दक्षिण दिल्लीच्या अनेक भागात शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी सकाळी दिल्ली जल बोर्डाकडून पाणीपुरवठा नाही; 14 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

15 Jan, 04:29 (IST)

दक्षिण दिल्लीच्या अनेक भागात राहणाऱ्या लोकांना शुक्रवारी संध्याकाळी आणि त्यानंतर शनिवारी सकाळी दिल्ली जल बोर्डाकडून पाणीपुरवठा होणार नाही. अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. डीजेबीच्या निवेदनानुसार, जी के उत्तर येथे फ्लोमीटर बसविल्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल.

15 Jan, 03:43 (IST)

राज्य शासनास आत्तापर्यंत Covishield चे 9.63 लाख डोस आणि Covaxin चे 20,000 डोस प्राप्त झाले आहेत. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचार्‍यांना प्राधान्याने लस दिली जाईल. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

15 Jan, 03:22 (IST)

आज एकूण 382 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. 8 जानेवारीपासून आतापर्यंत विविध पक्ष्यांच्या एकूण 3,378 मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात 9 जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका आहे. महाराष्ट्र शासनाने ही माहिती दिली.

15 Jan, 02:49 (IST)

कोविड-19 आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे केरळला 1.56 लाख कोटी रुपयांचा महसूल तोटा सहन करावा लागला आहे. राज्याचे अर्थमंत्री T M Thomas Isaac यांनी ही माहिती दिली.

15 Jan, 02:17 (IST)

भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सूचना दिली आहे.

15 Jan, 02:06 (IST)

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 570 रुग्ण आढळल्याने आकडा 2,54,314 वर पोहचला आहे.

15 Jan, 01:51 (IST)

येत्या 31 डिसेंबर पर्यंत   युके येथून दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाइन राहावे लागणार असल्याचे  सरकारने जाहीर केले आहे.

15 Jan, 01:44 (IST)

लद्दाख येथे कोरोनाच्या लसच्या डोसची पहिली बॅच दाखल झाली आहे.

15 Jan, 01:30 (IST)

हिमाचल प्रदेशात कोविड19 च्या लसीचे  93 हजार डोस पोहचले आहेत.

15 Jan, 01:09 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 3579 रुग्ण आढळले असून 70 जणांचा बळी गेला आहे.

15 Jan, 01:07 (IST)

केरळ मधील मल्लपुरम जिल्ह्यात कोरोनाची लस पोहचली आहे.

15 Jan, 24:45 (IST)

पंतप्रधान मोदी 16 जानेवारी रोजी कोविड लसीकरण मोहिमेचे पॅन इंडिया रोलआउट करणार आहेत.

15 Jan, 24:42 (IST)

चंद्रपूर येथे कोविशिल्डची लस पोहचली  आहे.

15 Jan, 24:15 (IST)

जालना जिल्ह्यात कोविशिल्डचे 14 हजार डोसेस प्राप्त झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

15 Jan, 24:00 (IST)

मुंबईत पेट्रोलचे दर 91 रुपयांहून अधिक प्रति लीटर झाल्याने  येत्या 16 जानेवारीला काँग्रेसकडून नागपूरातील राज भवनावर घेरो आंदोलन करण्यात येणार आहे.

14 Jan, 23:38 (IST)

दिल्लीत चिकनची विक्री, साठवणूक किंवा पोल्ट्रीवरील बंदी हटवली आली आहे.

14 Jan, 23:13 (IST)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मकरसंक्राती निमित्त पतंग उडवण्याच्या  कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे दिसून आले आहे.

14 Jan, 22:46 (IST)

दिल्लीत स्पा सुरु करण्यास परवानगी पण नियमांचे पालन करावे लागणार असा निर्णय  हायकोर्टाने दिला आहे.

14 Jan, 21:59 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीला ‘Prarambh: Startup India International Summit’मध्ये startups ना संबोधित करणार  आहेत. हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारा होईल.

14 Jan, 21:08 (IST)

 धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जातंय,राजीनाम्यावर चर्चा नाही. पोलिस तपासाच्या निष्कर्षानंतर निर्णय घेतला जाईल अशी माहिती एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. 

Read more


आज मकर संक्रांतीचा सण. भारतामध्ये विविध प्रथा, परंपरांनी हा सण साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासियांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सणाच्या निमित्ताने सुरू होणारा उत्तरायणाचा काळ तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आजच्या दिवशी तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत शुभेच्छा देण्याची पद्धत आहे.

अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्या विरूद्ध दुसर्‍यांदा महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिका संसद परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि नंतर ट्र्म्प यांच्या प्रतिक्रियेवर अमेरिकेत काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रिपब्लिकन पक्षातील ट्र्म्प यांच्याच काही साथीदारांनी राजीनामे देत सार्‍या प्रकाराबाबत निषेध नोंदवला होता.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

मुंबई मध्ये सध्या ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या कारवाईला वेग आला आहे. यामध्ये काल मुच्छड पानवाला आणि त्यापाठोपाठ एनसीबी नेते नवाब मलिक यांच्या जावयाला अटक झाल्यानंतर एनसीबीकडून रात्रभर धाडसत्र सुरू होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now