कर्नाटकचे सीएम बीएस येडियुरप्पा यांचे KSRTC कर्मचार्‍यांना त्यांचा संप थांबवण्याचे आवाहन; 13 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

14 Dec, 05:02 (IST)

कर्नाटकचे सीएम बीएस येडियुरप्पा यांनी KSRTC कर्मचार्‍यांना त्यांचा संप थांबवण्याचे आवाहन केले आहे. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी आणि गृहमंत्री बसवराजा बम्माई यांनी आज घेतलेल्या बैठकीत केएसआरटीसी कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेल्याचे आसल्याचे सीएमओकडून सांगण्यात आले आहे.

14 Dec, 04:53 (IST)

गुजरात येथे आज 1 हजार 175 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ट्विट-

 

14 Dec, 03:51 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात एकाला अटक करण्यात आली आहे.

14 Dec, 03:34 (IST)

आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी उपोषण करणार आहेत.

14 Dec, 03:10 (IST)

हिमाचल प्रदेशमध्ये आज कोरोना विषाणूच्या 424 रुग्णांची व 8 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 740 रुग्ण बरे झाले आहेत. अशा प्रकारे राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 49,375 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 7,251 सक्रीय रुग्ण आहेत, आतापर्यंत एकुणु 41,278 रुग्ण बरे झाले आहेत व 801 मृत्यूंची नोंद झाली आहे.

14 Dec, 02:21 (IST)

धरमगडहून हैदराबादकडे जाणाऱ्या खासगी बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 40 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्विट-

 

14 Dec, 01:29 (IST)

पश्चिम बंगालच्या पुर्वा वर्धमानच्या पूर्बस्थली भागात आज भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह आढळून आला आहे. ट्विट-

 

 

14 Dec, 24:22 (IST)

सरकार शेतकऱ्याच्या कल्याणासाठी आणि सर्व सुविधांसाठी सर्व पावले उचलत आहे; कृषी कायद्यावरील शेतकरी आंदोलनाचे निराकरण संघर्षाद्वारे नव्हे तर संवादांद्वारे शक्य आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. ट्विट-

 

13 Dec, 23:39 (IST)

दिल्लीत आज 1 हजार 984 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 33 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-

 

 

दिल्लीत आज 1 हजार 984 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 33 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-

 

13 Dec, 23:14 (IST)

उत्तराखंडमधील शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे. ट्विट-

 

13 Dec, 22:44 (IST)

संस्कृत पंडीत Bannanje Govindacharya यांच्या  निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक व्यक्त केला आहे.

13 Dec, 22:30 (IST)

शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री, AAP नेते अरविंद केजरीवाल यांचे उद्या एकदिवसीय उपोषण  करणार आहेत. त्यांनी आपच्या अन्य नेते, कार्येकर्ते आणि सामान्यांनाही त्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले आहे.

13 Dec, 22:00 (IST)

महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज भाजपाची पत्रकार परिषद सुरू आहे. यावेळेस चहापानावर त्यांनी बहिष्कार टाकत केवळ 6-7 तासांच्या अधिवेशनावर नापंसती दर्शवली आहे. 

13 Dec, 21:40 (IST)

पाकिस्तानमध्ये गंज मंडी पोलिस स्टेशन जवळ रावळपिंडीत स्फोट झाला असून 14 जण जखमी झाल्याची पाकिस्तानी मीडियाची माहिती आहे.

13 Dec, 21:13 (IST)

केंद्रीय कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केवळ काही मह्त्त्वाचे नेते कायद्याला विरोध करायचा म्हणून कृषी कायद्याच्या विरोधात आहेत. त्यंनीही यापूर्वी कायद्यात बदल करण्याची भूमिका मांडली होती. असे म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे.

13 Dec, 19:55 (IST)

महाराष्ट्र राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेधन 2 दिवस असल्याने त्याच्या निषेधार्थ आज पूर्वसंध्येला होणार्‍या चहापानावर भाजपाचा बहिष्कार  आहे. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्र्कांत पाटील यांनी दिली आहे. 

 

 

13 Dec, 19:31 (IST)

दिल्लीः केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि सोम प्रकाश यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची  निवासस्थानी भेट घेतली.

13 Dec, 19:27 (IST)

प्रभादेवी आणि जांभोरी मैदान येथील रक्तदान शिबिरास आदित्य ठाकरे यांनी भेट दिली असून रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप आणि संवाद असा कार्यक्रम पार पडला.

13 Dec, 19:10 (IST)

संस्कृत पंडीत Bannanje Govindacharya यांचे निधन झाले आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

13 Dec, 18:42 (IST)

दिल्लीमध्ये राज्यपालांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलनाला बसलेल्या AAP leader Atishi Marlena यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Read more


13 डिसेंबर 2001 साली संसदेवर झालेल्या हल्ल्याची आज वर्षपूर्ती आहे. या निमित्ताने ज्यांनी या हल्ल्यांच्या वेळेस आपल्या प्राणांची आहुती देत वीरता दाखवली त्यांना स्मरण करण्यासाठी आजचा दिवस आहे. या निमित्ताने भारताचे पंत्प्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य राजकीय मंडळींनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

देशभरात कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांचं आंदोलन तीव्र होत असताना अमेरिकेत वॉशिंगटन डीसी मध्ये त्याचे पडसाद पहायला मिळाले. मात्र अमेरिकेत देशविरोधी संघटना एकत्र येत आंदोलन करताना दिसत आहेत. खलिस्तानी झेंडे दिसले.तसेच एम्बेसी जवळ असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची देखील अवमानना केली असल्याची माहिती दिली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

भारतामध्येही आज शेतकरी आंदोलनाचा 18 वा दिवस आहे. शाहजहांपूरकडे शेतकरी येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान आज दिल्लीजयपूर हायवे जाम करण्यास सुरूवात झाली आहे. तर चिल्ला सीमेवरील शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेऊन तेथील मार्ग मोकळा आहे. दिल्ली-नोएडा मार्ग आता खुला करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आज-उद्या वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात सर्वदूर पुढील 2 दिवस पावसाचे असणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now