पुणे जिल्ह्यात मागील 24 तासांत 4717 नवे रुग्ण आढळले असून 90 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,20,692 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 5,059 वर पोहोचला आहे.
पुणे जिल्ह्यात 4717 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,20,692 वर ; 12 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
जगभरासह देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. परंतु कोरोनाच्या परिस्थितीवर नियंंत्रण मिळवण्यास सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या 29 दिवसात 100 टक्क्यांहून अधिक वेगाने कोरोनाग्रस्तांची प्रकृती सुधारल्याचे सांगितले होते. तर आता % रिकव्हरी रुग्ण आणि %अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. एकूण कोरोनासंक्रमित रुग्णांच्या 3/4 पेक्षा अधिक (36 लाखांहून अधिक) जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 10.5 लाखांहून कमी अॅक्टिव्ह रुग्ण संख्या असल्याचे ही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्राच्या नेतृत्वाखाली COVID19 च्या रुग्णांच्या चाचण्या आणि रुग्ण शोधून काढले जात आहेत. तसेच रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी उत्तम वैद्यकिय सोईसुविधा आणि होम क्वारंटाइनसाठी सुद्धा अशाच पद्धतीचे उपचार केले जात असल्याने मृत्यूदर कमी होत आहे.
दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 0.13 रुपयांनी घट झाली असून दर 81.86 रुपये प्रति लीटरवर पोहचले आहेत. तसेच डिझेलची किंमतीत 0.12 रुपयांनी कपात झाली असून दर 71.93 प्रति लीटर रुपये झाले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून राज्यांतर्गत ट्रेन बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र रेल्वे विभागाने बारा गाड्यांना परवानगी दिल्यानंतर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून मनमाड येथून पहिली ट्रेन मनमाड येथून प्रवाशांना घेऊन मुंबईला धावली .
दरम्यान, महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेन अंतर्गत शासनाने निवासी सुविधांना (हॉटेल, लॉज, रिसॉर्टस् इत्यादी) शंभर टक्के क्षमतेने सुरु करण्यास संमती दिली आहे. त्यानंतर शासनाने कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स, रिसॉर्टस्, होम-स्टेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह यांनी राज्यातील प्रमुख हॉटेल असोसिएशन्सना पत्राद्वारे ही कार्यप्रणाली कळवली आहे.