Maharashtra Weather Update: येत्या 8 जानेवारीपर्यंत पुणे, नाशिक मधील किमान तापमान 15 अंश सेल्सियसपर्यंत घसरण्याची शक्यता- IMD ; 1 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

राजकारण, अर्थकारण, सामाजकारण, संस्कृती, कृषी आरोग्य, संशोधन, उद्योग यांसह जगभरातील घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग पाहात राहा. लेटेस्टली सोबत जोडलेले राहा.

02 Jan, 04:46 (IST)

मुंबई हवामाना विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या मुंबईतील किमान तापमान 20-22 अंश सेल्सियस असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर पुणे नाशिकमधील तापमान 8 जानेवारीपर्यंत 15 अंश सेल्सियस पर्यंत घसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

02 Jan, 04:14 (IST)

हरियाणा येथे आज आणखी 286 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-

 

02 Jan, 03:51 (IST)

कानपूर येथील प्राणीशास्त्र उद्यानात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. पाहा फोटोज

02 Jan, 03:02 (IST)

हिमाचल प्रदेश मध्ये मागील 24 तासांत 193 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 55,470 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 924 वर पोहोचली आहे.

02 Jan, 02:31 (IST)

मुंबई: खार येथे नवीन वर्षाच्या पार्टीत 19 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

02 Jan, 01:56 (IST)

मुंबईत कोरोनाचे आणखी 631 रुग्ण आढळले असून 9 जणांचा बळी गेला आहे.

02 Jan, 01:38 (IST)

केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांच्या ताफ्यातील कारला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

02 Jan, 01:17 (IST)

भारत आणि युके दरम्यान विमान सेवा येत्या 8 जानेवारी पासून पुन्हा सुरु होणार आहे.

02 Jan, 01:16 (IST)

केरळात उद्या COVID19 साठी राज्यातील चार जिल्ह्यात ड्राय रन चाचणी पार पडणार आहे.

02 Jan, 01:02 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 3544 रुग्ण आढळले असून 59 जणांचा बळी गेला आहे.

02 Jan, 24:49 (IST)

पेंच नॅशनल पार्क मध्ये वाघिणीसह दोन बछड्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

02 Jan, 24:45 (IST)

अहमदनगर येथे कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 96.61 टक्क्यांवर पोहचला आहे.

02 Jan, 24:22 (IST)

शेतकऱ्यांना कृषी बिलाच्या मुद्द्यावरुन हलक्यात घेतले जातेय असे शेतकऱ्यांच्या संघटनेचे नेते युधवीर सिंह यांनी म्हटले आहे.

02 Jan, 24:11 (IST)

सरकारच्या माहितीनुसार कोरोना व्हायरसवरील लस जानेवारी महिन्यात उपलब्ध होईल असे केरळ मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे.

02 Jan, 24:00 (IST)

केरळ येथे कोरोनाचे आणखी 4991 रुग्ण आढळले असून 23 जणांचा बळी गेला आहे.

01 Jan, 23:53 (IST)

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी प्रविण राऊत यांच्या 72 कोटींच्या संपत्तीवर ED कडून  जप्त केली आहे.

01 Jan, 23:45 (IST)

हरियाणा मधील सर्व महाविद्यालयांमध्ये CCTV कॅमेरा लावणे अनिवार्य असल्याचे सरकारने निर्णय जाहीर केला आहे.

01 Jan, 23:36 (IST)

शेतकऱ्यांच्या समस्या शांतपणे आणि लवकरच सोडवल्या जातील अशी अपेक्षा  पंजाब मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केली आहे.

01 Jan, 23:22 (IST)

भारतात Covishield च्या लसीला सशर्थ मंजूरी दिली गेली आहे.

01 Jan, 23:05 (IST)

राष्ट्रपती भवन म्युझिअम आता नागरिकांसाठी येत्या 5 जानेवारी पासून पुन्हा सुरु होणार आहे.

Read more


भारतासह जगभरात नववर्षाचा जल्लोष आहे. कोरोना व्हायरस संसर्गाच्या सावटाला काहीसे दबकून अत्यंत सुरक्षीतपणे आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करत नववर्षाचे स्वागत होत आहे. तर 2020 या वर्षात घडलेल्या त्रासदायक घटना या वर्षासोबतच निघून जाव्यात. नव्या वर्षात नवी नवलाई घेऊन आनंदाचे क्षण यावेत यांसाठी अनेकांनी प्रार्थना, इच्छा व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी नवे संकल्प केले आहेत. केलेले संकल्प तडीस नेण्याचेही संकल्प काहींनी केले आहेत. कोरोना व्हायरस संकट विचारात घेऊन राज्य सरकारने नववर्षाचा जल्लोष साजरा करताना नियमावली घालून दिली होती. या नियमावलींचे कडक पालन व्हावे यासाठी पोलीस आणि प्रशासन सतर्क होते.

नोकरदार वर्गासाठी आजपासून एक गिफ्ट मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (

इपीएफ) मिळणारे व्याज आजपासून कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तसेच, सन 2019/20 या आर्थिक वर्षासाठी असलेले पीएफवरील व्याज 8.5% इतकेच कायम असणार आहे. हे व्याज आजपासून (1 जानेवारी 2020) ग्राहकांच्या (कर्मचारी) खात्यात जमा होणार आहे.

मोबाईल फोन वापरणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज म्हणजेच एक जानेवारीपासून तुम्ही कोणत्याही मोबाईल, अथवा लँडलाईन क्रमांकावर फोन लावणार असाल तर त्या क्रमांकापूर्वी '0' लावणे आवश्यक असणार आहे. म्हणजे जर तुम्ही त्या क्रमांकासमोर 0 लावले नाही तर तुमचा कॉल संबंधित व्यक्तीला लागणार नाही. येत्या 15 जानेवारीपासून आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात येत आहे. याच्या माध्यमातून फिक्स्ड फोन म्हणजेच लँडलाईन वरुन मोबाईलवर कॉल करण्यासाठीही '0' लावणे आवश्यक आहे. नव्या बदलांसाठी टेलिकॉम विभागाने कंपन्यांना 1 जानेवारीपासून आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, राजकारण, अर्थकारण, सामाजकारण, संस्कृती, कृषी आरोग्य, संशोधन, उद्योग यांसह जगभरातील घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग पाहात राहा. लेटेस्टली सोबत जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now