Gang Rape Case: हरियाणात तरुणीवर रिक्षा चालकासह तिघांनी केला बलात्कार, राज्यात मोठी खळबळ
रिक्षा चालकांसह तिघांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेत पलवलमध्ये पोलिस ठाण्यात गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला
Gang Rape Case: हरियाणाच्या फरिदाबाद आणि पलवलमधून धक्कादायक घटना घडली आहे. फरिदाबाद मध्ये तरुणीवर रिक्षा चालकांसह तिघांनी सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेत पलवलमध्ये पोलिस ठाण्यात गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या खळबळजनक घटनेमुळे महिलांवर सुरक्षितेवर प्रश्न उभारला आहे. फरिदाबाद मध्ये महिला ही सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फरिदाबामध्ये एक महिला ऑटोत प्रवास करत असताना, ऑटो चालकासह तीघांनी बलात्कार केला. दरम्यान पलवल परिसरात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेवरही बलात्कार करण्यात आला. सामूहिक बलात्कारानंतर महिलेची विक्री करण्यात आली. पलवल मध्ये पीडित महिलेचा तिच्या नवऱ्यासोबत भांडण झालं होत. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आली होती. दरम्यान पोलीसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. मिळालेल्या माहिती नुसार, महिलेला पोलीस ठाण्यात बसलेल्या एका बल्ली नावाच्या आऱोपी सोबत घरी पाठवले. आरोपीने महिलेला शेतात नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. नंतर बारीबारीने निरंजन, भीम नावाच्या आरोपींनी महिलेवर अत्याचार केला. आरोपीने महिलेचा अश्लिल व्हिडिओ बनवला. तीला जीवे मारण्याची धमकी दिली. धक्कादायक म्हणजे आरोपीने महिलेला जवळच्या गावातील बिजेंद्र नावाच्या व्यक्तीला विकले. या आरोपीने देखील क्रुरतेच्या सर्व रेषा ओलांडल्या.
रविवारी,फरिदाबाद मध्ये रिक्षात एका २४ वर्षाच्या तरुणीवर गॅग रेप करण्यात आला. रात्रीच्या वेळीस रिक्षातून घरी जात असताना ही घटना घडली. काही वेळानंतर रिक्षा आणखी दोन तरुण बसले. त्यानंतर तीचं तोंड दाबून तीच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे फरिदाबाद मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2023 01:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

