Social Media: कट्टरपंथीकरण आणि तरुणांच्या भरतीत सोशल मीडियाचे योगदान- टीएस तिरुमूर्ती; 10 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स साठी लेटेस्टली मराठी सह जोडलेले रहा....

11 Feb, 05:19 (IST)

कट्टरपंथीकरण आणि तरुणांच्या भरतीत सोशल मीडियाचे योगदान असल्याचे टीएस तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. ते यूएनएससीमध्ये संयुक्त राष्ट्र संघाचे स्थायी प्रतिनिधी आहेत. 'दहशतवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांना दिलेली धमकी' या विषयावर ते बोलत होते.

11 Feb, 04:59 (IST)

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडियाला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. भारताचा अष्ठपैलू फिरकी खेळाडू रविंद्र जडेजा या मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. रविंद्र जडेजा हा या मालिकेत खेळण्यासाठी पूर्ण तंदुरुस्त नाही. त्यामुळे त्याच्या संघातील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. प्रसारमध्यांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की फिटनेस (तंदुरुस्त) नसल्याने टीम इंडियाला ही मालिका रविंद्र जडेजा याच्याशिवाय खेळावी लागणार आहे.

11 Feb, 04:45 (IST)

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या सचिव यांनी ट्विटर अधिकाऱ्यांशी आभासी संवाद साधला. सचिवांनी ‘शेतकरी नरसंहार’ यावर हॅशटॅग वापरण्याचा मुद्दा उपस्थित केला आणि हे हॅशटॅग काढण्यासाठी आपत्कालीन आदेश दिल्यानंतर ट्विटरने ज्या पद्धतीने कारवाई केली त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

11 Feb, 03:58 (IST)

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात तेरा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यापैकी तिघांवर रोख रकमेचे बक्षीस होते. पोलिसांनी ही माहिती दिली.

11 Feb, 03:44 (IST)

जनता दल सेक्युलरचे नेते एचडी देवेगौडा यांनी बुधवारी जाहीर केले की त्यांचा पक्ष कर्नाटकमध्ये बेळगाव लोकसभा, बसवकल्याण, सिंगली आणि मास्की विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार उतरवणार नाही. निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक निधीन सल्याचे कारण त्यांनी दिले आहे. परंतू, कालच त्यांच्या पक्षातील काही आमदारांनी विधानसभा अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी भाजपसोबत युती केली होती.

11 Feb, 03:28 (IST)

Loyalty Islands येथे 7.5 रिस्टर स्केलचा भूकंप झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामानशास्त्र विभाग ही माहिती दिली आहे.

11 Feb, 02:42 (IST)

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच इंग्रजी वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने एक खळबळजनक वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, भीमा कोरेगाव प्रकरणात अटक झालेल्या सामाजिक कार्यकर्ते, बुद्धीजिवी याच्या विरोधात वापरण्यात येणारे पुरावे हे मालवेयरच्या सहाय्याने लॅपटॉपमध्ये प्लांट करण्यात आले होते. पुढे हा लॅपटॉप पोलिसांनी जप्त केल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

11 Feb, 02:33 (IST)

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आठ महिन्यांच्या चिमुरडीला पाच हजार रुपयात विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

11 Feb, 02:14 (IST)

महाराष्ट्रः नेपाळहून बनावट आधार कार्ड्ससह बेकायदेशीर स्थलांतरितांचा पुरवठा करणाऱ्या जोडीला आज अटक करण्यात आली आहे. याबाबत डीसीपी मुंबई, अकबर पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत त्यांना सूत्रांकडून माहिती मिळाली होती. यामध्ये 10 नेपाळी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. ते 'युआयडीएआय'शी संपर्कात आहेत.

11 Feb, 01:40 (IST)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 3,451 रुग्णांची आणि 30 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 2,421 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील एकूण प्रकरणांची संख्या 20,52,253 झाली आहे. आतापर्यंत 19,63,946 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सक्रिय प्रकरणे 35,633 इतकी असून, मृत्यूची संख्या 51,390 झाली आहे.

11 Feb, 01:15 (IST)

आंदोलनामधील शेतकऱ्यांकडून 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत देशभरात रेल रोको कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. डॉ. दर्शन पाल, संयुक्त किसान मोर्चा यांनी ही माहिती दिली.

11 Feb, 24:49 (IST)

आकडेवारीनुसार, गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडा मधील सरासरी हवा गुणवत्ता 'अत्यंत खराब' प्रकारात नोंदवली गेली आहे, तर गुडगाव आणि फरीदाबादमध्ये ती 'खराब' आहे.

11 Feb, 24:48 (IST)

उत्तर प्रदेशच्या मथुरा येथे ट्रॅक्टर ट्रॉलीने कारला धडक दिल्याने तीन जण ठार तर 14 लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली.

10 Feb, 23:42 (IST)

26 जानेवारी दिल्ली हिंसाचार प्रकरणातील आरोपी इक्बाल सिंहला स्पेशल सेलने पंजाबच्या होशियारपूर येथून काल रात्री अटक केली. त्याच्या माहितीसाठी 50,000 रुपयांचा बक्षीस ठेवले होते. इक्बाल सिंहला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

10 Feb, 23:38 (IST)

हिमाचल प्रदेशः गॅस गळती झाल्यामुळे शिमला येथील डोंगरालगत काही घरांना आग लागली.

10 Feb, 22:38 (IST)

दिल्लीत आज 127 नवे कोरोना बाधित आढळून आले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 131 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

10 Feb, 22:19 (IST)

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या संपत्तीवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. 

10 Feb, 21:49 (IST)

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देताना; पहा लाईव्ह

10 Feb, 21:37 (IST)

भाजपच्या खासदार हेमा मालिनी संसदेत दाखल झाल्या आहेत. ट्विट-

 

10 Feb, 21:15 (IST)

उत्तराखंडच्या चमोली भागात आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्विट-

 

Read more


POCSO A अंतर्गत 'लैंगिक अत्याचारा'च्या गुन्ह्यासाठी skin-to-skin संपर्क साधणे आवश्यक असलेच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट आज सुनावणी घेणार आहे.

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील अडीच किमी लांबीच्या तपोवन बोगद्यावरील बचावकार्य मंगळवारी रात्री सुरूच होते. बोगद्यात सुमारे 30 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हिमखडा कोसळल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पूर आला. या दुर्घटनेत अनेकजण बेपत्ता झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

देशात कोविड-19 लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मार्च महिन्यापासून सुरु होणार आहे. दरम्यान, भारतीय बनावटीच्या लसी अनेक देशात पाठवल्या जात आहेत. बार्बाडोसला देखील मेड इन इंडिया लस प्राप्त झाल्याचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्विटद्वारे सांगितले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now