शिरोमणी दलाचे नेते हरसिमरत कौर बादल यांच्यासह पक्षातील काही नेत्यांना पोलिसांकडून अटक, मोहालीतील जिरापूर येथे फार्म बिलाच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीत घडला प्रकार; 1 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

02 Oct, 05:16 (IST)

शिरोमणी दलाचे नेते हरसिमरत कौर बादल यांच्यासह पक्षातील काही नेत्यांना पोलिसांकडून अटक  करण्यात आली आहे. तर  मोहालीत जिराकपूर येथे फार्म बिलाच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीत हा प्रकार घडला आहे. 

02 Oct, 05:00 (IST)

IPL 2020: मुंबई इंडियन्स संघाचा किंग्स ईलेव्हन पंजाबच्या विरोधातील आयपीएलच्या सामन्यात 48 धावांनी विजय झाला आहे.

02 Oct, 04:40 (IST)

झारखंड सरकारकडून दुर्गा पूजा आणि दसरासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

02 Oct, 04:35 (IST)

आसाम येथे कोरोनाचे आणखी 1585 रुग्ण आढळले आहेत.

02 Oct, 04:15 (IST)

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह जवळजवळ 200 जणांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.

02 Oct, 03:59 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑक्टोंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  Vaishvik Bhartiya Vaigyanik  समिटचे उद्घाटन करणार आहेत.

02 Oct, 03:46 (IST)

पश्चिम बंगाल येथे कोरोनाचे आणखी 3275 रुग्ण आढळून आले असून 59 जणांचा बळी गेला आहे.

02 Oct, 03:34 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 5 ऑक्टोंबरला ‘Responsible AI for Social Empowerment 2020’ चे उद्घाटन करणार आहेत.

02 Oct, 03:14 (IST)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगाल येथे दुर्गा पूजा पूर्वी दौरा करणार आहेत.

02 Oct, 02:52 (IST)

यूपीएससी नागरी सेवा परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वे दोन जोड्या परीक्षा विशेष गाड्या चालवणार आहे. सीपीआरओ, पश्चिम रेल्वे यांनी याबाबत माहिती दिली.

02 Oct, 02:35 (IST)

स्टेट बँक ऑफ इंडियाची 166 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, CBI ने हैदराबादच्या Chadalavada Infratech Ltd आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

02 Oct, 02:18 (IST)

मुंबईत कोरोनाचे आणखी 2352 रुग्ण आढळले असून 43 जणांचा बळी गेला आहे.

02 Oct, 02:16 (IST)

दिल्लीतील नेहरु प्लेस  येथे इमारतीला भीषण आग लागली असून घटनास्थळी 5 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

02 Oct, 02:08 (IST)

कर्नाटक येथे कोरोनाचे आणखी 10,070 रुग्ण आढळले तर 130 जणांचा बळी गेला आहे.

02 Oct, 01:39 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 16,746 रुग्ण आढळले असून 394 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 14,00,922 वर पोहचला आहे.

02 Oct, 01:32 (IST)

हाथरस मधील सामूहिक बलात्कार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत व्यक्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

02 Oct, 01:25 (IST)

जल जीवन योजनेअंतर्गत 2 ऑक्टोंबरला असणाऱ्या गांधी जयंती निमित्त 100 Days Campaign लॉन्च करण्यात येणार आहे.

02 Oct, 01:18 (IST)

सोशल मीडियातील मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Twitter डाउन झाल्यानंतर आता पुन्हा सुरु झाले आहे. 

02 Oct, 01:06 (IST)

सोशल मीडियातील मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Twitter Down झाले आहे. 

02 Oct, 24:53 (IST)

Hathras Gang Rape प्रकरणी मीडियाला घटनास्थळी परवानगी नाही असे जिल्हा दंडाधिकारी पीके लक्षकर यांनी स्पष्ट केले आहे.

Read more


देशात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत देशात 62 लाखाहून अधिक जणांना या विषाणूने आपल्या विळख्यात ओढलं आहे. याशिवाय हजारो जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाचं सर्वांच लक्ष कोरोना लसीकडे लागलं आहे. कोरोना लशीसंदर्भातील सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासंबंधी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एका पोर्टलची सुरूवात केली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सर्व सामान्यांना कोरोना लशीसंबंधी भारतात तसेच जगभरात सुरू असणारे संशोधन, ट्रायलचे टप्पे यासंबंधीची माहिती मिळणार आहे.

दरम्यान, बाबरी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आजच्या सामना संपादकीय लेखात भाष्य करण्यात आलं आहे. बाबरी प्रकरणात सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचं फार खळखळ न करता किंवा माथी भडकवण्याचे उद्योग न करता सर्वांनीच स्वागत करायला हवे, असं मत सामनातून शिवसेनेने मांडलं आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

याशिवाय उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरूणीच्या बलात्काराची घटना ताजी असताना आता राज्यात आणखी एक बलात्कार प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement