ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी चार बांग्लादेशींना पकडून पोलिसांच्या हवाली केले; 13 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.

14 Feb, 04:39 (IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बांग्लादेशींविरोधात एल्गार पुकारलेला असताना, ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी चार बांग्लादेशींना पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. त्यांच्याकडे बांग्लादेशचा पासपोर्ट सापडल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे.

14 Feb, 03:09 (IST)

केइएम रुग्णालयातील रुग्णांच्या मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, इम्पॅक्ट गुरू सोबत एकत्र येऊन 'हेल्थ केअर क्राऊड फंडिंग' हा उपक्रम राबवणार आहेत. जनतेने जनतेसाठी उभी केलेली रकम मुंबईतील आरोग्य सेवा अधिक कार्यक्षम करेल असा बीएमसीला विश्वास आहे. 

14 Feb, 02:24 (IST)

भंडारा जिल्ह्यातील ‘आयटीआय’चा कायापालट होणार आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी नेत नवाब मलिक यांनी निर्णय घेतला आहे.

 

14 Feb, 02:10 (IST)

भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या वित्तमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सुनक यांना आपल्या मंत्रिमंडळात ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.  ऋषी सुनक हे इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. 

 

 

14 Feb, 24:47 (IST)

भाजप पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या द्वेषयुक्त वक्तव्यामुळे भाजपाला त्रास सहन करावा लागला, असं मत भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला फक्त 8 जागांवर विजय मिळवता आल्या. दिल्ली विधानसभा प्रचारावेळी भाजपच्या अनेक नेत्यांनी द्वेषयुक्त वक्तव्य केले होते. याचा मोठा परिणाम भाजपवर झाला असल्याचे अप्रत्यक्षपणे अमित शहा यांनी सांगितलं आहे. 


 

14 Feb, 24:31 (IST)

मुंबईतील डबेवाल्यांना लवकरच आपल्या हक्काचं घर मिळणार आहे. आज  मंत्रालयात आयोजित बैठकीत मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरं उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

14 Feb, 24:22 (IST)

राणीच्या बागेत आता करिष्मा आणि शक्ती या वाघांची डरकाळी ऐकू येणार आहे. औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानातून करिश्मा (मादी) आणि शक्ती (नर) हे दोन वाघ राणीच्या बागेत आणण्यात आले आहेत. त्यामुळे राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांना हे वाघ जवळून पाहता येणार आहेत.

 

13 Feb, 23:42 (IST)

मराठीत चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात 'मिनी चित्रपटगृह' उभारणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळावे तसेच मराठीत येत असलेल्या दर्जेदार चित्रपटांना प्रेक्षकांनी गर्दी करावी, यासाठी ही मिनी चित्रपटगृह उभारण्यात येणार आहेत. 

 

13 Feb, 23:30 (IST)

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मायकल क्लार्कने आपली पत्नी कायलीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या सात वर्षानंतर क्लार्कने हा निर्णय घेतला आहे. कायली आणि क्लार्क यांना एक मुलगीही आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील संबंध बिघडले होते. त्यामुळे क्लार्कने आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

13 Feb, 23:00 (IST)

मुंबईतील नागपाडा जंक्शन परिसरात नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाने पोलिस कॉन्स्टेबलच्या बोटाला चावा घेतल्याची घटना घडली आहे. यात पोलिस कॉन्स्टेबलच्या बोटाचा तुकडा पडला आहे. जनार्दन साखरे, असं या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव असून तो नागपाडा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. साखरे यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मिड-डे या इंग्रजी वेबसाईटने वृत्त प्रकाशित केले आहे.  

 

13 Feb, 22:41 (IST)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून राज्यातील पोलिसांची व्यवस्था नीट करण्यात यावी अशी विनंती केली आहे. व्हीआयपी चळवळी आणि राजकीय मेळाव्यासाठी तैनात वेळी पोलिस कर्मचारी विशेषत: महिला पोलिस कर्मचार्‍यांचे हाल होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी असेही पवार यांनी पत्रात म्हंटले आहे.

