Drunk Man Molests Girl In Meerut: मेरठमध्ये मद्यधुंद व्यक्तीकडून मंदिराबाहेर 12 वर्षीय मुलीचा विनयभंग; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ

या घटनेचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये मुलगी त्या व्यक्तीच्या तावडीतून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी मुलीची ओढणी ओढताना दिसत आहे.

Drunk Man Molests Girl In Meerut (फोटो सौजन्य - X/@NigarNawab)

Drunk Man Molests Girl In Meerut: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ (Meerut) मध्ये एका व्यक्तीने मंदिरातून परतणाऱ्या 12 वर्षीय मुलीचा विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना घडकीस आली आहे. या घटनेचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये मुलगी त्या व्यक्तीच्या तावडीतून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी मुलीची ओढणी ओढताना दिसत असून पीडित मुलीने त्याला ढकलून घटनास्थळावरून पळ काढला.

या सर्व प्रकाराची माहिती पीडितेने आपल्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर कुटुंबियांनी भवानपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून मद्यधुंड व्यक्तीला अटक केली आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार, तिची मुलगी मंदिरात प्रार्थना करून घरी परतत होती. गावातील अमित या तरुणाने तिचा विनयभंग केला. मात्र, मुलीने आरोपीच्या तावडीतून आपली सुटका केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. (हेही वाचा -Nair Hospital Molestation Complaints: विनयभंगाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी नायर रुग्णालयाच्या डीनची बदली; CM Eknath Shinde यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश)

प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत होता. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा मद्यधुंद तरुणाकडून विनयभंग करण्यात आला. मात्र, कोणीही तिच्या मदतीसाठी धावून आले नाही. या व्यक्तीने यापूर्वीही मुलीचा विनयभंग केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहेत. (हेही वाचा - Minor Girl Molested in Nagpada: मुंबईतील नागपाडा येथे ८ वर्षीय मुलीचा विनयभंग, तक्रारीनंतर आरोपीला अटक)

मेरठमध्ये मद्यधुंद व्यक्तीकडून मंदिराबाहेर 12 वर्षीय मुलीचा विनयभंग, पहा व्हिडिओ - 

उत्तर प्रदेशात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढत -

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वारंवार चेतावणी देऊनही उत्तर प्रदेशात महिलांवरील गुन्ह्यांची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. राज्य सरकारने या घटनांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now