Navy Empolyee Killed Wife And Mother In Law: हुंड्यासाठी नौदल कर्मचाऱ्याचं माणूसकीला काळीमा फासणार कृत्य; गर्भवती बायको आणि सासूला सिलिंडरचा स्फोट घडवून उडवलं

पोलिसांनी सांगितले की अनुरागवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) तसेच हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांवरही हुंडाबळीचा आरोप करण्यात आला आहे.

Gas Explosion, Death Image (फोटो सौजन्य - Pixabay)

Navy Empolyee Killed Wife And Mother In Law: गोव्यात गुन्हेगारीचं अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. वास्को द गामा (Vasco da Gama) येथे हुंड्यासाठी (Dowry) गर्भवती पत्नी आणि सासूला गॅस सिलिंडरचा स्फोट (LPG Gas Explosion) घडवून ठार केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी (Goa Police) आरोपी पतीला अटक केली आहे. अनुराग सिंग राजावत (Anurag Singh Rajawat) असं या नौदल कर्मचाऱ्याचं (Navy Empolyee) नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, राजावतवर त्याची गर्भवती पत्नी, शिवानी राजावत (वय, 26) आणि तिची आई जयदेवी चौहान (वय, 50) यांची हत्या केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी या दोघींचा सिलिंडरच्या स्फोटात मृत्यू झाला. अनुरागवर हुंडाबळीप्रकरणी पत्नीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (हेही वाचा - Mumbai Airpod Return from Kerala via Goa: मुंबईकर व्यक्तीचे महागडे एअरपॉड केरळमध्ये हरवले, गोव्यात सापडले, 'X' द्वारे काढला माग)

दरम्यान, पोलिसांनी सांगितले की अनुरागवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) तसेच हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांवरही हुंडाबळीचा आरोप करण्यात आला आहे. गोवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री अनुरागला अटक केली. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर, शिवानीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून गोवा पोलिसांना या मृत्यूची चौकशी करण्यास सांगितले आहे. (हेही वाचा -Mumbai: प्रशिक्षणाच्या नावाखाली मुलीच्या स्तनांना चुकीचा स्पर्श, नितंबावर चापटी; बॅडमिंटन प्रशिक्षकास POCSO कायद्याखाली 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा)

शिवानीच्या भावाने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून यात त्याने म्हटलं आहे की, अनुरागने त्याच्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये हुंडा मागितला. तसेच त्याने शिवानी आणि त्यांच्या आईचा छळ केला. अनुरागनेचं सिलिंडरचा स्फोट घडवून आणल्याचं शिवानीच्या भावाने म्हटलं आहे. तक्रारीनंतर जिल्हा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. हे कुटुंब मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचे असून ते वास्को द गामा येथे भाड्याच्या जागेत राहत होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now