Vande Bharat Mission अंतर्गत एअर इंडियाच्या विमानातून 170 जणांना अबू धाबी येथून हैदराबाद येणे आणले ; 11 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई,महाराष्ट्रासह देशा-परदेशातील ठळक घडामोडी, ताज्या बाताम्या, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी मराठी लेटेस्टलीला नक्की भेट द्या.

12 May, 05:12 (IST)

Vande Bharat Mission अंतर्गत एअर इंडियाच्या विमानातून 170 जणांना अबू धाबी येथून हैदराबाद आणण्यात आले आहे.

12 May, 04:58 (IST)

कर्नाटक राज्यात आलेल्या लोकांना Institutional Quarantine करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

12 May, 04:08 (IST)

Air India च्या 5 कर्मचाऱ्यांची यापूर्वी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्रा आता या सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

12 May, 03:59 (IST)

7 मे रोजी डोंगरी येथे अंत्यसंस्कारासाठी सुमारे 100-125 लोक जमले होते. आता या सर्वांवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 188, 269 आणि 270 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

12 May, 03:30 (IST)

भारतीय रेल्वेसाठी रात्री 9.15 वाजेपर्यंत 30 हजार PNR जनरेट तर 54 हजरांपेक्षा अधिक जणांकडून तिकिट बुकिंग करण्यात आले आहे.

12 May, 03:10 (IST)

तेलंगणा येथे आणखी 79 रुग्ण आढळून आल्याने आकडा 1275 वर पोहचला आहे.

12 May, 02:51 (IST)

महाराष्ट्रात आज नवे 1230 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 23,401 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

12 May, 02:29 (IST)

पश्चिम बंगालमध्ये आज 124 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये 2063 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

 

12 May, 02:06 (IST)

मुंबईमध्ये आज 791 नव्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14355 वर पोहोचली आहे. 

 

12 May, 01:45 (IST)

धारावीत आज 57 नव्या कोरोना रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून धारावीतील कोरोना बाधितांची संख्या 916 वर पोहोचली आहे.

 

12 May, 01:32 (IST)

पोलिसांवर दबाव वाढत असल्याने राज्याला केंद्रीय सैन्याचा पुरवठा करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

&

12 May, 01:02 (IST)

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 10 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. नामनिर्देशन दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 14 उमेदवारांकडून नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.


 

 

12 May, 24:36 (IST)

नाशिक: नांदगाव-चाळीसगाव रोडवरील चेकपोस्टवर बंदोबस्तास असलेल्या पोलीस पथकावर गाव गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांविरोधात रात्री उशिरा सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नांदगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

12 May, 24:05 (IST)

कोरोना व्हायरस खेड्यांमध्ये पसरू नये याची खात्री करणे हे आमच्यापुढे सर्वात मोठे आव्हान असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

 

11 May, 23:37 (IST)

भारतीय रेल्वेकडून 12 मे पासून सुरू होणार्‍या विशेष रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक जारी केलं आहे.

 

11 May, 23:09 (IST)

छत्तीसगडला जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या गटाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मास्क आणि जेवणाचे वाटप करण्यात आले.

 

11 May, 22:58 (IST)

अहमदाबादमधील प्रत्येक प्रसूती कर्मचार्‍यांना त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करणे अनिवार्य - राजीव कुमार गुप्ता

11 May, 22:29 (IST)

12 मे पासून सुरू होणार्‍या 15 स्पेशल ट्रेनचं बुकिंग सुरू होताच   irctc.co.in साईट क्रॅश झाल्याने आता 6 वाजल्यापासून पुन्हा बुकिंगला सुरूवात केली जाणार आहे.

11 May, 21:47 (IST)

लवकरच भारतामध्ये प्रवासी वाहतूक सुरू केली जाणार आहे. यामध्ये प्रवाशांना  आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करून वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच प्रवाशांना ब्लॅकेंट्स, चादरी दिल्या जाणार नाहीत.

11 May, 21:06 (IST)

आज सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामधील  Video Conference Meeting ला सुरूवात  झाली आहे.  कोरोना व्हायरस परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही 5 वी मिटिंग आहे.      

Read more


भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 24 मार्च पासून सुरू असलेला लॉकडाऊन पाहता आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्‍या राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा चर्चा होणार आहे. सुमारे 3 वाजता ही मिटिंग होणार असून देशात विविविध भागांमध्ये कोरोनाचा आढावा घेऊन पुढील प्लॅन बनवला जाणार आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा सध्या 62 हजारांच्या पार गेला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यसाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत.

एकीकडे कोरोनाचं संकट असताना महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधानपरिषद निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 12 वाजता विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आपला अर्ज दाखल करतील. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याने आता उद्धव ठाकरेंचा आमदार होण्याचा आणि मुख्यमंत्री पद अबाधित ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

देशामध्ये कोरोनाचं संकट असलं तरीही सामान्यांच्या सोयीसाठी आता रेल्वे मंत्रालयाकडून हळूहळू रेल्वेची प्रवासी सेवा केली जाणार आहे. आज दिल्लीहून भारताच्या विविध जाण्यासाठी 15 गाड्यांचं ऑनलाईन बुकिंग सुरू होणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now