US: जो बिडेन यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा करत दिल्या शुभेच्छा ; 17 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सह जोडलेले रहा...

18 Nov, 05:21 (IST)

US: जो बिडेन यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्याने   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा करत शुभेच्छा दिल्या आहेत.

18 Nov, 04:59 (IST)

COVID19 च्या काळात आपण सर्वांनी एकत्रित आले पाहिजे असे चीन पंतप्रधान शी जिनपिंग यांनी म्हटले आहे.

18 Nov, 04:42 (IST)

ठाण्यात सेप्टिक टँकच्या स्फोटात दोन अल्पवयीन जखमी  झाले आहेत.

18 Nov, 04:14 (IST)

झारखंडमध्ये आज 261 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 343 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

18 Nov, 04:00 (IST)

दिवाळीत मुंबईत फटाक्यांच्या विक्री आणि वापरावरील बंदीचे उल्लंघन केल्याबद्दल 40 एफआयआरची नोंद करण्यात आली आहे.

18 Nov, 03:15 (IST)

GoAir Riyadh-Delhi विमानात वैद्यकिय आपत्कालीन स्थिती उद्भवल्याने त्याचे कराची येथे लँन्डिंग करण्यात आले आहे.

18 Nov, 02:50 (IST)

छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी  नितीन गडकरी यांची नागपूरातील निवासस्थानी भेट घेतली.

18 Nov, 02:44 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 2840 रुग्णांचीन नोंद झाली असून 68 जणांचा बळी गेला आहे.

18 Nov, 02:18 (IST)

मुंबईत बीच, नदीच्या तटावर किंवा  तलावात  छट पूजेसाठी BMC कडून बंदी घालण्यात आली आहे.

18 Nov, 01:56 (IST)

मुंबईत कोरोनाचे आणखी 541 रुग्ण आढळले असून आज 14 जणांचा बळी गेला आहे.

18 Nov, 01:53 (IST)

ओडिसा मधील  नक्षलवादी जिल्ह्यातील सर्वांना मोफत स्मार्टफोन दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केली आहे.

18 Nov, 01:35 (IST)

शिमला मधील तापमानाचा पारा  4.4 अंशावर तर मनालीत -1.5 अंशावर पोहचल्याची माहिती IMD कडून देण्यात आली आहे.

18 Nov, 01:22 (IST)

पंजाब येथे कोरोनाचे आणखी 515 रुग्ण आढळले असून 30 जणांचा बळी गेला आहे.

18 Nov, 01:22 (IST)

पंजाब येथे कोरोनाचे आणखी 515 रुग्ण आढळले असून 30 जणांचा बळी गेला आहे.

18 Nov, 01:08 (IST)

हरियाणा येथे सार्वजनिक ठिकाणी छट पूजेसाठी बंदी घालण्यात आली आहे.

18 Nov, 24:50 (IST)

उत्तराखंड येथे कोरोनाचे आणखी 429 रुग्ण आढळल्याने आकडा 68,887 वर पोहचला आहे.

18 Nov, 24:40 (IST)

मध्य प्रदेशात कोरोनाचे आणखी 992 रुग्ण आढळले असून 10 जणांचा बळी गेला आहे.

17 Nov, 23:50 (IST)

अलाहाबाद कोर्टासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून 28 अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.

17 Nov, 23:34 (IST)

आँध्र प्रदेशात कोरोनाचे आणखी 1395 रुग्ण आढळल्याने आकडा 8.56,159 वर पोहचला आहे.

17 Nov, 23:21 (IST)

सोलापूर मध्ये  लॉकडाऊनच्या काळामधील वीज बिल माफ करण्याची मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Read more


आज हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची स्मृतीदिन आहे. या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच शिवसैनिक हजेरी लावत आहेत.

देशासह राज्यातील कोरोना व्हायरसचे संकट नियंत्रणात येत असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. तरी देखील संसर्ग वाढणार नाही यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. राज्यात अनलॉक 6 च्या माध्यमातून धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळं कालपासून सुरु करण्यात आली आहेत. मात्र त्यासाठी विशेष नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व सुविधा सुरु करुन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, लसीच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

मुंबईतील शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसंच इयत्ता 9 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा देखील सुरु करण्यात येणार आहेत. दरम्यान, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now