ठाणे: बाळकूममधील अ‍ॅमेझॉन डेटा सेंटरच्या वादावर कंपनीचे स्पष्टीकरण; बेकायदेशीर वृक्षतोड आणि पाणीटंचाईचे आरोप फेटाळले

Amazon (PC - Pixabay)

ठाण्यातील बाळकूम भागात प्रस्तावित असलेल्या अ‍ॅमेझॉन (Amazon) डेटा सेंटर प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर अखेर कंपनीने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा प्रकल्प सर्व सरकारी नियमांचे आणि पर्यावरणीय कायद्‍यांचे काटेकोर पालन करूनच उभारला जात आहे.

​खासदार नरेश म्हस्के यांचे आरोप आणि नागरिकांचा विरोध

​गेल्या काही दिवसांपासून बाळकूममधील अ‍ॅमेझॉनच्या या नियोजित प्रकल्पाला स्थानिक गृहनिर्माण सोसायट्या आणि नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनीही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत, पालिका प्रशासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचा आरोप अ‍ॅमेझॉनवर केला होता. नागरिकांचा विरोध आणि अपुर्‍या सुविधांचे कारण देत खासदार म्हस्के यांनी या प्रकल्पाच्या कामाला तातडीने स्थगिती देण्याची मागणी करणारे निवेदन प्रशासनाला सादर केले होते.

​अ‍ॅमेझॉनने दिले स्पष्टीकरण: "वृक्षतोड नियमानुसारच"

​या सर्व आरोपांना उत्तर देताना अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, प्रकल्पाच्या जागेवर झालेली वृक्षतोड ही ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) कायदेशीर परवानगीने आणि नियमांच्या चौकटीत राहूनच करण्यात आली आहे. तसेच, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कंपनी कटिबद्ध असून, कापलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात त्या जागेवर स्थानिक प्रजातींची नवीन झाडे लावली जात आहेत. या प्रकल्पाशी संबंधित सर्व पर्यावरणीय मंजुरी पूर्णपणे पारदर्शक असून, ती केंद्र सरकारच्या 'परिवेश' (PARIVESH) पोर्टलवर जाहीर उपलब्ध आहेत.

​पाणी आणि विजेचा तुटवडा होणार नाही

​डेटा सेंटरमुळे बाळकूम परिसरात पाणीटंचाई निर्माण होईल आणि वीज पुरवठ्यावर ताण येईल, अशी भीती स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त केली जात होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement