'पालघर येथील गुन्ह्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल'- सीएम उद्धव ठाकरे यांचे आश्वासन; 19 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

20 Apr, 05:23 (IST)

पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सीएम उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी 2 साधू, 1 ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

20 Apr, 05:00 (IST)

पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत संपूर्ण क्षेत्र आज दि. 20 एप्रिल मध्यरात्री पासून 27 एप्रिलपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे.

20 Apr, 04:22 (IST)

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणांतर्गत, आयुष्मान भारतच्या एका उच्च अधिकाऱ्याच्या सचिवांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांना दिल्लीतील लोक नायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

20 Apr, 03:31 (IST)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणामध्ये लॉकडाऊन 7 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी याबाबत माहिती दिली.

 

20 Apr, 03:06 (IST)

पालघर येथे 17 एप्रिल रोजी चोरीच्या संशयावरून ग्रामस्थांनी 3 जणांना मारहाण केली होता, आता या तिघांचाही मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांविरोधात एफआयआर दाखल केला असून, 110 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 101 जणांना 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि 9 अल्पवयीन मुलांना अल्पवयीन निवारा गृहात पाठविण्यात आले आहे.

20 Apr, 02:48 (IST)

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील स्वच्छताग्रहींच्या नियुक्तीला मुदतवाढीची मागणी मान्य करण्यात आली आहे. आता 30 मार्च 2021 पर्यंत त्यांच्या नियुक्त्या करता येणार. ग्रामीण भागातील जनता, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून स्वच्छताग्रही काम करतील. 

20 Apr, 02:13 (IST)

महाराष्ट्रात आज 552 नवे कोरोनाचे रुग्ण तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4200 वर तर 223 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 507 जणांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

20 Apr, 02:00 (IST)

गुजरात येथे नवे 139 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आकडा 1743 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

20 Apr, 01:38 (IST)

मुंबईत आज कोरोनाचे नवे 135 रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 2798 वर आणि 131 जणांचा बळी गेला आहे. तर 310 जणांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

20 Apr, 01:12 (IST)

नागपूरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 192 जणांचा शोध त्यापैकी  11 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. पण 144 जणांच्या रिपोर्ट्सची वाट पाहत असल्याचे नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे. तसेच आज नागपूरात 9 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.

20 Apr, 24:46 (IST)

मुंबईतील धारावी येथे आणखी 20 जणांना कोरोनाची लागण झाली असून एकूण रुग्णांची संख्या 138 वर पोहचला आहे. तसेच 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

20 Apr, 24:33 (IST)

भारतात गेल्या 24 तासात 31 जणांचा मृत्यू तर 1324 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 16116 वर पोहचला आहे. त्यापैकी 13295 अॅक्टिव्ह कोरोनाचे रुग्ण तर 2302 जणांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकूण बळींची संख्या 519 झाल्याची माहिती आरोग्य आणि कुंटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

20 Apr, 24:21 (IST)

हिमाचल प्रदेशात  आज 39 जणांना कोरोनाची लागण तर 11 जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.

19 Apr, 23:58 (IST)

वांद्रे स्थानक गर्दी प्रकरणी 10 ताब्यात घेतलेल्या आरोपींना 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

19 Apr, 23:36 (IST)

कंन्टेंटमेंट झोन मधील नियम येत्या 20 एप्रिल पासून शिथिल करण्यात येणार नाहीत असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

19 Apr, 23:04 (IST)

भोपाळ येथे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1407 वर तर 72 जणांचा मृत्यू झाला आहे.

19 Apr, 22:44 (IST)

बिहार येथे आणखी 3 जणांना कोरोनाची लागण झाल्याने आकडा 92 वर पोहचला आहे.

19 Apr, 22:07 (IST)

गोवा राज्य हे पूर्णतः कोरोना मुक्त झाले असल्याची घोषणा गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केली आहे. यासाठी वैद्यकीय विभागातील, पोलीस दलातीलसर्व कोव्हीड योद्धांचे राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आभार मानले आहेत.

19 Apr, 21:34 (IST)

महाराष्ट्रातील तुरूंगांत त्यांच्या वास्तविक क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. यामुळे औरंगाबाद कारागृहात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस कर्मचार्‍यांच्या राहण्याची व खाण्याची व्यवस्था तुरूंगातच केली जाईल. कोणालाही बाहेर येण्यास किंवा आत जाऊ देणार नाही यापाठोपाठ हा निर्णय महाराष्ट्रातील आणखी 5तुरूंगांसाठीही घेण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

19 Apr, 20:46 (IST)

भारतामध्ये लॉकडाऊनमुळे विमानसेवा ठप्प झाल्याने SpiceJet ने दरमहा 50 हजार पेक्षा अधिक पगार असणार्‍यांना  Leave Without Pay वर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर एप्रिल महिन्याचा पगार हा जितके दिवस काम केले तितके दिवस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Read more


कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशभरात 3  मे पर्यंत जारी करण्यात आलेल्या लॉक डाऊनचा अर्थव्यवस्थेवर चिंताजनक परिणाम होताना दिसत आहे. अनेक व्यवसाय बंद असल्याने सद्य घडीला राज्याचे (महाराष्ट्र) उत्पन्न शून्यावर आले आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास आता आंब्याच्या सीझनचे महत्वाचे आठवडे हे देखील ग्राहकांच्या शिवाय जात असल्याने एक महत्वाचा व्यवसाय सुद्धा तोट्यात सुरु आहे, याबाबत नाशिक व रत्नागिरी येथील आंबा विक्रेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे उद्या 20 एप्रिल पासून देशातील काही उद्योग व्यवसाय हे पुन्हा सुरु केले जाणार आहेत, त्यामुळे हे थांबलेले अर्थचक्र पुन्हा निदान सुरु होईल आणि हळूहळू रुळावर येईल अशी अपेक्षा आहे. उद्योग सुरु होणार असले तरी 3 मे पर्यंत ट्रेन आणि विमानसेवा पूर्णतः बंद असतील.

महाराष्ट्रात आता कोरोनाचे 328 नवे रुग्ण आढळल्याचे समजत आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 648 वर पोहचली आहे. यात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबईत (148 ) आणि पुणे शहरात (78 ) आढळून आले आहेत. तर भारतात रुग्णांची संख्या ही 15 हजार 707 वर पोहचली आहे. यापैकी 507 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून सध्या देशात 12 हजार 696 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. 2231 रुग्णांना बरे करण्यात वैद्यकीय विभागला यश आले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 60 हजारांवर गेली आहे. तर कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 23 लाख 31 हजारांवर पोहोचली आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. गेल्या 24 तासात अमेरिकेत कोरोनाचे 1,867 बळी गेले आहेत. ज्यामुळे आतापर्यंतचा कोरोना मृतांचा आकडा हा 39 हजार 14 झाला आहे. तर कोविड-19 च्या रुग्णांची संख्या 7  लाख 39 हजारांवर पोहोचली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now