Skoda Superb ची डिझेलमध्ये पुन्हा एन्ट्री? Slavia आणि Octavia RS चे बुकिंग सुरू होताच मोठा ट्विस्ट!
Skoda Slaviaभारतीय ऑटोमोबाईल बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी स्कोडा इंडियाने आजपासून आपल्या दोन बहुप्रतिक्षित सेडान मॉडेल्स— New Slavia आणि परफॉर्मन्स सेडान Octavia RS चे अधिकृत बुकिंग सुरू केले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या दोन्ही कार्सची प्रत्यक्ष डिलिव्हरी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू करण्यात येईल.
नवीन स्लाव्हियामध्ये आधुनिक फिचर्स आणि रिफ्रेश्ड लूक देण्यात आला असून, ऑक्टाव्हिया RS तिच्या दमदार इंजिन आणि हाय-स्पीड परफॉर्मन्ससाठी पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. या दोन्ही कार्सच्या बुकिंगची घोषणा होताच ग्राहकांमध्ये आणि कारप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
फ्लॅगशिप Superb सेडानसाठी 2027 पर्यंत वाट पाहावी लागणार
स्कोडाची प्रीमियम फ्लॅगशिप सेडान Superb भारतात आणण्यासाठी मात्र ग्राहकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. युरोपियन युनियन आणि भारत (EU-India) यांच्यातील मुक्त व्यापार करार (FTA) लागू झाल्यानंतरच, म्हणजेच साधारणत: 2027 च्या मध्यापर्यंत नवी सुपरब भारतात अधिकृतपणे लॉन्च केली जाईल.
दरम्यान, कंपनी भारतीय बाजारात या फ्लॅगशिप सेडानच्या डिझेल व्हेरियंटबाबत ग्राहकांची आवड आणि मागणीचा अंदाज घेत आहे. सुपरबच्या डिझेल मॉडेलची बाजारातील विक्री क्षमता किती असू शकते, याचे अंतर्गत मूल्यांकन पूर्ण केल्यानंतरच तिच्या लॉन्चिंगची रणनीती निश्चित केली जाईल.