राज्यभरात 'लॉकडाऊन' ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याबाबतचा निर्णय लोकहिताचा आहे. नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा आणि सहकार्य करावं. राज्यातल्या प्रत्येकानंच कोरोनावर मात करण्यासाठी कटिबद्ध होऊया! आपला व आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन वाढवला आहे, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना बाधीतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. मध्य प्रदेशात कोरोनाची लागण होऊन आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर एकूण 529 जण कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. ट्वीट-
कोरोना व्हायरसचे मुंबईत 61 टक्के रुग्ण तर ठाणे, पालघर, नवी मुंबई भागात 10 टक्के आणि पुण्यात 20 टक्के रुग्ण आढळून आले आहेत. त्याचसोबत राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 5.5 टक्के असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गोव्यात सुद्धा लॉगडाउन वाढवला जाणार पण आर्थिक व्यवहार सुरु राहणार आहे. तसेच येत्या सोमवार पासून खासगी आणि सरकारी रुग्णालयातील ओपीडी सुरु करण्यात येणार आहेत. मात्र आजपासून मासेमारी संबंधित कामे सुरु करण्यात आल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
मुंबईत कोरोनाचे आणखी 189 रुग्ण आढळून आले आहेत. तर 11 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1182 वर आणि एकूण मृतांची संख्या 75 वर पोहचल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
महाराष्ट्रात 14 एप्रिल नंतर लॉकडाउन कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर 30 एप्रिल पर्यंत लॉकडाउन राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, पुणे या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लक्ष ठेवण्याची अधिक गरज आहे. शेतीच्या कामांना लॉकडाउनच्या काळात परवानगी देण्यात आली आहे.
राज्याच हाय रिस्क असलेले रुग्ण दगावले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. येत्या सोमवारी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याचा पाचवा आठवा पूर्ण होणार आहे. मुंबईत सापडलेल्या कोरोनाबाधितांची लक्षणे सौम्य दिसून आली आहेत. मात्र आता घरोघरी जाऊन कोरोनासंबंधित चाचणी केली जात आहे.तर महाराष्ट्रात14 एप्रिल नंतर लॉकडाउन कायम ठेवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकड्यात वाढ झाली आहे. जवळजवळ 33 हजार जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर मुंबईतील 19 हजारांपैकी 1 हजार जणांची कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
कोरोना व्हायरस (Coranavirus) संकट नियंत्रणात आणण्यासाठी देशभरात निकराचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे जगाच्या तुलनेत कोरोना व्हायरस संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी भारताला काही अंशी यश आल्याचे चित्र आहे. मात्र, हे चित्र किती वास्तवातले किती फसवे हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. कारण, देशभरातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढते आहे. महाराष्ट्रात ही संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातही मुंबई आणि पुणे शहरात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संसर्ग झालेले रुग्ण आढळत आहेत याला महाराष्ट्र सरकार नागरिकांची कोरोना टेस्ट अधिक प्रमाणात करत असल्याचेही कारण दिले जात आहे. पण, हे कारण खरे असले तर मग देशभरातील इतर राज्यांमध्ये कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या कमी आहे. त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे आज संबंध दिवसभरात देशभरातील कोरोना व्हायरस संकट आणि स्थिती याबाबततची ताजी माहिती आणि तपशील याकडे विशेष लक्ष असणार आहे.
कोरोना व्हायरस संकट मोठे अव्हान बणून राहिल्यामुळे सहाजिकच देश आणि राज्यातील विविध गोष्टींकडे फारसे लक्ष दिले जात नाही असे दिसते. यात कोरोना व्हायरस संसर्ग नसलेल्या पण, इतर आजार असलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर होणारे उपचार. त्यांना येणाऱ्या अडचणी हा मुद्दा फारसा चर्चेत आला नाही. मात्र, वास्तवात सर्वसामान्य आजार असलेल्या आणि उपचार मिळत नसलेल्या नागरिकांचेही प्रमाण मोठे आहे.
राज्यातील राजकीय पक्षांचे नेमके काय चालले आहे. काही नेते कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांवर भाष्य करत आहे. याचे प्रमाण कमी असले तरी असे घडते आहे. दुसऱ्या बाजूला लॉकडाऊन काळात काही प्रशासकीय अधिकारी आपल्या अधिकारांचा वापर करत काही नागरिकांना सूट देत आहेत. त्यामुळे अशा काही आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम असलेल्या नागरिकांचा प्रवास खंडाळा ते लोनावळा असाही होतो आहे. अशा काही घटनांकडेही लक्ष असणार आहे.
दरम्यान, भारतासोबतच भारताचे शेजारी देश आणि जगभरात महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका. या देशाच्या खालोखाल जगभरात श्रीमंत आणि विकसित देश अशी ओळख असणारे इतर काही देश ज्यात इंग्लंड, जर्मनी, फ्रांन्स या देशांचा समावेश होतो. यांसह जगभरातील इतर देशांमध्ये कोरोना व्हायरस संकटाबाबत काय स्थिती आहे याकडेही लेटेस्टली मराठी लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे या विविध विषयांतील ताज्या बातम्या, घटना आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगशी जोडलेले राहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)