Coronavirus Update: देशात 24 तासात 55,079 नवे कोरोना रुग्ण, 876 मृत्यु; COVID-19 च्या 57,937 रुग्णांची विक्रमी रिकव्हरी

काल देशभरात एकुण 876 कोरोना रुग्णांचा मृत्यु (Coronavirus Fatality) झाल्याने सध्या देशातील कोरोनाच्या बळींची संख्या 51,797 इतकी झाली आहे.

Coronavirus Update (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In India: केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासात देशात पुन्हा कोरोना रुग्णांंच्या संंख्येत मोठी वाढ झाली आहे. देशात दिवसभरात 55,079 नवे कोरोना रुग्ण आढळुन आले असुन एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 27,02,743 वर पोहचली आहे. काल देशभरात एकुण 876 कोरोना रुग्णांचा मृत्यु (Coronavirus Fatality) झाल्याने सध्या देशातील कोरोनाच्या बळींची संख्या 51,797 इतकी झाली आहे. मात्र हे आकडे कितीही चिंंताजनक असले तरी, मुळ परिस्थिती काहीशी दिलासादायक आहे असे म्हणता येईल. आकडेवारी नुसार सांगायचे तर सद्य घडीला 27 लाखाहुन अधिक कोरोना रुग्ण असले तरी अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Coronavirus Active Cases) हे केवळ 6,73,166 इतकेच आहेत, 19,77,780 जणांंनी कोरोनावर मात (Coronavirus Recovered Cases) करुन आपआपल्या घराची वाट धरली आहे.

Coronavirus Update: तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा आजची महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांंची जिल्हानिहाय आकडेवारी

कोरोना रुग्णांची वाढ आणि नियंत्रण याबाबत सांगताना आरोग्य मंंत्रालयातुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या वाढीव चाचण्या, गंभीर परिस्थिती होण्याआधीच ओळखलेले कोरोना रुग्ण आणि वेळच्या वेळी केलेले उपचार यामुळे जवळपास 30 हुन अधिक राज्य व केंद्र शासित प्रदेशात कोरोनाचा मृत्युदर हा राष्ट्रीय मृत्युदराहुन बराच कमी आहे.

ANI ट्विट

देशात कोरोनाच्या रुग्णांंना ओळखण्यासाठी कोरोनाच्या चाचण्या अधिक प्रमाणात घेतल्या जात आहेत, आजवर एकुण 3,09,41,264 कोविड 19 टेस्ट झाल्या आहेत. यातील 8,99,864 टेस्ट या मागील 24 तासात झालेल्या आहेत. आयसीएमआर च्या माहितीनुसार सध्या चाचण्यांनुसार आठवड्याला 8. 81% कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिवसाला आढळुन येत आहेत.