विदेशातून भारतात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना कोरोना व्हायरस निगेटीव्ह चाचणी प्रमाणपत्र आवश्यक; 10 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
भारत सरकारः इटली किंवा कोरिया देशात गेलेले आणि भारतात प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांना आजपासून या देशांच्या आरोग्य अधिका-यांनी अधिकृत केलेल्या नियुक्त प्रयोगशाळांमधून COVID-19 (कोरोना व्हायरस) बाबत नकारात्मक चाचणीचे प्रमाणपत्र आवश्यक असेल.
राज्यभरात होळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. आज सकाळपासून मध्यरात्रीपर्यंतही अनेक नागरिक होळी सणाचा आनंद लुटत आहेत. अनेक ठिकाणी पारंपरीक पद्धतीने होळीचा सण साजरा केला जात आहे.
Coronavirus: कोरोना व्हायरस विरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकार अग्रेसर आहे. कोरोना व्हायरस विरोधात लढा देण्यासाठी सरकारी रुग्णालयात विशेष योजना तर केलीच आहे. परंतू, गरज पडल्यास खासगी रुग्णालयातील 100 बेड ताब्यात घेण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
कोरोना व्हायरस महाराष्ट्रात दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना व्हायरस संसर्ग रोखणे आणि त्यासंबंधीच्या महत्त्वाच्या निर्णयांवर सहमती होण्याची शक्यता आहे. ही बैठक उद्या म्हणजे बुधवारी (11 मार्च 2020) बोलावण्यात आली आहे.
शिक्षणासाठी इटलीला गेलेला विद्यार्थी भारतात परतला आहे. हा विद्यार्थी अहमदनगर जिल्ह्यातील आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने जगभरातील अनेक देशांमध्ये गेलेेले विद्यार्थी मायदेशी परतत आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये घबराच आणि राज्य सरकारमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोना व्हायरसबाधीत रुग्णांची पुणे येथील संख्या 5 झाली असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, नाशिकमध्येही कोरोना व्हायरस बाधित एक संशयित रुग्ण सापडल्याची चर्चा आहे.
मध्य प्रदेश: आमच्याकडे बहुमत आहे, ते सभागृहात सिद्ध करु असा दावा कमलनाथ गटाकडून करण्यात येत आहे. कमलनाथ सरकारमध्ये असलेल्या काही आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अनेक मंत्र्यांचा राजीनामा घेतला आहे. त्यामुळे सध्या मध्य प्रदेशमध्ये चांगलाच राजकीय पेच निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल येथील तापी नदीच्या बॅकवॉटरमध्ये बोट उलटून 15 जण बुडाले आहेत. यात स्थानिक ग्रामस्थ व मासेमारी करणाऱ्या लोकांनी 6 जणांचे प्राण वाचवले आहेत. अद्याप 8 जण बेपत्ता आहेत.
नाशिक जिल्हा शासकिय रुग्णालयातील कोरोनाचे 2 संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. हे रुग्ण एकाच घरातील आहेत. या रुग्णांचे रिपोर्ट पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हे रुग्ण दुबईहून भारतात आले होते.
कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी मिथेनॉल प्राशन केलेल्या 27 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इराणमध्ये घडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या अनेक अफवा पसरत आहेत. या अफवांमुळे 27 जणांचा बळी गेला आहे.
केरळ मध्ये कोरोना व्हायरसची आणखीन सहा रुग्ण आढळून आल्यावर खबरदारी म्ह्णून सरकारतर्फे 31 मार्च पाऱ्यांत सर्व चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मल्याळम चित्रपट संस्थेने आज एका बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पैठण मधील एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोहळ्याला आठ ते दहा लाख भाविकांची उपस्थिती असते.
कोणी काही बोलत असेल तरी मध्य प्रदेश सरकार मजबूत आहे आणि कोसळण्याची अजिबात शक्यता नाही अशी प्रतिक्रिया कमलनाथ यांच्या सरकार मधील मंत्रिमंडळातील नेते कांतीलाल भुरिया यांनी दिली आहे. कमलनाथ यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर कांतीलाल यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवला आहे. आजच सिंधिया भाजपात प्रवेश घेणार असल्याची सुद्धा चिन्हे आहेत.
मध्ये प्रदेश कमलनाथ सरकार मधील बंडखोर काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधीया यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे, सिंधिया आता काँग्रेसची साथ सोडून भाजपत दाखल होण्याच्या चर्चा या भेटीनंतर आणखीनच वेगाने पसरत आहेत.
मध्यप्रदेश मध्ये रंगलेल्या राजकीय सत्ता नाट्यात आता एक सूचक भेट घडली आहे, काही वेळापूर्वी मह्द्य प्रदेश सरकारमधील बंडखोर नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही वेळापूर्वी गहृमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. सिंधिया आता काँग्रेसची साथ सोडून भाजपत दाखल होण्याच्या चर्चा या भेटीनंतर आणखीनच वेगाने पसरत आहेत.
ज्योतिरादित्य सिंधिया आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यातील मतभेदांमुळे मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार फुटून ऑपरेशन लोटस फुलणार अशी चर्चा सुरु आहे, मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारमधील 20 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मात्र मध्य प्रदेश सरकार पाडण्यात काहीही रस नाही अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
आज, 10 मार्च रोजी देशभरात धुलिवंदनाचा उत्साह साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणीही मोठमोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरी घरगुती, गल्ली- बोळातील धुळवड मात्र चांगलीच जोरदार सुरु झाली आहे. होळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक दिगंगाज मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दुसरीकडे राज्यात कोरोनाचे पहिले दोन रुग्ण आढळल्याने चिंतेचं वातावरण आहे. पुणे येथील एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत अनेक व्यवसायाचे दिवाळं निघालं आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे साडे सहा लाख कोटी बुडाले आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, कालपासून मध्यप्रदेश मधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं दिसून येत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळातील नेते ज्योतिरादित्य सिंधीया यांनी बंडाचे निशाण फडकावल्याने काळ रात्रीचच कमलनाथ यांनी आपल्या 20 मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले. ज्योतिरादित्य हे भाजपच्या संपर्कात असून ज्योतिरादित्य यांच्या गटाच्या 17 आमदारांना तूर्तास बंगळुरू मध्ये भाजप ह्या नेत्यांकडून नेण्यात आल्याचे सांगण्यात येतेय. यामुळे मध्यप्रदेश मध्ये ऑपरेशन लोटस पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येतेय.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)