राजस्थान: BITS चे उपनिबंधक पिलानी यांची आत्महत्या; 10 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

एका बाजूला देश कोरोनाविरुद्ध लढत असताना देशभरातील शेतकरी नवा शेतकरी कायदा आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात लढत आहे. केंद्र सरकारने पारीत केलेले जुलमी असलेले कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी आंदोलन सुरु आहे. शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र त्या सर्व चर्चा अयशस्वी ठरल्या आहेत.

11 Dec, 05:27 (IST)

BITS चे उपनिबंधक पिलानी यांनी राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील निवासी क्वार्टरमध्ये आत्महत्या केली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

11 Dec, 04:47 (IST)

2 डिसेंबरपासून 541 खेळाडूंपैकी 8 नवीन खेळाडूंची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. यापूर्वी नोव्हेंबर 24-डिसेंबर 1 पासून initial return-to-market testing phase मध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये 48 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती.- NBA

11 Dec, 04:20 (IST)

आज पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो.  सामान्य माणसासाठी राज्य सुरक्षित नाही, हे यावरुन स्पष्ट होते घटना कायदा व सुव्यवस्थेची कमतरता दर्शवते. टीएमसीच्या गुंडांनी केलेल्या भ्याड कृत्य स्वीकार्य नाहीः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

11 Dec, 03:26 (IST)

राजस्थानः गेल्या 24 तासात कोटाच्या जेके लोन रुग्णालयात 9 नवजात मुलांचा मृत्यू झाला आहे. याबाबत चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तपास समिती नेमली आहे. जे. के. लोन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक एस. सी दुलारा यांनी सांगितले की, नवजात 9 मुलांपैकी 3 जणांना मृत आणले गेले, 3 जणांना जन्मजात आजार होते आणि 2 जणांना इथला रेफरन्स देण्यात आला होता.

11 Dec, 03:04 (IST)

अबू धाबी स्थित लुलू ग्रुप इंटरनेशनल जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये फूड प्रोसेसिंग सेंटर सुरू करणार आहे. भारतीय वाणिज्य दूतावास, दुबई यांनी याबाबत माहिती दिली.

11 Dec, 02:13 (IST)

जर सरकार 15 पैकी 12 आमच्या मागण्या मान्य करत असतील तर बिल योग्य नसणार असे  भारतीय किसान युनियन यांनी म्हटले आहे.

11 Dec, 02:11 (IST)

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 1270 रुग्ण आढळल्याने आकडा 224081 वर पोहचला आहे.

11 Dec, 24:54 (IST)

दिल्लीत कोरोनाचे आणखी 1575 रुग्ण आढळले असून 61 जणांचा बळी गेला आहे.

11 Dec, 24:40 (IST)

धुळे जिल्ह्यात काही भागत मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह गारा कोसळण्याची शक्यता आहे.

11 Dec, 24:26 (IST)

केरळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 6.30 पर्यंत 76 टक्के मतदान झाले आहे.

11 Dec, 24:14 (IST)

राजस्थान येथे आज कोरोनाचे आणखी 1592 रुग्ण आढळले असून 15 जणांचा बळी गेला आहे.

11 Dec, 24:09 (IST)

केरळ येथे कोरोनाचे आणखी 4470 रुग्ण आढळले  आहेत.

10 Dec, 23:58 (IST)

काँग्रेस नेते  राम लाल राही यांचे सितापूर येथे निधन झाले आहे.

10 Dec, 23:40 (IST)

कृषी कायदा हा ट्रेडर्ससाठी बनवल्याचे  केंद्र सरकारने  मान्य केल्याचे  शेतकरी नेते बलबीर सिंह यांनी म्हटले आहे.

10 Dec, 23:08 (IST)

Farmers Protest: आम्ही सरकारला 10 डिसेंबर पर्यंत अल्टीमेटम दिला असून जर पंतप्रधानांनी ऐकले नाही तर आम्ही पु्न्हा रेल्वे रुळांवर उतरू असा इशारा शेकरी नेते भुटा सिंह यांनी दिला आहे.

10 Dec, 22:56 (IST)

Shakti law अंतर्गत आरोपीला 2 वर्षांची शिक्षा होणार असे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री  अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

10 Dec, 22:42 (IST)

Farm Laws: जर शेतकऱ्यांना आमच्या प्रस्तावर चर्चा करायची असल्यास ते नक्कीच आमच्याकडे येतील कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर  यांनी म्हटले आहे.

10 Dec, 22:35 (IST)

मुंबई लोकल सेवा कधी सुरु होणार याकडे मुंबईकर डोळे लाऊन बसला आहे. मात्र, मुंबई लोकल सुरु होण्याचा योग यंदा तरी नाही. मुंबई महापलिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई लोकल आता पुढच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये सुरु होणार असल्याचे चहल यांनी म्हटले आहे. मुंबई लोकल नाताळ नंतरच सुरु होईल, असे चहल यांनी म्हटले आहे.

10 Dec, 22:21 (IST)

एल्गार परिषद-माओवाद संबंध प्रकरणात आरोपी असलेले गौतम नवलखा यांना तळोजा कारागृह अधिकाऱ्यांनी चष्मा नाकारल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

10 Dec, 21:47 (IST)

केंद्रीय कृषीमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहा लाईव्ह

Read more


देशभरातील कोरोना व्हायरस संसर्गाचा कहर काहीसा कमी होताना दिसतो आहे. अशात अद्याप अस्तित्वात आली नसली तरी कोरोनावरील लस लवकरच अस्तित्वात येईल या आशेवर भारत आणि अवघे जग मार्गक्रमण करत आहेत. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन हटवून अपवाद वगळता परिस्थीती आता पूर्णपणे मूळ पदावर आणण्याचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकारकडून केला जात आहे.

कोरोना व्हायरस लस निर्मिती अंतिम टप्प्यात असल्याचे दावे विविध कंपन्यांकडून करण्यात येत आहेत. या कंपन्यांमध्ये एक प्रकारची स्पर्धाही पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुरेसा तपशील नसल्याने सीमर, भारत बायोटेक यांच्या लसीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेतील तज्ज्ञांच्या समितीने तातडीची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे येणार येणार अशी चर्चा रंगलेली कोरोना व्हायरस लस ही अद्यापही काही काळ लांबणीवर पडली आहे. दरम्यान, लस आली तरीही येणारा काळ हा काळजीचा असल्याचा इशारा तज्ज्ञ इशारा देत आहेत.

एका बाजूला देश कोरोनाविरुद्ध लढत असताना देशभरातील शेतकरी नवा शेतकरी कायदा आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात लढत आहे. केंद्र सरकारने पारीत केलेले जुलमी असलेले कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी आंदोलन सुरु आहे. शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र त्या सर्व चर्चा अयशस्वी ठरल्या आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही आंदोलकांच्या शिष्ठमंडळाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तरीही ही चर्चा अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे हे आंदोलन आता कोणते स्वरुप धारण करते याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now