Petrol Diesel Rates: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग 12 व्या दिवशी वाढ, पहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरातील आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमतीत घट झाली असून ही 12 व्या दिवशी तेल मार्केंटिंग कंपन्यांनी किंमतीत वाढ केली आहे
लॉकडाऊन नंतर महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. कारण आता लॉकडाऊन हळू हळू उठवण्यास सुरुवात करण्यात झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढत होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमतीत घट झाली असून ही 12 व्या दिवशी तेल मार्केंटिंग कंपन्यांनी किंमतीत वाढ केली आहे. पेट्रोलच्या किंमती 0.53 रुपयांनी वाढ तर डिझेलच्या किंमतीत 0.64 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज पेट्रोलच्या किंमती 77.81 रुपये आणि डिझेल 76.43 रुपये प्रति लीटर वर पोहचल्या आहेत.
मुंबईत पेट्रोलसाठी ग्राहकांना 84.68 रुपये प्रति लीटर आणि डिझेलसाठी 74.33 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चेन्नईत नागरिकांना एका लीटरसाठी 81.39 रुपये आणि डिझेलसाठी 74.33 रुपये द्यावे लागणार आहेत. त्याचसोबत कोलकाता येथे पेट्रोलच्या किंमती 76.61 रुपये आणि डिझेल 71.97 रुपयांवर पोहचल्याची माहिती देण्यात आली आहे.(Petrol and Diesel Prices in India: सलग 11 व्या दिवशी पेट्रोल डिझेल दरवाढ कायम; देशाच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये 17 जून रोजी काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर?)
दरम्यान, 7 जून पासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 16 मार्च रोजी वाढ झाली होती. त्यानंतर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे तब्बल 3 महिने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत फार मोठे बदल झाले नव्हते.