मुंबई च्या APMC मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात जबरदस्त घसरण, कोबी 10 रुपये तर कोथिंबीर जुडी 8 रुपये ; 19 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

20 Nov, 05:20 (IST)

परतीच्या पावसामुळे वाढलेल्या भाज्यांच्या किंमती अचानक कमी झाल्या आहेत. मुंबईच्या APMC मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात जबरदस्त घसरण झाली असून कोबी 10 रुपये, टोमॅटो 15 रुपये तर कोथिंबीर 8 रुपये जुडी इतकी झाली आहे. Tv9 मराठी ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

20 Nov, 05:01 (IST)

झारखंड मध्ये 230 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 1,06,972 वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 937 वर पोहोचली आहे. सद्य घडीला राज्यात 2600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

20 Nov, 04:39 (IST)

कोविड-19 ची सध्याची परिस्थिती पाहता गुजरातमध्ये 23 नोव्हेंबरपासून शाळा, महाविद्यालये 23 नोव्हेंबरपासून सुरु होणार नाही असा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे.

20 Nov, 04:13 (IST)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही सार्वजनिक ठिकाणी छटपूजेस मनाई करण्यात आली आहे. महापालिकेने याबाबतचा निर्णय घेतला आहे. 

 

20 Nov, 03:26 (IST)

भारती इन्फ्राटेलने दिलेल्या माहितीनुसार, इंडस टावर्समधील विलीनीकरण पूर्ण झाले आहे. इंडसमध्ये 11.15 टक्के होल्डिंगसाठी व्होडाफोन आयडियाला 3,760.1 कोटी रुपये मिळणार आहेत.

20 Nov, 03:05 (IST)

'वंदे भारत' अभियानांतर्गत 30 लाखाहून अधिक भारतीय परदेशातून परत आले आहेत. 'एमईए'ने याबाबत माहिती दिली.

20 Nov, 02:36 (IST)

हरयाणा मध्ये 2212 रुग्णांसह राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 2,09,251 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 2113 वर पोहोचला आहे.

20 Nov, 01:49 (IST)

महाराष्ट्रात आतापर्यंत 99,65,119 कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून 17,63,055 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सद्य घडीला 5,60,868 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.

20 Nov, 01:25 (IST)

महाराष्ट्रात आज 5535 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 154 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 17 लाख 63 हजार 55 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 46,356 वर पोहोचली आहे.

20 Nov, 01:04 (IST)

राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1,566 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी दिली आहे.

20 Nov, 24:45 (IST)

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. यात शेतक-यांनी थकबाकी भरल्यास 50% वीजबिल माफ करण्यात येणार असल्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. 

 

20 Nov, 24:08 (IST)

पंजाब मध्ये शेतक-यांच्या आंदोलनामुळे 30 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून 11 गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड करण्यात आल्या आहेत.

19 Nov, 23:40 (IST)

आंध्र प्रदेश मध्ये 1316 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 8 लाख 58 हजार 711 वर पोहोचली आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 6,911 इतका झाला आहे.

19 Nov, 23:05 (IST)

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अधिक उपचारासाठी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

19 Nov, 22:43 (IST)

शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांचा वांद्रे येथील कराची स्वीट्सच्या दुकानात जाऊन नावाला पर्यायी मराठी नाव शोधण्यासाठी केलेल्या मागणीचा व्हिडिओ वायरल  झाल्यानंतर शिवेसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आहे. Karachi bakery, karachi sweets  चा पाकिस्तानशी संबंध नसल्याने नावात बदल करण्याची मागणी ही पक्षाची अधिकृत मागणी नसल्याचं म्हटलं आहे.

19 Nov, 22:36 (IST)

बिहार मध्ये घोट्याळ्याचे आरोप असल्याने  Mewa Lal Choudhary यांच्या राजीनाम्यानंतर Ashok Chaudhary यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे.

19 Nov, 22:33 (IST)

लेफ्टिनेंट गवर्नर मनोज सिन्हा यांनी नगरोटा मधील दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत जखमी पोलिस कर्मचार्‍यांची  रूग्णालयात भेट घेतली   आहे.

19 Nov, 22:02 (IST)

मुंबई, ठाणे पाठोपाठ आता  पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडूनही  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छठपूजा सार्वजनिक ठिकाणी, पाणवठ्यावर साजरी करण्यावर बंदी  घालण्यात आली आहे.

19 Nov, 21:23 (IST)

पाकिस्तानच्या anti-terrorism court कडून illegal funding case प्रकरणी Hafiz Saeed ला 10 वर्षांचा कारावासाची शिक्षा  सुनावली असल्याची माहिती पाकिस्तान मीडीयाकडून देण्यात आली आहे.

19 Nov, 21:20 (IST)

बिहारचे शिक्षणमंत्री Mewa Lal Choudhary यांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत.

Read more


अरबी समुद्रामध्ये आज कमी दाबाचा पट्टा आणि चक्रीय वार्‍यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यभर थंडीची चाहुल लागली होती. मात्र आता तापमानामध्ये वाढ होत आहे. पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हा पाऊस मेघगर्जनेसह बरसण्याची शक्यता आहे.

दरम्यान दिवाळी ओसरल्यानंतर आता मुंबईमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात काल 5 हजारांपेक्षा अधिक रूग्ण आणि 100 जणांचा बळी गेला आहे. आरोग्य यंत्रणांना यापूर्वीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मुंबईमध्येही उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दिल्लीमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ पहायला मिळाली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

कॉंग्रेस नेत्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 103 वी जयंती आहे. त्यानिमित्त राहुल गांधी यांनी दिल्लीच्या शक्ती स्थळ या त्यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आपलि आदरांजली अर्पण केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now