मुख्यमंत्र्यांनी आज केवळ 3800 रुपयांचे चेक देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा केली - निलेश राणे ; 19 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

20 Oct, 05:24 (IST)

मुख्यमंत्र्यांनी आज केवळ 3800 रुपयांचे चेक देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा केली.  काय फालतुगिरी चालली आहे?? अशी प्रतिक्रिया भाजप नेते निलेश राणे यांनी दिली आहे.

 

 

20 Oct, 05:09 (IST)

IPL 13: अबू धाबी विकेट फलंदाजीसाठी सर्वोत्कृष्ट नव्हती, असं स्टीव्ह स्मिथने म्हटलं आहे.

20 Oct, 04:51 (IST)

आज पहाटे वडोदरा-मुंबई महामार्गावर झालेल्या चकमकीत पाच जण जखमी झाले व यावेळी 6-7 फेऱ्या गोळ्या झाडण्यात आल्या. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती वडोदराचे एसीपी भारत राठोड यांनी दिली.

20 Oct, 04:49 (IST)

ग्रँड चॅलेंजस वार्षिक सभेला संबोधित करताना बिल गेट्स म्हणाले, 'कोरोना व्हायरसच्या लढाईसाठी भारताचे संशोधन आणि उत्पादन महत्त्वपूर्ण आहे, विशेषत: मोठ्या प्रमाणावर लस तयार करण्यासाठी भारताची मदत महत्वाची आहे.'

 

 

20 Oct, 03:48 (IST)

केसीपीच्या (पीडब्ल्यूजी-खुमान) दोन कार्यकर्त्यांना आज अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे: मणिपूर पोलिस

20 Oct, 03:38 (IST)

किशोर पेडणेकर यांनी मागाठाणे येथील टाटा पावर मार्गावरील नाले रुंदीकरणात अडथळा ठरत असलेल्या झोपडपट्टीची व बोरवली दत्तपाडा येथील महिंद्रा अँड महिंद्रा फेज टू, आकार पिनॅकल इमारत प्रवेश मार्गच्या समस्येची पाहणी केली.

20 Oct, 03:10 (IST)

मुंबईमध्ये आज 1,233 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 45 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 2,092 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

20 Oct, 03:08 (IST)

उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील बलात्कार प्रकरणी सीबीआयकडून अलिगड कारागृहात चार आरोपींची चौकशी केली.

 

20 Oct, 02:51 (IST)

सेना प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी अंबाला स्थित खर्गा कॉर्प्सला भेट देऊन सुरक्षा व परिचालन तयारीचा आढावा घेतला.

20 Oct, 02:28 (IST)

पश्चिम बंगाल येथे कोरोनाचे आणखी 3992 रुग्ण आढळले आहेत.

20 Oct, 02:06 (IST)

हरियाणा येथे कोरोनाचे आणखी 1201 रुग्ण आढळले असून 8 जणांचा बळी गेला आहे.

20 Oct, 01:45 (IST)

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचे आश्वासन दिले गेले आहे.

20 Oct, 01:22 (IST)

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 996 रुग्ण आढळल्याने आकडा 1,60,722 वर पोहचला आहे.

20 Oct, 01:06 (IST)

दिल्लीत कोरोनामुळे आणखी 31 रुग्णांचा बळी गेल्याने आकडा 6040 वर पोहचला  आहे.

20 Oct, 24:44 (IST)

पुणे येथे एका वकिलाचे अपहरण करत त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

20 Oct, 24:30 (IST)

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देशन दिले आहेत.

20 Oct, 24:13 (IST)

बहुजन समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस के. सचान आणि माजी आमदार मिथिलेश कटियार यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

19 Oct, 23:43 (IST)

केरळ येथे कोरोनाचे आणखी 5022 रुग्ण आढळले असून आज 21 जणांचा बळी गेला आहे.

19 Oct, 23:15 (IST)

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील डब्बेवाल्यांना सायकल दिल्या  गेल्या आहेत.

19 Oct, 22:56 (IST)

मुंब्रा येथील गोडाउनला आग लागल्याची घटना घडली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Read more


महाराष्ट्राला मागील आठवड्यात परतीच्या पावसाने झोडपून काढलं आहे. पश्चिम किनारपट्टीवरील कोकणातील अनेक गावांपासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी आलेल्या पावासाने शेतात तरारलेलं पीक आडवं झोपलं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तभागांची पाहणी करण्यासाठी राजकीय नेते बाहेर पडले आहेत. आज (19 ऑक्टोबर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सोलापूर जिल्ह्याला भेट देणार आहेत. 2 दिवस ते विविध ठिकाणी भेट देणार आहेत. दरम्यान शरद पवार, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार देखील विविध भागात नुकसानीचा आढावा घेत आहेत.

महाराष्ट्रासह मुंबईतील कोरोना रूग्णांचा आकडा कमी होत असताना आता हळूहळू पुन्हा व्य्वहार सुरू होण्यास सुरूवात झाली आहे. आज मुंबईमध्ये घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सेवा सुरू केली जात आहे. मर्यादीत आसनक्षमतेसह आणि कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण काळजी घेत मुंबई मेट्रो पुन्हा धावणार आहे. दिवसभरात मेट्रोच्या 200 फेऱ्या होतील तर एका वेळी केवळ 360 प्रवासी प्रवास करणारआहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

भारतामध्ये सध्या सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. शारदीय नवरात्रीचा आज तिसरा दिवस आहे. राज्यात मंदिरं दर्शनासाठी खुली केलेली नसली तरीही लोकांना यंदा नवरात्रीपासून पुढील सारेच सण सावधतेने सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन दर्शन सेवा सुरू आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now