16 September 2024 Holiday In Maharashtra: ईद मिलाद उन नबी सणानिमित्त सोमवारी भारतात सार्वजनिक सुट्टी; महाराष्ट्रातही अनेक शाळा, बँका राहणार बंद
सोमवारी ईद-ए-मिलाद-उन-नबीनिमित्त सर्वांना सार्वजनिक सुट्टी असेल.
16 September 2024 Holiday In Maharashtra: पवित्र रमजान महिन्याप्रमाणेच इस्लाम धर्मात रबी-उल-अव्वल महिन्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. एकीकडे जगभरातील मुस्लिम रमजानचा संपूर्ण महिना उपवास करून अल्लाहची उपासना करतात, तर दुसरीकडे रबी-उल-अव्वल महिन्यात प्रेषित मोहम्मद यांची जयंती ईद मिलाद उन नबी (Eid Milad Un Nabi) म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की प्रेषित मोहम्मद यांचा जन्म इस्लामिक चंद्र दिनदर्शिकेतील तिसरा महिना रबी-उल-अवलच्या 12 तारखेला झाला होता, म्हणून त्यांची जयंती या दिवशी साजरी केली जाते. या वर्षी ईद-ए-मिलाद-उन-नबी 16 सप्टेंबर रोजी साजरी केली जात आहे आणि या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असेल.
यावर्षी 16 सप्टेंबर 2024 रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरी केली जात आहे. या दिवशी भारतात राजपत्रित सुट्टी असेल. अशा परिस्थितीत, या प्रसंगी, भारतातील सर्व शैक्षणिक संस्थांसह सर्व सरकारी कार्यालये, न्यायालये, बँका आणि शाळा पूर्णपणे बंद राहतील म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी भारतात सार्वजनिक सुट्टी असेल. 15 सप्टेंबरला रविवार असल्याने शाळा बंद राहतील, तर 16 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद-उन-नबीनिमित्त शाळा बंद राहतील. अशा स्थितीत शाळेतील मुलांना सलग दोन दिवस सुटी मिळणार आहे. (हेही वाचा - Parsva Ekadashi 2024: पार्श्व एकादशी कधी आहे? पूजाविधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून)
ईद-ए-मिलाद-उन-नबीनिमित्त महाराष्ट्रातील शाळा, कार्यालयांना सुट्टी -
ईद-ए-मिलाद-उन-नबीनिमित्त महाराष्ट्रातील शाळा, बँका, सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे. सोमवारी ईद-ए-मिलाद-उन-नबीनिमित्त सर्वांना सार्वजनिक सुट्टी असेल. मंगळवारी अनंत चतुर्दशी साजरी करण्यात येणार असून या दिवशी 10 दिवसाच्या बाप्पाचे गणपती विसर्जन करण्यात येणार आहे.
इस्लामिक मान्यतांनुसार, इस्लामचे संस्थापक प्रेषित मुहम्मद साहिब यांचा जन्म मक्का येथे 12 रबी-उल-अव्वाल रोजी झाला होता. असे म्हणतात की त्यांना अल्लाहने अवतार म्हणून पाठवले होते. पैगंबर मोहम्मद यांचे वडील अब्दुल्ला बिन अब्दुल होते, तर त्यांच्या आईचे नाव आमेना होते.