लवकरच बाजारात येणार 1 रुपयांची नवी नोट; अर्थमंत्रालयाने जारी केली अधिसूचना, जाणून घ्या खास वैशिष्ठ्ये
अर्थ मंत्रालयाने नवीन एक रुपयांच्या नोटांच्या छपाईशी संबंधित राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. शासनाने जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनामध्ये रंगीबेरंगी, प्रमाणित वजन आणि नवीन एक रुपयांच्या नोटेच्या डिझाईनबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे
अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) नवीन एक रुपयांच्या नोटांच्या (New One Rupee Note) छपाईशी संबंधित राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. शासनाने जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनामध्ये रंगीबेरंगी, प्रमाणित वजन आणि नवीन एक रुपयांच्या नोटेच्या डिझाईनबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. इंग्रजी वृत्तपत्र ‘फायनान्शियल एक्सप्रेस’ च्या वृत्तानुसार, नवीन नोट आयताकृती आकाराची 9.7 x 6.3 सेमी असेल. या नवीन नोटवर 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया'वर 'भारत सरकार' लिहिलेले असेल.
एक रुपया हे आजच्या काळाच्या सर्वात लहान चलन आहे. हे रिझर्व्ह बँकेने नव्हे, तर भारत सरकारने जारी केले आहे. यामुळेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने या नव्या रुपयाच्या नोटवर सही केली नाही. एका रुपयाच्या नोटवर देशाच्या अर्थसचिवांची सही आहे.
जाणून घ्या वैशिष्ट्ये -
> या नोटेवर अर्थ सचिव अतनु चक्रवर्ती यांची दोन भाषांमध्ये स्वाक्षरी असेल.
> नवीन नोटवर बरेच वॉटरमार्क असतील. नोटेवर अशोकस्तंभ असेल, पण त्यासोबत 'सत्यमेव जयते' असे लिहिलेले नसेल. '1' नोटच्या मध्यभागी लपविला जाईल. त्याचप्रमाणे, 'भारत' उजव्या बाजूला अनुलंब शैलीमध्ये लिहिले जाईल, तेही लपून राहील.
> नोटेवर नवीन एक रुपयांच्या नाण्याच्या प्रतिकृतीही असतील.
> नवीन नोटेचा रंग प्रामुख्याने गुलाबी आणि हिरवा असेल.
प्रथम एक रुपयांची नोट 30 नोव्हेंबर 1917 रोजी छापली गेली होती. त्या नोटवर किंग जॉर्ज पंचमचा फोटो होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार 1926 मध्ये पहिल्यांदा एक रुपयांच्या नोटचे मुद्रण थांबविण्यात आले होते. त्यानंतर 1940 मध्ये त्याची पुनर्निर्मिती करण्यात आली. पुढे 1994 ते 2015 पर्यंत या नोटेचे छपाई बंद होती. (हेही वाचा: 2000 ची नोट खरंच व्यवहारातून बंद होणार का ? केंद्र सरकार आणि आरबीआय यांनी घेतलाय 2000 च्या नोटांबद्दल एक मोठा निर्णय)
एका रुपयाच्या नोट्स जवळपास चलनबाहेर आहेत. आता सरकार लवकरच बाजारात नवीन रुपयांची नोट आणणार आहे. नोटांच्या छपाईसाठी भारतीय रिझर्व्ह बँक सहसा जबाबदार असते. परंतु 1 रुपयांच्या या नवीन नोटा वित्त मंत्रालय छापत आहे. राजपत्रातील प्रकाशनाबाबत असलेल्या तारखेनंतर नवीन एक रुपयांच्या नोटा चलनात येतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)