Noida Murder Case: पतीच्या डोक्यात हतोडा घालून केली हत्या, आरोपी पत्नीला अटक; नोएडा येथील खळबळजनक घटना

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका महिलेने रागाच्या भरात आपल्या पतीची हातोड्याने वार करत हत्या केली आहे.

Hammer PC pixabay

Noida Murder Case:  उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडा (Noida) येथे एका महिलेने रागाच्या भरात आपल्या पतीची हातोड्याने वार करत हत्या (Murder) केली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती रविवारी नोएडा पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. ही घटना बिरसक पोलिस स्टेशन हद्दीतील जलालपूर गावात घडली. महिलेचा पती गंवडी काम करायाचा. पीडित पतीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (हेही वाचा- उज्जैनमध्ये सहकार्याची हत्या, हॉटेल कर्मचाऱ्याला अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, दामप्त्यांचे वैयक्तिक कारणावरून वाद झाला होता. दोघांचे भांडण अगदी टोकाला पोहचले. पत्नीने रागाच्या भरात घरातील हातोडा घेत पतीच्या डोक्यावर वार केला. या जीवघेण्या हल्ल्यात पीडित पती गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्थानिक रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या सर्व घटनेची माहिती पीडिताच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात दिली. बिसरख पोलिस ठाण्यात आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून महिलेने वार केलेले हत्यार (हतोडा) पोलिसांनी जप्त केला. पुढील घटनेचा कायदेशीर कार्यवाही सुरु आहे. घटनेचा तपासही आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केले आहे. जलालपूरातील या घटनेमुळे गावाचं हादरले आहे.



संबंधित बातम्या