Gurugram Crime: नेपाळी व्यक्तीने पत्नीची गळा दाबून केली हत्या, गुरुग्राम येथील खळबळजनक घटना
२४ वर्षीय नेपाळी व्यक्तीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली.
Gurugram Crime: दोन दिवसांपूर्वी एका सोशल मीडिया इन्फ्लुएझर असलेल्या महिलेची पतीने हत्या केल्याची खळबळजनक घटना ताजी असताना, गुरुग्राममध्ये एका पतीने पत्नीची हत्या केल्याची समोर आले आहे. २४ वर्षीय नेपाळी व्यक्तीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. पत्नीचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचा पतीने सांगितले परंतु डॉक्टरांनी तपासल्यावर महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केले आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव शांती होते. (हेही वाचा- हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये अडकून 62 वर्षीय रुग्णाचा मृत्यू,
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तप्रस जोशी असं नाव आहे. तप्रस जोशी हा नेपाळ येथील रहिवासी दोडी जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे. शांती रात्री बेशुध्द झाल्याने तप्रस रुग्णालयात घेऊन आला. ती बेशुध्द असल्याने डॉक्टरांनी तपासले. डॉक्टरांनी संपुर्ण तपासल्यानंतर शांतीच्या गळाच्या भवती नखांच्या खुण्या दिसल्या. गळा दाबल्याचा खुण्या भवती सापडल्याने डॉक्टरांना संशय आला. डॉक्टरांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस रुग्णालयात आले आणि तप्रस यांची चौकशी केली.
पोलिसांच्या चौकशीतून समोर आले की, १५ दिवसांपूर्वीच हे दोघे जण गुरुग्रामला आले होते. दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला होता. त्याने तीच्या पोटात लाथ मारली आणि रागाच्या भरात त्याने शांतीचा गळा स्कार्फने दाबला. तीचा गुदमरून मृत्यू झाला. तिला रुग्णालयात घेऊन आला आणी घटना उघडकीस आली. या घटनेनंतर गुरुग्राममध्ये एकच खळबळ उडाली आहे.