अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या राज्यव्यापी एल्गार आंदोलनास प्रहारचा पाठिंबा; 2 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सह जोडलेले रहा....

03 Dec, 04:47 (IST)

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या 3 डिसेंबर रोजी होणार्‍या राज्यव्यापी एल्गार आंदोलनास प्रहारचा संपुर्ण सक्रीय पाठिंबा आहे, असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत. ट्विट-

 

03 Dec, 04:10 (IST)

CBSE अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मधील बोर्ड परीक्षा ऑनलाईन नाही तर केवळ लेखी असतील.

03 Dec, 03:37 (IST)

मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातील पाचेती धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी 5 हजार रुपये आणि 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही माहिती दिली.

03 Dec, 03:27 (IST)

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 69 ए अंतर्गत एक आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये विकिपीडियाचे निर्देशित केले आहे की, त्यांनी त्यांच्या व्यासपीठावरील जम्मू-काश्मीरचा चुकीचा नकाशा दर्शविणारी लिंक हटवावी.

03 Dec, 03:24 (IST)

आज पर्यंत राज्यात 9 ते 12 वी गटातील 11,296 शाळा सुरू आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करीत सुमारे 5 लाख विदयाथी उत्साहाने उपस्थित आहेत.स्थानिक प्रशासन, विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी केलेल्या सहकार्याबददल मनःपूर्वक धन्यवाद - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

03 Dec, 03:07 (IST)

गुजरातमधील माजी मंत्री कांतीभाई गामित आणि त्यांच्या मुलासह 17 जणांना तापी जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. गामित यांच्या नातीच्या लग्नाच्या कार्यक्रमात दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यांनतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

03 Dec, 02:37 (IST)

महाराष्ट्रात दिवसेंगणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तुमच्या जिल्ह्यात कोरोनाची किती रुग्ण आढळले? हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती उपयोगी ठरणार आहे. ट्विट-

 

03 Dec, 02:00 (IST)

राज्यात येत्या शैक्षणिक सत्रापासून सर्व शासकीय शाळांमध्ये योगा स्वतंत्र विषय म्हणून समाविष्ट केले जाईल, अशी घोषणा हरियाणा सरकारने केली आहे. ट्विट-

 

03 Dec, 01:23 (IST)

चक्रीवादळ बुरेवीच्या पार्श्वभूमीवर 175 कुटुंबांमधील 697 लोकांना मदत शिबिरात हलविण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात एनडीआरएफचे आठ पथक दाखल झाले आहेत. तसेच हवाई दल आणि नौदल बचाव आणि मदत कार्यांसाठी सज्ज झाले आहेत, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन म्हणाले आहेत. ट्विट-

 

03 Dec, 24:58 (IST)

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाला राज्य सरकारकडून एक हजार कोटींच्या विशेष अर्थसहाय्याला मान्यता मिळाली आहे. ट्विट-

 

03 Dec, 24:26 (IST)

शहरातील 345 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 1 लाख 60 हजार 832 झाली आहे. ट्विट-

 

02 Dec, 23:56 (IST)

भोपाळ गॅस दुर्घटनेच्या स्मरणार्थ 3 डिसेंबर रोजी भोपाळमधील सर्व सरकारी कार्यालये बंद राहणार, अशी घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली आहे. ट्विट-

 

02 Dec, 23:22 (IST)

राज्यात सन 2020-21 या कालावधीत तृणभक्षक प्राणी व पाळीव प्राणी यांच्यासाठी वन क्षेत्रावर ‘वन कुरण व वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम’ राबविण्यात येणार, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. ट्वीट-

 

02 Dec, 22:27 (IST)

IND vs AUS 3rd ODI: भारताचा ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय मिळवला असून मालिका 2-1 अशी गमावत व्हॉईट वॉश टाळण्यात टीम इंडियाला यश आले आहे.

02 Dec, 22:25 (IST)

अभिनेता आणि लेखक Zeishan Quadri यांच्या विरोधात सह-निर्मात्याकडून FIR दाखल करण्यात आली आहे. Quadri यांनी ओटीटीसाठी बनवलेल्या वेब सीरिजमध्ये त्याने आणि त्याच्या दुसर्‍या मित्राने गुंतवलेल्या 1.5 कोटी रुपयांच्या फसवणूकीचा आरोप एका सहनिर्मात्याने केला आहे.

02 Dec, 22:10 (IST)

जानेवारी-फेब्रुवारी 2021 मध्ये कर्नाटक मध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता  असे COVID-19 च्या राज्य तांत्रिक सल्लागार समितीने म्हटले आहे. दरम्यान, फेब्रुवारी अखेरपर्यंत दिवसाला किमान 1.25 लाख चाचण्या करण्यात येतील.

02 Dec, 21:45 (IST)

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे बिहार राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी अर्ज दाखल केला.

02 Dec, 21:18 (IST)

माजी न्यायाधीश C S Karnan यांना चेन्नई पोलिसांकडून abusive videos प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

02 Dec, 21:08 (IST)

दिल्ली मध्ये आज कोविड-19 चे 3,944 नवे रुग्ण आढळून आले असून 82 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 5.78 लाख झाली असून 9,342 मृतांची नोंद झाली आहे.

02 Dec, 20:35 (IST)

Special NDPS कोर्टाकडून शौविक चक्रवर्ती ला जामिन मंजूर झाला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा ड्रग्सच्या अनुषंगाने होत असलेल्या तपासात NCB कडून  रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक याला अटक करण्यात आली होती.

Read more


कोरोना व्हायरसचे जागतिक आरोग्य संकट अद्याप कायम आहे. कोरोना संसर्गाचा धोका कायम असला तरी दररोज 50,000 पेक्षा कमी रुग्ण निर्दशनास येत असून करोडो टेस्ट नियमित केल्या जात आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, भाजप खासदार सनी देओल याला देखील कोविड-19 ची लागण झाली असल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. रणजीत ठाकूर यांनी दिली आहे.

मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडी रद्द केल्याने पालघर, सफाळे येथे प्रवाशांनी उत्स्फुर्तपणे रेल रोको केला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, सुरुवातीला अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी सुरु असलेली लोकल सेवेत महिलांनाही परवानगी देण्यात आली. दरम्यान, 3 डिसेंबर पासून रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू होणार होते. मात्र त्यातून मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडी रद्द केल्याने रेले रोको करत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

आज टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना पार पडणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिका हातातून निसटली असली तरी अखेरचा सामना जिंकून व्हॉईट वॉश टाळण्याचा भारताचा प्रयत्न असेल. मनुका ओव्हल स्टेडियम मध्ये हा सामना रंगणार असून भारतीय वेळेनुसार सकाळी 9.10 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now