जम्मू-कश्मीर येथे 2G सर्विस येत्या 27 एप्रिल पर्यंत पोस्टपेड आणि वेरिफायईड प्रिपेड सिमकार्डसाठी सुरु राहणार ; 15 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आज दिवसभरात महाराष्ट्र, देश आणि विदेशात कोरोनाबाबतीत काय घडामोडी घडतात. कोरोना रुग्णांची संख्या कमी होते की वाढते यासह इतरही विविध जसे की क्रीडा, आरोग्य, राजकारण, समाजकारण,अर्थकारण, पर्यावरण आदी विषयांवरही लेटेस्टली मराठी लक्ष ठेऊन असणार आहे. त्यामुळे दिवसभरातील ताज्या, ठळक घटना आणि घडामोडींचे अपडेट मिळविण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.
आज रात्री 9 वाजेपर्यंत 2,58,730 व्यक्तींकडील एकूण 2,74,599 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. आतापर्यंत संशयित आणि ज्ञात सकारात्मक प्रकरणांच्या संपर्कांमध्ये आलेल्या 11297 व्यक्तींची कोरोना व्हायरस चाचणी सकारात्मक असल्याची पुष्टी केली गेली आहे. आज 28941 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, पैकी 953 लोकांची चाचणी सकारात्मक आली आहे.
वांद्रे स्थानकातील गर्दी प्रकरणी सोशल मीडियातील 30 अकाउंटच्या माध्यमातून रेल्वेसंदर्भात अफवा पसरवल्याचे उघड झाल्याची माहिती महाराष्ट्र सायबर यांच्याकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात आज एकूण 232 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली असून, राज्यात एकूण रुग्ण संख्या 2916 झाली आहे. आज 36 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आतापर्यंत 295 रूग्ण बरे झाले आहेत व त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 187 मृत्यूची नोंद झाली असून त्यापैकी आज 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात 49 वर्षांच्या कोरोना व्हायरस पुरुष रूग्णाचे निधन झाले आहे, तो न्यूमोनियाने ग्रस्त होता. पुण्यात आज झालेला हा पाचवा मृत्यू आहे. कोरोना व्हायरस आजारामुळे पुण्यातील मृतांचा आकडा 43 झाला आहे.
आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीदरम्यान पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कामगारांना अडवणूक होऊ नये यासाठी, पोलिस विभागाशी समन्वय साधण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (दक्षता) सुनिल भारव्दाज यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईमध्ये 183 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह केसेस आणि 2 मृत्यूची नोंद झाली आहे. अशाप्रकारे मुंबईतील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1936 आणि मृत्यू 113 झाले आहेत. आतापर्यंत 181 रुग्णांना सोडण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 81, 000 थ्री-प्लाई सर्जिकल मास्क बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेने धारावी येथील एकाला अटक केली आहे. या व्यक्तीकडून अंदाजे 12,15,000 लाखांचे मास्क जप्त केले आहेत.
भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस लॉकडाउन मुळे, ज्या कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना मार्चचे वेतन दिले आहे अशांसाठी इलेक्ट्रॉनिक चालान कम रिटर्न (ईसीआर) दाखल करण्याची नियत तारीख 15 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.
इक्बाल मिर्ची मनी लाँड्रिंग प्रकरणी वाधवान बंधूंचा जामीन रद्द करण्यासाठी ED ने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी 23 एप्रिल रोजी सुनावणी होईल.
टेलिकॉम कंपनी एअरटेल (Airtel) आपल्या वर्क फ्रॉम होम करणा-यांसाठी एक जबरदस्त डेटा प्लान आणला आहे. ज्यात 399 रुपयांत युजर्सला 50GB डेटा मिळणार आहे. (सविस्तर वृत्त वाचण्यासाठी इथे क्लिक करा)
चीनच्या (China) वूहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) या आजाराने अनेक देशांना ग्रासले आहे. अमेरिके (US) सारखा विकसित देशही यातून सुटला नाही. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)
महाराष्ट्रात वाढता कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता आता अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान 30 एप्रिलला होणारी MCA CET 2020 exam देखील रद्द झाली आहे. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)
वांद्रे येथील गर्दीस कारणीभूत ठरलेला विनय दुबे याला मुंबई पोलीसांनी अटक केली. अटक केल्याव दुबे याला स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)
मुंबई महापालिका विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) विभागात कार्यरत असलेल्या एका कोविड 19 संक्रमीत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा कर्मचारी मुंबईतील टिळकनगर परिसरातील रहीवासी होता. त्याला 3 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्याचा मृत्यू झाला.
लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा. त्यामुळे देशभरात उमटलेल्या संमिश्र प्रतिक्रिया आणि प्रश्न यामुळे कालचा दिवस चर्चेत राहिला. त्यात मुंबई येथील वांद्रे स्टेशनवर उसळलेल्या परप्रांतीय नागरिकांच्या गर्दीने तर कहरच केला. या सर्व प्रकारावर राजकीय टीका टीप्पणी सुरु झाली. या सर्व गदारोळात आजचा दिवस सुरु झाला आहे. त्यामुळे सहाजिकच कालच्या वांद्रे प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणास कारणीभूत असल्याचा संशय असलेल्या विनय दुबे नामक एका उत्तर भारतीय नेत्याला पोलिसांनी अटकही केली आहे. मात्र, तेवड्यावर हे प्रकरण न थांबाता पुढे अधिक तापण्याची आणि राजकीय वर्तुळातून तापवले जाण्याची शक्यता आहे. यावर आज दिवसभर लक्ष राहणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. काल दिवशभरात रात्री उशिरा हाती अलेल्या शेवटच्या अपडेटनुसार राज्यात 350 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आतापर्यंत 2 हजार 684 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुळे एकूण 178 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाजूला एकूण देशाचा विचार करता कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 10815 इतकी आहे. त्यापैकी प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 9272 आहे. तर उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने डिस्चार्ज मिळालेल्या व्यक्तिंची संख्या 1189 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 353 इतकी आहे.
दरम्यान, आज दिवसभरात महाराष्ट्र, देश आणि विदेशात कोरोनाबाबतीत काय घडामोडी घडतात. कोरोना रुग्णांची संख्या कमी होते की वाढते यासह इतरही विविध जसे की क्रीडा, आरोग्य, राजकारण, समाजकारण,अर्थकारण, पर्यावरण आदी विषयांवरही लेटेस्टली मराठी लक्ष ठेऊन असणार आहे. त्यामुळे दिवसभरातील ताज्या, ठळक घटना आणि घडामोडींचे अपडेट मिळविण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)