केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कर्नाटक येथील 33 नॅशनल हायवे च्या प्रोजक्टे्सचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन ; 19 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

20 Dec, 05:15 (IST)

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कर्नाटक येथील 33 नॅशनल हायवे च्या प्रोजक्टे्सचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले आहे.

20 Dec, 05:04 (IST)

गुजरात: Seaplane Flight ची सुविधा स्टॅच्यु ऑफ युनिटी केवाडिया आणि साबरमती दरम्यान येत्या 27 डिसेंबर पासून सुरु होणार आहे.

20 Dec, 04:41 (IST)

पंजाब येथे कोरोनाचे आणखी 439 रुग्ण आढळले असून20 जणांचा बळी गेला आहे.

20 Dec, 03:57 (IST)

राजसमंद पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात दोन कारमधून दोन कोटी रुपयांचा 20 किलो अफू जप्त करण्यात आल्या आहेत. ट्वीट-

 

20 Dec, 02:48 (IST)

तमिळनाडू येथे कोरोनाचे आणखी 1127 रुग्ण आढळले असून 14 जणांचा बळी गेला आहे.

20 Dec, 02:39 (IST)

Ind vs Aus: हात फ्रॅक्चर झाल्याने मोहम्मद शमी मालिकेतून बाहेर करण्यात आले आहे.

20 Dec, 02:18 (IST)

पश्चिम बंगालः सुवेंदू अधिकारी आणि अन्य पक्ष सदस्यांच्या राजीनाम्यानंतर TMC कार्यकर्त्यांनी कामराती येथे जल्लोष केला. "पक्ष आज व्हायरस आणि अप्रामाणिक लोकांपासून मुक्त झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही आगामी निवडणुकीत मोठ्या संख्येने विजयी होऊ," असे मदन मित्रा म्हणाले.

20 Dec, 01:54 (IST)

पंजाब: काल लुधियानामध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेचे स्टेटमेंट नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती डीएसपी गुरबन्ससिंग बैन्स यांनी दिली.

20 Dec, 01:07 (IST)

Coronavirus in Maharashtra: आज राज्यात कोरोनाचे 3,940 नवे रुग्ण आढळून आले असून 74 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3,119 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

एकूण रुग्णसंख्या: 18,92,707

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 17,81,841

मृतांचा आकडा: 48,648

सक्रीय रुग्ण: 61,095

20 Dec, 24:42 (IST)

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मेदांता रुग्णालयात आरोग्यमंत्री अनिल विज यांची भेट घेतली. 5 डिसेंबर रोजी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

20 Dec, 24:05 (IST)

राजस्थानः राष्ट्रीय जनतांत्रिक पक्षाचे हनुमान बेनीवाल यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तीन संसदीय समित्यांचा राजीनामा दिला.

19 Dec, 23:35 (IST)

राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी अशी काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा आहे, असे आजच्या कॉंग्रेसच्या बैठकीत म्हटले आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

19 Dec, 22:55 (IST)

जम्मू-काश्मीर: पुंछ मधील किर्नी आणि मालती सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ गोळीबार करुन पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले.

19 Dec, 22:26 (IST)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो. वैद्य यांना भाजप ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

19 Dec, 21:49 (IST)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा.गो वैद्य यांचे आज नागपूरात निधन झाले आहे.

19 Dec, 21:16 (IST)

ममता बॅनर्जी यांचे सरकार भ्रष्टाचाराने माखलेले आहे अशी वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या रॅलीत केले.

19 Dec, 20:12 (IST)

राज्याचं येत्या पाच वर्षांत सौर प्रकल्पांच्या माध्यमातून 17 हजार 385 मेगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य अलीकडेच जाहीर केलेल्या अपारंपरिक धोरणात असून, राज्याच्या उद्योग क्षेत्राला हे धोरण पूरक असल्याचं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. 

 

19 Dec, 19:02 (IST)

ऑस्ट्रेलियात अ‍ॅडलेटमधील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा अवघ्या 36 धावांत डाव संपला आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्यावर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे.

19 Dec, 18:57 (IST)

दिल्लीत सोनिया गांधींच्या निवासस्थानी कॉंग्रेस नेत्यांच्या बैठकीला सुरूवात; राहुल गांधी, प्रियंका गांधी देखील उपस्थित आहेत.

19 Dec, 18:39 (IST)

2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना 4 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे NIA चे आदेश दिले आहेत.

Read more


अंगाचा थरकाप उडवून देणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी हाथरस सामूहिक बलात्कार (Hathras Gangrape Case) प्रकरणाचा आजही विचार केला तरी लोकांच्या मनात धस्स होतं. एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याचा घृणास्पद प्रकार या भागात घडला होता. या प्रकरणातील 4 आरोपींना दोषी ठरवत CBI ने यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल केली आहे. शुक्रवारी सीबीआयच्या (CBI) वतीनं दोन हजार पानांहून अधिक पानांची चार्जशीट दाखल केली. आता संपूर्ण देशभरात चर्चिल्या गेलेल्या हाथरस प्रकरणी 4 जानेवारी 2021 रोजी सुनावणी पार पडणार आहे.

महाराष्ट्रामध्ये काल (18 डिसेंबर) कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 3,994 रुग्णांची व 75 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 18,88,767 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 48,574 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तर भारतामध्ये एकूण रूग्णसंख्या 1 कोटीच्या उंबरठ्यावर आहे. कालपर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या 99 लाख 79 हजार 447 वर पोहोचला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 95,20,827 वर पोहोचली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now