अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी, खासदार अरविंद सावंत यांनी घेतली महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट; 19 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात, राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांना गोवल्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी, शिवसनेचे मुंबई दक्षिणचे खासदार अरविंद सावंत यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली.
हरिणाया येथे आज आणखी 994 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 49 हजार 930 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट-
'वर्ल्ड फोटोग्राफी डे'च्या निमित्ताने केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री प्रह्लाद पटेल यांनी देशाच्या वारशाबद्दल लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी, आठवडाभर चालणार्या 'Heritage Photography Contest' ची घोषणा केली.
पुणे शहरात आज नव्याने 1,211 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 77,368 झाली आहे. आज 1,089 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 14,556 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 3,77,081 झाली असून, आज 6,6690 टेस्ट घेण्यात आल्या.
तेलंगणा: हैद्राबादमध्ये भगवान विष्णूच्या धन्वंतरी अवतारात खैरताबाद गणेश असोसिएशन 9 फूट उंच गणेशमूर्तीची स्थापना करणार आहे. खैरताबाद गणेश उत्सवाच्या संस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जगात सर्वजण कोरोना विषाणू या साथीच्या रोगाचा सामना करीत असल्याने, यंदा देवांचे वैद्य धन्वंतरीच्या अवतारात ही गणपतीची मूर्ती तयार केली गेली आहे.'
बिहारच्या 16 जिल्ह्यांतील 8,358 लोकांना महापुराचा फटका बसला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री संजय कुमार झा यांचे म्हणणे आहे की, गंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यापासून सध्या तरी पाटण्याला धोका नाही.
पॉडेंचेरी: गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे यनम जिल्ह्यातील फ्रान्सटीप्पा परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पॉडेंचेरीचे मंत्री मल्लादी कृष्णा राव यांनी आज पूरग्रस्त भागाची पाहणी केली. 'राजीव बीच वॉक वे' च्या परिसरातील ही दृश्यं आहेत.
Coronavirus In Mumbai: मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा 131542 तर एकूण 7265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईत कोरोनाचे 1132 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 46 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 864 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत एकूण 106057 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात आज कोरोनाचे 13,165 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 346 जणांचा मृत्यू झाला आहे. आज एकूण 9011 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 6,28,642 वर पोहचला आहे. त्यापैकी 4,46,881 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 1,60,413 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 21,033 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आहे. तसेच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली आहे.
सुप्रीम कोर्टाचे निर्णयाचे स्वागत आहे. सीबीआयला लागणारे सहकार्य आम्ही करु. मुंबई पोलिसांसाठी ही अभिमानाची बाब आहे की सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या तपासात कोणताही दोष आढळला नाही, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी संबंधित 65 वर्षांवरील कलाकार आणि क्रू सदस्यांना आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
Sushant Singh Rajput Case: जनतेच्या भावा सरकारच्या विरोधात का आहेत? हे जाणून घेण्यासाठी राज्य सरकारला आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर म्हणाले आहेत.
भारताला कोरोना विषाणूने विळखा घातला असतानाचं आता देशावर आणखी एका संकटाचं सावटं असल्याचं समोर आलं आहे. भारतात स्वाइन फ्लू आजारदेखील झपाट्याने पसरू लागला आहे. भारतामध्ये जुलै अखेर स्वाइन फ्लूच्या 2,721 रुग्ण आढळून आले असून 44 जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
याशिवाय महाराष्ट्रात मंगळवारी 11 हजार 119 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 422 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6 लाख 15 हजार 477 इतकी झाली. तसेच मुंबईमध्ये 931 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाची चिंता वाढली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, राज्यात पावसाने चांगलाचं जोर धरलेला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी 3 तलाव भरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)