नागपूर मध्यवर्ती कारागृहात 44 जणांना कोविड-19 ची लागण झाली आहे. यातील बहुतेकजण हे पोलिस कर्मचारी आहेत. अशाप्रकारे तुरूंगातील एकूण संक्रमितांची संख्या 53 झाली आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1251 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि 25 मृत्यूची नोंद झाली आहे; जिल्ह्यातील एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या 23,680 झाली आहे. पुणे आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आढळून आले आहेत. मुंबईत आज 1 हजार 511 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 75 जणांचा मृत्यू झाला आहे. पीटीआयचे ट्विट-
सीआरपीएफच्या आणखी 134 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत सीआरपीएफच्या एकूण 1 हजार 385 जवान कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. यापैकी एकूण 9 जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, 694 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एएनआयचे ट्विट-
राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आज शासन निर्णय जाहीर केला आहे. एनएनआयचे ट्विट-
शशांक मनोहर यांनी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात आयसीसी बोर्डाकडून अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया मंजूर होण्याची अपेक्षा आहे. एएनआयचे ट्वीट-
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लडाखला भेट देण्याची शक्यता आहे. चिनी सैन्यासह चीनमधील सीमाभागातील कडक कारवाई लक्षात घेता भारताच्या सैन्याच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल, अशी महिती पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. पीटीआयचे ट्विट-
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून आनंदीबेन पटेल यांनी घेतली शपथ घेतली आहे. लालजी टंडन यांची प्रकृती ढासळली असून लखनऊ येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. एएनआयचे ट्वीट-
उत्तराखंड उच्च न्यायालयाने योगगुरु रामदेव, दिव्य फार्मसी, एनआयएमएस विद्यापीठ, केंद्र आणि राज्य सरकार यांना आयुर्वेदिक औषध कोरोनिवर बंदी घालण्याच्या याचिकेवर नोटीस बजावली आहे.
हरियाणा: फरीदाबाद येथील शॉपिंग मॉल्स सुरु करण्यात आले असून एका स्टोअर मॅनेजरने सांगितले की, कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दुकानांमध्ये थर्मल स्क्रिनिंगसह सॅनिटायझरचा वापरही केला जात आहे.
आज आषाढी एकादशी. महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी अत्यंत मंगलमय दिवस. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंढरीच्या वारीला साधे स्वरुप आले असले तरी विठुरायाप्रती भक्ती अबाधित आहे. आषाढी एकादशी निमित्त आज पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्निक शासकीय महापुजा केली. यावेळेस पंढरपुरच्या विठू माऊली आणि रखुमाईच्या मंदिरातील वीणेकरी विठ्ठल बडे, अनुसया बढे हे मानाचे मानकरी ठरले.
दरम्यान भारतासह राज्यात कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या 566840 वर पोहचली असून 215125 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 334822 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान 16893 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचे संकट अद्याप दाट असून मुंबई, ठाणे, पुणे या शहरांना कोविड-19 चा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उद्यापासून पुन्हा एकदा ठाण्यासह कल्याण डोंबिवलीत 10 दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. या काळात अत्यावश्यक आणि जिवनावश्यक सेवा वगळता सारं काही बंद राहणार आहे.