मुंबई: चेंबूर भागात आज 11 कावळे सापडले मृत अवस्थेत ; 10 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत
मुंबईच्या चेंबूर भागात आज 11 कावळे मृत अवस्थेत सापडेल. यातील दोन नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले असून अजून अहवाल प्रतिक्षेत आहे अशी माहिती महाराष्ट्र आरसीएफ पोलिसांनी दिली.
पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याच्या स्पोर्ट कारचा अपघात झाला आहे. लाहोर मध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला शोएबच्या कारने धडक दिली. मात्र, या अपघातात शोएब मलिक सुरक्षित आहे. या अपघातात शोएबच्या कारचे नुकसान झालं आहे.
नेपाळ चे परराष्ट्रमंत्री प्रदिप ग्यावाली 14 जानेवारीला भारत दौ-यावर येणार आहेत. त्यांनी प्रकाशित केलेल्या नवीन नकाशासह ते तिथल्या अधिका-यांशी चर्चा करणार आहेत.
सोलापूर येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या मंदिर परिसरातील काही भागात 12 ते 16 जानेवारी दरम्यान संचारबंदी राहणार आहे.
नागपूर मध्ये खापरखेडा येथे लैंगिक संबंधादरम्यान वापरण्यात आलेल्या दोरीने गळफास लागून तरुणीचा मृत्यू झाला. या मृत मुलीच्या प्रियकराला पोलिसांनी अटक करुन त्याला 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मी प्रदेशाध्यक्ष असताना कधीही सुरक्षेची मागणी केली नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यावर आणि याकूब मेमनच्या फाशीची शिक्षा आणि इतर घटनांनंतर मला जेव्हा धमक्या मिळाल्या तेव्हा मला ते प्रथमच मिळाले असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात 3558 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 19,69,114 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 34 लोकांचा मृत्यू झाला असून कोरोना बाधित मृतांची आज एकूण संख्या 50,061 वर पोहोचली आहे.
भंडाऱ्यातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची बांधकाम तसेच अग्निशमन विभागाकडून तपासणी करण्यात येऊन फायर ऑडिट करण्यात यावे तसेच सर्व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्याना केल्या आहेत.
जम्मू-काश्मीर येथील दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून लष्कर-एक तोयबाच्या एके 47 च्या 26 गोळ्या जप्त केल्या असून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने बीएमसीच्या (BMC) नोटीशी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उपनगरी जुहू येथील निवासी इमारतीत परवानगी न घेता बेकायदा स्ट्रक्चरल बदल केल्याच्या आरोपाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोनू सूदला नोटीस बजावली होती. सहा मजली शक्तीसागर इमारतीत आपण कोणतेही 'बेकायदेशीर किंवा अनधिकृत बांधकाम' केले नाही असे सोनू सूदने सांगितले आहे.
आजच्या 399 नवीन कोरोना व्हायरस रुग्ण संख्येसह दिल्लीतील एकूण रुग्णसंख्या 6,30,200 वर पोहोचली आहे. आज 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 10,678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जम्मू-काश्मीर: पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये आज दुपारी तीनच्या सुमारास युद्धबंदीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्य त्याला प्रत्युत्तर देत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा दौऱ्यावर आहेत. भंडारा जिल्हा रुग्णालात लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी भंडारा येथे जाऊन पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जिल्हा रुग्णालयाची पाहणी करुन आढावाही घेतला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले 'पीडितां कुटुंबीयांना भेटल्यावर मी केवळ हात जोडून उभा राहिलो. दुसरे मी काहीच करु शकलो नाही. त्यांचे सांत्वन करता येतील असे शब्दच माझ्याकडे नव्हते.
CM Uddhav Thackeray Visit Bhandara | (Photo Credits: CMO)
भंडारा येथे घडलेल्या घटनेबाबत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले, 'मागील वर्षी कोरोना विषाणूमुळे आमच्या आरोग्य पायाभूत सुविधा बर्याच तणावाखाली होत्या. त्यात काही निष्काळजीपणा होता की नाही याची सखोल चौकशी केली जाईल. विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात ही चौकशी होईल. मी सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.'
DRDO ने पूर्व लडाख, सियाचीन आणि उच्च उंचीच्या भागात तैनात भारतीय सैन्यासाठी 'हिम तपक' हे नवीन स्पेस हीटिंग साधन विकसित केले आहे. हे साधन सुनिश्चित करेल की बॅकब्लास्ट आणि कार्बन मोनोऑक्साइड विषबाधामुळे जवानांचा मृत्यू होणार नाही. ही माहिती Defence Institute of Physiology & Allied Sciences च्या संचालकांनी दिली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसर्या क्रिकेट कसोटीच्या चौथ्या दिवशी रविवारी सिडनी क्रिकेट मैदानावर प्रेक्षकांकडून वर्णद्वेषाबाबत टिप्पणी केल्याची तक्रार भारतीय संघाने केली होती. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याप्रकरणी माफी मागितली आहे आणि त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच एससीजी येथे आज झालेल्या घटनेनंतर एनएसडब्ल्यू पोलिसांसोबत या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाकरे सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सुरक्षा हटवली आहे. तर विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांची विशेष सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणी भंडारा जिल्हा रुग्णालयाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज करणार पाहणी करणार आहेत.
भारतामध्ये 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु होत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लास देण्यात येणार आहे. सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचारी यांना लस दिली जाईल. त्यानंतर 50 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, तसेच बहुव्याधी असलेल्या 50 वर्षांखालील व्यक्ती यांना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल.
कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, कॉंग्रेसने जाहीर केले आहे की 15 जानेवारी रोजी देशभरात 'शेतकरी हक्क दिन' (Kisan Adhikar Divas) साजरा केला जाईल आणि या दिवशी राजभवनाला घेराव घातला जाईल. कॉंग्रेसने असा आरोप केला की, भारतातील हे असे पहिले सरकार आहे, जे शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सांगत आहेत.
दरम्यान, राजकारण, अर्थकारण, सामाजकारण, संस्कृती, कृषी आरोग्य, संशोधन, उद्योग यांसह जगभरातील घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग पाहात राहा. लेटेस्टली सोबत जोडलेले राहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)