मुंबई: सकाळी 5 ते संध्याकाळी 7 दरम्यान, घरा शेजारच्या मोकळ्या जागांवर वैयक्तिक शारिरीक व्यायाम करण्यास परवानगी; 2 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

03 Jul, 05:20 (IST)

मुंबई मधील नागरिकांना सकाळी 5 ते संध्याकाळी 7 दरम्यान, शेजारच्या मोकळ्या जागांवर वैयक्तिक शारिरीक व्यायाम (सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे) करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

03 Jul, 05:00 (IST)

विषय तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनंतर Zydus Cadila च्या कोरोना व्हायरस लसीसाठी फेज 1/2 च्या क्लिनिकल चाचणीस परवानगी देण्यात आली आहे.  आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

03 Jul, 04:45 (IST)

नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून विनोदी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते लिलाधर कांबळी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्वीट-

 

03 Jul, 04:23 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 937 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यात नायडू-महापालिका रुग्णालये 672, खासगी 353 आणि ससूनमधील 12 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या 937 रुग्णांसह पुणे शहरातील एकूण कोरोना व्हायरस रुग्ण संख्या आता 19,042 इतकी झाली आहे.

03 Jul, 03:51 (IST)

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील धबधब्यात बुडून 5 मुलांचा मृत्यू झाला आहे. जव्हारपासून सात किलोमीटर अंतरावर केळीचापाडा (काळशेती ) येथील काळमांडवी धबधब्यावर हा अपघात झाला आहे.

03 Jul, 03:22 (IST)

राजस्थान येथून अफूची बोंडे घेऊन कनार्टककडे घेऊन जाणारा ट्रक, धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी पकडला. या अफूच्या बोंडांचं वजन 104 किलो 700 ग्रॅम एवढे असून, त्याची किंमत तब्बल 10 लाख 47 हजार रुपये एवढी आहे. यामध्ये एकूण 30 लाख 47 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

03 Jul, 03:00 (IST)

आसाममधील 33 पैकी 22 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. आतापर्यंत 34 लोकांचा मृत्यू झाला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबत माहिती दिली आहे.

03 Jul, 02:47 (IST)

महाराष्ट्रात आज 6,330 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे व अशाप्रकारे एकूण संख्या आता 1,86,626 अशी आहे. आज नवीन 8,018 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 1,01,172 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 77,260 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

03 Jul, 02:16 (IST)

गोव्यात आणखी 95 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 1482 वर पोहचला आहे.

03 Jul, 01:53 (IST)

मुंबईत कोरोनाचे आणखी 1554 रुग्ण आढळले तर 57 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे शहरातील COVID19 चा आकडा 80,262 वर पोहचला आहे.

03 Jul, 01:47 (IST)

नानावटी रुग्णालय COVID19 संदर्भात प्रचंड बिलाची रक्कम रुग्णांकडून उकळत असल्याच्या प्रकरणी मुंबई महापालिकेकडून FIR दाखल  करण्यात आला आहे. 

 

03 Jul, 01:36 (IST)

मुंबईतील धारावीत आणखी 19 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 2,301 वर पोहचला आहे.

03 Jul, 01:24 (IST)

उत्तराखंड येथे आणखी 37 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 2984 वर पोहचला आहे.

03 Jul, 01:09 (IST)

पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी NIA यांच्याकडून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

03 Jul, 01:00 (IST)

कर्नाटक येथे आणखी 1502 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 19 जणांचा बळी गेल्याने आकडा 18,016 वर पोहचला आहे.

03 Jul, 24:49 (IST)

पंजाब येथे आणखी 120 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 5784 वर पोहचला आहे.

03 Jul, 24:35 (IST)

जून महिन्यात कोकणात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. पण जुलै महिन्यात कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ट्वीट- 

 

03 Jul, 24:24 (IST)

सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत ताज महाल (Taj Mahal), लाल किल्ल्या (Red Fort) सह देशातील स्मारके सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार ने दिलेल्या माहितीनुसार 6 जुलैपासून ही स्मारके उघडण्यात येतील.

02 Jul, 23:56 (IST)

बिहार येथे अंगावर वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन यांनी दिली आहे.

02 Jul, 23:30 (IST)

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी आठवड्याभरात पोलीस स्थानकात जबाब नोंदवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Read more


महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) विळखा मजबूत होत चालला असून दिवसागणिक कोविड-19 (COVID-19) रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहराता असून त्यापाठोपाठ ठाणे (Thane), पुणे, पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. यामुळे असे असताना देखील या भागातील अनेक लोक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. याचा परिणाम ठाण्यामध्ये 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन (Thane) ठेवण्यात आला आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही आजपासून लॉकडाऊन सुरु झाला आहे. या कडक लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे.

देशातील कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांची संख्या अजूनही वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात 31 जुलै पर्यंत लॉक डाऊन असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. महाराष्ट्रात अनलॉक 2 सुरुवात झाली असून लोकांनी संयम बाळगून सोशल डिस्ंटसिंगचे पालन करावे असे सांगण्यात येत आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 1 लाख 80 हजार 298 वर पोहचली आहे. यापैकी 8 हजार 53 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 93 हजार 154 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. तर भारतामध्ये कोरोनाबाधितांनी 5 लाख 85 हजारांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज 1 जुलै ला 18,653 नवे कोरोनाबाधित रूग्ण तर 507 रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now