आंतरराष्ट्रीय इको लेबल 'Blue Flag' साठी भारतातील 8 समुद्रकिना-यांची शिफारस- प्रकाश जावडेकर; 18 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशामधील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज

19 Sept, 05:21 (IST)

आंतरराष्ट्रीय इको लेबल 'ब्लू फ्लॅग'साठी भारतातील 8 समुद्रकिना-यांची शिफारस करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

19 Sept, 04:52 (IST)

चंदीगड येथे कोरोनाचे आणखी 260 रुग्ण आढळले असून 4 जणांचा बळी गेला आहे.

19 Sept, 04:42 (IST)

भारतातील बंदरांवर पडून आसलेल्या कांद्याच्या निर्यातीला बांग्लादेशासह अन्य ठिकाणी निर्यातीसाठी परवानगी देण्यात आल्याचे सरकारच्या सुत्रांनी म्हटले आहे.

19 Sept, 04:24 (IST)

झारखंड येथे कोरोनाचे आणखी 1478 रुग्ण आढळले असून 6 जणांचा बळी गेला आहे.

19 Sept, 04:21 (IST)

लोकसभेत  विनियोग (क्रमांक 4) विधेयक 2020 आणि विनियोग (क्रमांक 3) विधेयक 2020 मंजूर करण्यात आल्यानंतर गदारोळामुळे लोकसभा उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

19 Sept, 04:10 (IST)

आसाम येथे आज कोरोनाचे आणखी 2509 रुग्ण आढळले आहेत.

19 Sept, 03:45 (IST)

सोशल डिस्टंसिंग आणि रोजची गर्दी टाळण्यासाठी येत्या 21 सप्टेंबरपासून उपनगरीय रेल्वेच्या 350 ते 500 अधिक फे-या सुरु करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

19 Sept, 03:02 (IST)

मुंबईत कोरोनाचे आणखी 2267 रुग्ण आढळले असून 52 जणांचा बळी गेल्याने आकडा  1,80,542 वर पोहचला आहे.

19 Sept, 02:59 (IST)

आँध्र प्रदेशात कोरोनाचे आणखी 8096 रुग्ण आढळले असून  67 जणांचा बळी  गेला आहे.

19 Sept, 02:51 (IST)

हरियाणा येथे कोरोनाचे आणखी 2488 रुग्ण आढळले तर 23 जणांचा बळी गेला आहे.

19 Sept, 02:39 (IST)

पश्चिम बंगाल येथे कोरोनाचे आणखी  3192 रुग्ण आढळले असून 59 जणांचा बळी गेला आहे.

19 Sept, 02:24 (IST)

कर्नाटकमध्ये आज 8,626 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 179 जणांचा मृत्यू झाला आहे. 

 

19 Sept, 02:19 (IST)

गोव्यात आज 596 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून  8 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

19 Sept, 01:46 (IST)

महाराष्ट्रात आज 21,656 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 405 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आज 22,078 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

19 Sept, 01:23 (IST)

पंजाबमध्ये आज 2817 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच  62 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

19 Sept, 01:10 (IST)

उद्यापासून दुबईला एअर इंडिया एक्स्प्रेस उड्डाणे सुरू होणार आहे.

 

19 Sept, 01:02 (IST)

दिल्लीमध्ये आज 4,127 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

 

19 Sept, 24:30 (IST)

तामिळनाडूमध्ये आज 5,488 नवे कोरोना रुग्ण, तर 67 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

19 Sept, 24:09 (IST)

सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित औषध प्रकरणात सॅम्युएल मिरांडा, दिपेश सावंत आणि बशीत परिहार यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने 29सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

18 Sept, 23:52 (IST)

कोरोनाचा सामना करण्यासाठी मार्च, एप्रिल, मे आणि जूनमध्ये भारतीय रेल्वेने 5,601 बोगीचे कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले आहे.

Read more


केंद्रामध्ये संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. दरम्यान यामध्ये कृषीविषयक तीन विधेयकांच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान हा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. हरसिमरत कौर बादल यांनी ट्वीटद्वारे केली. शेतकऱ्यांची बहीण, कन्या म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचा मला अभिमान आहे, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्रामध्ये हळूहळू जनजीवन पुन्हा सुरळीत होत असताना राज्यात आजपासून एसटी बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू केली जाणार आहे. यामध्ये सोशल डिस्टंसिंग पाळत पुन्हा बससेवा सुरू होईल.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

हवामान अंदाज पाहता आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबई शहरामध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान काल मुंबईमध्ये कलम 144 ला विस्तारित करण्यात आल्यानंतर रात्रीपासून मुंबई पोलिसांकडून वाहनांची तपासाणी सुरू झाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now