Aligarh: नातेवाईकांना भेटायला आली आणि उजवा हात गमवून बसली 13 वर्षीय तरूणी; वडिलांचा वीज विभागावर निष्काळजीपणाचा आरोप
मुंबई च्या 13 वर्षीय तरूणीने Aligarh मध्ये उच्च दाब असलेल्या ओवरहेड वायरच्या संपर्कात आल्याने हात गमावल्याची विचित्र घटना समोर आली आहे.
मुंबई च्या 13 वर्षीय तरूणीने Aligarh मध्ये उच्च दाब असलेल्या ओवरहेड वायरच्या संपर्कात आल्याने हात गमावल्याची विचित्र घटना समोर आली आहे. ही मुलगी वडिलांसोबत आपल्या नातेवाईकांच्या घरी भेटीला आली होती. घराच्या टेरेस वर खेळताना तिच्यासोबत हा प्रकार घडला आहे.
30 ऑक्टोबर दिवशी ही चिमुकली खेळत असताना Hamdard Nagar colony मध्ये हा प्रकार घडला आहे. Anamta असं या मुलीचं नाव असून ती इयत्ता 9वी मध्ये शिकते. हाताला इजा झाल्याचं समजताच तिला पहिल्यांदा स्थानिक रूग्णालयामध्ये आणि नंतर गुरूग्राम च्या मेदांता हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले होते.
जखमी अवस्थेमध्ये असलेल्या तरूणीची प्रकृती क्रिटिकल आहे. तिच्या कुटुंबाने तिला एअरलिफ्ट करत मुंबई च्या National Burns Center (NBC) मध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. येथील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, Anamta ला 11% बर्न्स या उजवा हात, उजवा पाय आणि पाठीवर आहेत. सध्या तिच्यावर स्किन ग्राफ्टिंग सर्जरी करण्याचा प्रयत्न आहे. आता तिच्या जीवावरील धोका टळला असला तरीही ती आयसीयू मध्ये आहे.
जखमी तरूणीच्या कुटुंबाने या घटनेसाठी वीज विभागाला दोषी ठरवले आहे. त्यांचा निष्काळजीपणा याला कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. वीज विभागासोबत घरमालक देखील दोषी असल्याचं म्हणाले आहेत. घरमालकाने बेकायदेशीरपणे घराची बाल्कनी वाढवली आहे. पण यामध्ये हायव्होल्टेज वायर पासून सुरक्षित राहण्यासाठी काही काळजी घेतलेली नाही. Qasim Khan याच्या मालकीचं हे घर आहे. त्याने 2500 रूपये खर्च करून हा धोका टाळणं गरजेचे समजले नाही. असा आरोप करत त्याच्या निष्काळजीपणाची किंमत माझ्या मुलीने चुकवली असल्याचं ते म्हणाले आहेत. आतापर्यंत मुलीच्या उपचारासाठी खान यांनी 40 लाख खर्च केले आहेत.
power department in Aligarh यांच्याकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्याकडून रहिवासी भागात अशाप्रकारे हलणार्या वायर हटवण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. SK Jain, superintendent engineer यांनी TOI सोबत बोलताना आम्ही रिपोर्ट तयार करत आहोत. तो लखनौ ऑफिसला पाठवला जाईल. जशी परवानगी मिळेल तशा या वायर हटवण्याचं काम केले जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)