435 नवे रुग्ण व 7 मृत्युंसह पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणू संक्रमितांची संख्या 10,394 झाली; 10 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील कोरोना संबधित महत्त्वाच्या घडामोडी, वअन्य ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. मुबईत आज 1 हजार 567 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 97 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या 1 हजार 855 वर पोहचली आहे. पीटीआयचे ट्वीट-
पिंपरी-चिंचवडच्या सांगवीमध्ये मुलाचा मारहाणीत मृत्यू झाला होता, या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी केली अटक केली असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पुढील महिन्यापर्यंत टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या निर्णयाला स्थगिती दिली. बुधवारी झालेल्या आयसीसीच्या बैठकीत कोरोना व्हायरस परिस्थितीचे सातत्याने आकलन केले जाईल, असा निर्णय घेण्यात आला.
फक्त चमोली जिल्ह्यातील मना आणि बामनी गावातील भक्तांनाच, 30 जूनपर्यंत सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत बद्रीनाथ मंदिरात प्रवेश घेण्याची मुभा दिली जाईल. उर्वरीत उत्तराखंड व इतर राज्यातील भाविकांना 30 जूनपर्यंत मंदिरात येण्याची परवानगी नसल्याची माहिती, डीएम चमोली स्वाती भदौरिया यांनी दिली.
मागील 24 तासांत महाराष्ट्रात 3254 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 94,041 वर पोहचली आहे. 1879 रुग्णांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 94,041 पैकी 44,517 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 3438 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
कोविड-19 च्या काळात होणाऱ्या गैरसोयींबद्दल NHRC कडून दिल्ली सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यात बेड्ची उपलब्धता नसणे, कोविड-19 च्या चाचण्यांची कमतरता इत्यादी मुद्दे मांडण्यात आले आहेत.
मुंबईतील धारावी मध्ये कोरोना बाधित 11 नवे रुग्ण आढळल्याने धारावतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1964 वर पोहचला आहे. दरम्यान एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याची माहिती BMC च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तामिळनाडू: 1,927 नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 36,841 पोहचला आहे. त्यापैकी 17179 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 19333 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान 326 रुग्णांचा कोविड-19 च्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
कर्नाटकमध्ये कोरोना व्हायरसचे 120 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण 6041 कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 3108 रुग्णांवर उपचार सुरु असून 2862 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढावलेल्या नाभिक आणि धोबी समाजासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांच्या वाहतुकीसाठी मुंबईतील उपनगरी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
येत्या 24 तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
महाराष्ट्रात आज इयत्ता बारावीचे निकाल (Maharashtra HSC Results) लागणार नाहीत याबाबत शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून 10 जून रोजी बारावीचे निकाल लागणार याबाबत चर्चा होत्या, मात्र अजूनही हा निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांंनी अफवांवर विश्वास ठेवू नये असेही शिक्षण मंडळाने सांगितले आहे. निकालाची तारीख कधी जाहीर होईल याबाबत अपडेट जाणुन घेण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत साईटला भेट द्या.
दुसरीकडे कोरोनामुळे देशात पुन्हा एकदा मोठी रुग्ण वाढ दिसून आली आहे. आजच्या ताज्या अपडेट नुसार देशात मागील 24 तासात 9985 इतक्या कोरोना रुग्णांची आणि 279 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही 2,76, 583वर पोहचली आहे. यापैकी 1,33,632 इतके ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत 7745 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे . तर 1,35,206 इतक्या जणांनी कोरोनावर मात करून आपल्या घराची वाट धरली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात आता कोरोना रुग्णांच्या संख्येने चीन ला सुद्धा मागे टाकले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे तब्बल रुग्ण 90,787 आढळून आले आहेत, यापैकी 42,638 रुग्ण बरे झाले आहेत तर 3289 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)