पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ; दिवसभरात 1088 रुग्णांची भर, 39 मृत्यू; 12 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई, पुणे सह देशापरदेशातील ताज्या बातम्या, ठळक घडामोडी यांच्यासह ब्रेकिंग न्यूज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

13 Jul, 05:13 (IST)

मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. पुण्यात आज 1 हजार 88 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 39 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

13 Jul, 03:42 (IST)

पुण्यात 14 ते 18 जुलै दरम्यान किराणा दुकाने उद्याने, क्रीडांगणे, हॉटेल्स पूर्णपणे बंद, पेट्रोल पंप आणि गॅस पंप सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत.

 

13 Jul, 03:24 (IST)

वाराणसीमधील सर्व दुकाने, बाजारपेठा, खाजगी व शासकीय कार्यालये, औषधाची दुकाने, सर्व मंडळे, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, वाहतूक कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. एएनआयचे ट्वीट- 

 

13 Jul, 02:48 (IST)

हरियाणात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यात आज 658 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार 983 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

13 Jul, 02:18 (IST)

बीड जिल्ह्यात विवाह सोहळ्यासाठी फक्त 10 जणांना उपस्थिती लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

13 Jul, 02:08 (IST)

जम्मू-कश्मीर मधील नौशेरा मधील राजौरी जिल्ह्यात पाकिस्तान कडून शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

13 Jul, 01:52 (IST)

गोव्यात आणखी 85 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 2453 वर पोहचला आहे.

13 Jul, 01:44 (IST)

जम्मू-कश्मीर मधील पर्यटन येत्या 14 जुलै पासून टप्प्याटप्पाने सुरु होणार आहे.

13 Jul, 01:31 (IST)

तेलंगणाच्या राजभवनातील 18 पोलीस, 10 कर्मचाऱ्यांसह त्यांच्या 10 परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली असून राज्यपालांची COVID19 चाचणी निगेटिव्ह आली आहे.

13 Jul, 01:20 (IST)

गुजरात येथे गेल्या 24 तासात आणखी 879 कोरोनाबाधित रुग्णांची भर तर 13 जणांचा बळी गेला आहे.

13 Jul, 01:04 (IST)

मुंबईत आज आणखी 1263 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असली असून 44 जणांचा बळी गेला आहे.

13 Jul, 01:00 (IST)

भीमा कोरोगाव प्रकरणातील  गौतम नवलखा याचा जामीन मुंबईतील NIA कोर्टाने फेटाळला  आहे. 

13 Jul, 24:57 (IST)

पश्चिम बंगाल येथे गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 1560 रुग्ण आढळून आले असून 622 जणांचा बळी गेला आहे.

13 Jul, 24:36 (IST)

महाराष्ट्रात  गेल्या 24 तासात कोरोनाच्या आणखी 7827 रुग्णांची भर पडली असून 173 जणांचा गेल्या 24 तासात बळी गेला आहे.

13 Jul, 24:13 (IST)

कुख्यात विकास दुबे याचा साथीदार अरविंद त्रिवेदीसह त्याच्या ड्रायव्हरला येत्या 21 जुलै पर्यंत ठाणे कोर्टाने  न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

13 Jul, 24:09 (IST)

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी उद्या सकाळी 10.30 वाजता काँग्रेस विधान पक्षाची बैठक पार पडणार आहे.

12 Jul, 23:56 (IST)

असमचे राज्य मंत्री चंदन ब्रम्हा यांनी चिरंग जिल्ह्यातील पुर आलेल्या परिसराला भेट दिली आहे.

12 Jul, 23:44 (IST)

तमिळनाडू येथे कोरोनाचे आणखी 4244 रुग्ण आढळले असून 68 जणांचा बळी गेला आहे.

12 Jul, 23:32 (IST)

दिल्लीत आज कोरोनाच्या आणखी 1573 रुग्णांची भर पडली असून 37 जणांचा बळी गेला आहे.

12 Jul, 23:28 (IST)

हिमाचल प्रदेशात कोरोनाबाधितांचा आकडा 1191 वर पोहचला आहे.

Read more


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर काल (11जुलै) त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असून त्यांना सौम्य लक्षणं आहेत. यामध्ये ताप आणि खोकला आहे. काल बच्चन कुटुंबामध्ये जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची देखील स्वॅब टेस्ट घेण्यात आली असून आज त्यांचा रिपोर्ट येईल. अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरवरून माहिती देताना मागिल 10 दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. तर अभिषेक बच्चन कडून देखील चाहत्यांना पॅनिक न होण्याचं आवाहन केलं आहे.

काल महाराष्ट्रात 24 तासांत सर्वाधिक 8139 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 4360 जणांची प्रकृती सुधारुन डिस्चार्ज देण्यात आला असून 223 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढून आता 2,46,600 वर पोहचला आहे. तर मुंबईमध्ये 1308 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच दिवसभरात 39 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1,497 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव वाढत आहे तेथे मात्र पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद यांचा समावेश आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now