धक्कादायक! 8 महिन्यांच्या गर्भवतीची उपचारासाठी 13 तास धावपळ; रुग्णालय न मिळाल्याने रुग्णवाहिकेत मृत्यू
उपचाराअभावी एका गर्भवती महिलेचा (Pregnant Women) मृत्यू झाला आहे. ही गर्भवती महिला कोरोना विषाणू संक्रमित होती व यामुळेच कोणत्याही रुग्णालयाने तिला दाखल करून घेतले नाही.
एकीकडे देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमणाची संख्या वाढत असताना, रुग्णालयाने रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. उपचाराअभावी एका गर्भवती महिलेचा (Pregnant Women) मृत्यू झाला आहे. ही गर्भवती महिला कोरोना विषाणू संक्रमित होती व यामुळेच कोणत्याही रुग्णालयाने तिला दाखल करून घेतले नाही. तब्बल 13 तास ही 8 महिन्यांची गर्भवती महिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयाच्या शोधासाठी भटकत होती. उपचाराअभावी रुग्णवाहिकेच तिचा मृत्यू झाला, तसेच तिच्या गर्भात असणाऱ्या मुलाचादेखील मृत्यू झाला. हे प्रकरण दिल्लीशेजारील नोएडा (Noida) येथील आहे. या प्रकरणी डीएम सुहास एल वाय यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanathयांनी स्वत: गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणात या घटनेची दखल घेत, तातडीने चौकशी देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. डीएमने सीएमओसह दोन जणांना तपास अधिकारी म्हणून नेमून, त्यांना याबाबत लवकरात लवकर अहवाल देण्यास सांगितले आहे. यासंदर्भात शनिवारी तपास अधिकारी सीएमओ आणि एडीएम यांनी जिल्हा रुग्णालय सेक्टर -30 ला भेट दिली आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला तसेच सीएमएसला या घटनेबाबत फैलावर घेतले. (हेही वाचा: हॉस्पिटलचं बिल भरलं नाही म्हणून 80 वर्षीय वृद्ध रुग्णाला बेडवर दोरीने बांधून ठेवलं)
शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तपास अधिकारी आणि एडीएम मुनिंद्र नाथ उपाध्याय जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय डॉक्टर दीपक यांच्यासमवेत जिल्हा रुग्णालयात पोहोचले. दोन तास रुग्णालयात त्यांनी सीएमएस व डॉक्टरांची निवेदने नोंदविले.
दरम्यान, गाझियाबाद येथील खोडा कॉलनी येथे राहणारी नीलम कुमारी 8 महिन्यांची गरोदर होती. प्रसूती वेदना झाल्यावर तिला शुक्रवारी सकाळी 6 वाजता ऑटोने रुग्णालयात नेले. तिथे तिला दाखल करून घेण्यास नकार दिल्याने, त्यानंतर दिवसभर कोणत्याही रुग्णालयाने तिला भर्ती करून घेतले नाही, अखेर संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. संध्याकाळी 7 वाजता तिला मृत घोषित करण्यात आले.