाराचा मुद्दा संसदेत जोर धरणार आणि यावर काय अंतिम निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्याचबरोबर मुंबई-पुणे महामार्गावर रविवारीत्र रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक्सप्रेस वे कडे जाणा-या खंडाळा येथील अंडा पॉईंट जवळील धोकादायक वळणावर हा अपघात झाला.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
दिल्लीत जे घडतंय त्याची १०० टक्के जबाबदारी केंद्र सरकारवर पडते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे. रविवारी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)