13 Feb, 21:26 (IST)

मुंबई- लातूर बिदर एक्सप्रेस मध्ये  एका 26 वर्षीय तरुणाला काही अज्ञातांनी किरकोळ कारणावरून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. याप्रकरणी दौंड रेल्वे पोलिसानी 12 जणांना ताब्यात घेतले आहे.  तरुणाला झालेल्या मारहाणीनंतर त्याला दौंड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हिते मात्र उपचार्याच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

13 Feb, 21:18 (IST)

दिल्ली मध्ये काल 12 फेब्रुवारी रोजी एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती, याप्रकरणी आता पोलिसांनी एकाला अटक केल्याचे समजत आहे.

13 Feb, 21:08 (IST)

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एका गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन यात तब्बल 13 जण गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे. यातील 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जयपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

13 Feb, 20:53 (IST)

अंधेरी MIDC परिसरात रॉल्टा टेक्नॉलॉजी पार्क इमारतीला लागलेली आग अद्याप विझलेली नाही, परिणामी काळजी म्हणून आजूबाजूच्या इमारती खाली करण्यात आल्या आहेत. सध्या ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत सुदैवाने या इमारतीत कोणीही अडकलेले नाही.

13 Feb, 20:06 (IST)

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत लवकरच सरकार स्थापन होणार आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांच्या नव्या मंत्रीमंडळात जुनेच मंत्री शपथ घेणार आहेत.

13 Feb, 19:39 (IST)

मॅच फिक्सिंगचा आरोप असलेल्या संजीव चावलाचे इंग्लंडहून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. संजीव चावलावर दक्षिण आफ्रिकेच्या 200 मधील भारत दौऱ्यावेळी सामना निश्चितीचा (मॅच फिक्सिंग) आरोप करण्यात आला होता. चावलाला गुरुवारी इंग्लंडहून नवी दिल्लीत आणण्यात आलं आहे. 

13 Feb, 19:35 (IST)

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळ गुरुवारी सकाळी टाटा सुमो कार उलटून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कारमधून प्रमाणापेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. दरम्यान, वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.   

 

13 Feb, 19:28 (IST)

महावितरणचा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघकीस आला आहे. महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गेल्या पाच वर्षात गोलमाल करत तब्बल 30 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. 

 

13 Feb, 18:46 (IST)

अंधेरी MIDC परिसरात रोळता टेक्नॉलॉजी पार्क येथे आज 13 फेब्रुवारी रोजी दुपारी भीषण आग लागल्याचे समजत आहे. याठिकाणी सध्या अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

 

Read more


आज, 13 फेब्रुवारी हा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  पक्षासाठी महत्वाचा ठरणार आहे, सांगली (Sangali)  येथील काँग्रेसचे माजी आमदार सदाशिव पाटील (Sadashiv Patil)  आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश घेणार असल्याचे समजतेय, तर वंचित बहुजनचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांनी सुद्धा आपण 12 एप्रिल रोजी राष्ट्रवादी  प्रवेश घेणार असल्याची घोषणा केलेली आहे. यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कमाल कामगिरी करून दाखवली याच विश्वासाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Vidhansabha Elections) सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने काही उमेदवार उभे केले होते, मात्र या सर्व उमेदवारांना नोटाहूनही कमी मते मिळाल्याने पक्षाची काहीशी निराशा झाली होती.

दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या पक्षाच्या नव्या भूमिकेसह आज पहिल्यांदा औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 57 ते 70 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी मनसेकडून केली जाणार आहे. त्या तयारीचा भाग म्हणून 13 ते 16 फेब्रुवारी या तीन दिवसात राज ठाकरे औरंगाबाद येथे मुक्कामी असणार आहेत. काही काळापासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे यासाठी मनसेकडून आग्रह धरला जात होता, याबाबत काल आमदार राजू पाटील यांनी माहिती दिली.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.

दरम्यान राष्ट्रीय स्तरावर, काल केंद्र सरकडून विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली, तब्बल 145 रुपयांच्या दर वाढीमुळे महानगरात गॅसच्या किंमती या 850 च्या घरात गेल्या आहेत, या दर वाढीच्या विरुद्ध आज काँग्रेस महिला कार्यकर्त्यांकडून बंदा ची हाक देण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now