वैज्ञानिक आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या प्रशासनाविषयी माहिती देण्यास सक्षम करण्यासाठी, कोविड-19 लसीच्या चाचण्यांशी संबंधित सर्व डेटा सार्वजनिक केला जावा. प्रोग्रेसिव्ह मेडिकोज अँड सायंटिस्ट्स फोरमने हे सांगितले आहे.
दिवंगत उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय, चाहते तसेच त्यांच्या शिष्यांना कळवितो. यांनी आपल्या बहुविध योगदानामुळे भारतीय शास्त्रीय संगीत विश्व समृद्ध केले व उत्तमोत्तम शिष्यांच्या पिढ्या घडविल्या. त्यांच्या निधनामुळे एक महान शास्त्रीय संगीतकार व तितक्याच थोर व्यक्तिमत्वाला मुकलो आहो, अशा आशयाचे ट्वीट महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. ट्विट-
भाजपाचे माजी परभणी जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अस्वस्थ करणारे आहे. पक्षाचा एक धडाडीचा आणि समर्पित कार्यकर्ता आम्ही गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, अशा आशयाचे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ट्विट-
ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या 32 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याने आतापर्यंत तब्बल 22,000 लोकांची 70 लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे.
काल देशव्यापी कोरोना व्हायरस लसीकरणाचा शुभारंभ झाला. काही जणांना लसीचा डोसही देण्यात आला. मात्र CoWIN App आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे राज्यात उद्या म्हणजे 18 जानेवारी पर्यंत लसीकरण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र लवकरच ते पुर्ववत करण्यात येईल, अशी आशा आहे. दरम्यान लस घेतल्यानंतरही सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध प्रदेशांना जोडणाऱ्या व्हाया केवडिया, गुजरात या 8 ट्रेन्सचे उद्घाटन करतील.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
गेल्या काही दिवसांपासून देशात थंडीची लाट पसरली आहे. पंजाब, पश्चिम यूपी येथे दाट ते अतिशय दाट धुके पसरले असून हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आणि मेघालय येथे मध्यम ते घनदाट धुके पहावयास मिळत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.